Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Politics: रणनीती की फोडाफोडी? भाजपने राष्ट्रवादीच्या गडाला लावला सुरुंग, जिल्हा परिषदेत मोठी उलथापालथ

सध्याच्या परिस्थितीत ३२ विरुद्ध ३३ असे काट्याचे संख्याबळ असल्यामुळे प्रत्येक निर्णय हा संघर्षातूनच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामे राबवताना अडचणी येऊ शकतात.

  • By अनुराधा धावडे
Updated On: Apr 07, 2026 | 11:05 AM
Satara, Satara ZP, BJP, NCP, Shivsena,

Satara, Satara ZP, BJP, NCP, Shivsena,

Follow Us
Close
Follow Us:

 

Satara Politics: सातारा जिल्हा परिषदेच्या राजकारणात अलीकडील सभापती निवड ही केवळ पदाची लढाई नसून, आगामी सत्तासमीकरणांचे संकेत देणारी ठरली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे लता करणे आणि ऋतुजा शिंदे हे दोन सदस्य फोडण्यात भाजपला यश आले आणि त्यामुळे सत्तास्थापनेच्या समीकरणात मोठी उलथापालथ झाली. या घडामोडींमुळे संख्याबळ असूनही राष्ट्रवादी (२०) आणि शिवसेना शिंदे गट (१५) हे दोन्ही पक्ष बॅकफूटवर गेले, हे विशेष लक्षवेधी ठरते.

सभापती निवडीत भाजपने मिळवलेले यश हे केवळ गणिती विजय नाही, तर रणनीतीचेही फलित आहे. मात्र, या प्रक्रियेत “बेरजेच्या राजकारणा”पेक्षा “विरोधाच्या राजकारणा”वर अधिक भर दिल्याचे दिसून येते. त्यामुळे पुढील पाच वर्षांत विकासकामांवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सातारा जिल्हा परिषद ही राज्यातच नव्हे, तर देशपातळीवरही कार्यक्षमतेसाठी ओळखली जाते. अशा वेळी राजकीय संघर्षाचा परिणाम प्रशासनावर होणे ही चिंतेची बाब आहे.

NCP Politics: ‘मी राष्ट्रवादीचीच, गद्दारीचा आरोप बिनबुडाचा!’ ऋतुजा शिंदेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर

पालकमंत्री शंभूराजे देसाई यांनी “सभापती निवड म्हणजे राजकारणाचा शेवट नाही” असे सांगत भविष्यातील संघर्षाचे संकेत दिले आहेत. याचा अर्थ, जिल्हा परिषदेत सत्ता स्थिर नसून, पुढील काळातही राजकीय हालचाली सुरू राहणार आहेत. विशेष म्हणजे, भाजप आणि त्यांचे सहयोगी पक्ष यांच्यातच अंतर्गत मतभेदांची “लक्ष्मणरेषा” निर्माण झाल्याचे चित्र दिसत आहे.

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांची आक्रमक राजकीय भूमिका ही या संघर्षात आणखी एक महत्त्वाचा घटक ठरते. त्यांच्या भूमिकेमुळे विरोधकांमध्ये नाराजी वाढली असून, विशेषतः पालकमंत्री शंभूराजे देसाई आणि जयकुमार गोरे यांच्यातील संबंधांमध्ये तणाव निर्माण झाल्याच्या चर्चा रंगत आहेत. हे मतभेद जर वाढले, तर त्याचा थेट परिणाम जिल्हा परिषदेमधील सत्तासंतुलनावर होऊ शकतो.

Satara ZP मध्ये २० कोटींचा निधी ‘नियमबाह्य’ वळवला? सीईओ याशनी नागराजन यांच्यावर गंभीर आरोप

सध्याच्या परिस्थितीत ३२ विरुद्ध ३३ असे काट्याचे संख्याबळ असल्यामुळे प्रत्येक निर्णय हा संघर्षातूनच मार्गी लागण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीत जिल्हा परिषद सदस्यांना विकासकामे राबवताना अडचणी येऊ शकतात. अंतर्गत राजकारण, गटबाजी आणि सत्तासंघर्ष यामुळे प्रशासनावर दबाव वाढण्याची चिन्हे आहेत.

एकूणच, सातारा जिल्हा परिषदेमध्ये सध्या राजकीय अस्थिरतेचे वातावरण असून, पुढील काळात संघर्ष अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर “विकासाचे राजकारण” प्राधान्याने पुढे नेणे ही सर्व पक्षांची सामूहिक जबाबदारी आहे. अन्यथा, सत्तासंघर्षात अडकलेल्या या राजकारणाचा फटका थेट सर्वसामान्य नागरिकांना बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे.

 

Web Title: Satara zp power struggle how bjps aggressive tactics redefined the districts political equations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 11:05 AM

Topics:  

  • Satara

संबंधित बातम्या

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय
1

वाईतील लघु कुंभमेळ्याला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद, कृष्णाघाट परिसर भक्तिमय

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”
2

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा
4

Chhatrapati Shivaji Museum : छत्रपती शिवाजी संग्रहालयात दुर्मिळ वीरगळींची उपेक्षा? तळघरात धूळ-ओलाव्यात ऐतिहासिक ठेवा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.