"मी राष्ट्रवादीचीच, गद्दारीचा आरोप बिनबुडाचा!" ऋतुजा शिंदेंचे विरोधकांना सडेतोड उत्तर
ऋतुजा शिंदे म्हणाल्या, “मकरंद पाटील आणि खा. नितीन पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्हाला संधी मिळाली. माझ्या उमेदवारी अर्जावर राष्ट्रवादीच्या सदस्यानेच सूचक म्हणून सही केली आहे. त्यामुळे मी राष्ट्रवादीचीच बिनविरोध महिला व बालकल्याण सभापती आहे. अध्यक्ष-उपाध्यक्ष तसेच सभापती निवडीत मी भाजपला मतदान केलेले नाही. त्यामुळे माझ्यावर होत असलेले गद्दारीचे आरोप पूर्णपणे बिनबुडाचे आहेत.”
PNG Connections: सिलेंडर होणार बंद? एका महिन्यात 8,00,000 घरांपर्यंत पोहचला पाईप गॅस
दरम्यान, या वादावर विराज शिंदे यांनीही आक्रमक भूमिका घेतली. “आमच्या यशामुळे काही संधीसाधूंना असूया वाटू लागली आहे. जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या पार्श्वभूमीवर काहीजण राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहेत. आमच्याविरोधात कटकारस्थान रचून बदनाम करण्याचा डाव आखला जात आहे,” असा आरोप त्यांनी केला.
ते पुढे म्हणाले, “ना. मकरंद आबांमुळेच आम्ही राष्ट्रवादीचे उमेदवार झालो आणि विजयी ठरलो. निवडून आल्यानंतर कोणत्याही प्रलोभनाला बळी न पडता आम्ही आमची भूमिका कायम ठेवली. सत्ताधाऱ्यांनी सर्व समित्या ताब्यात घेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्याकडे आवश्यक संख्याबळ नव्हते ही वस्तुस्थिती आहे.”
सभापती निवडीच्या प्रक्रियेबाबत बोलताना त्यांनी सांगितले की, “विरोधी गटाकडून एकमेव अर्ज आल्याने परिस्थिती बदलली आणि भाजपने इतर समित्या बिनविरोध करताना . ऋतुजा शिंदे यांची निवड झाली. ही निवड बावधन गटासह संपूर्ण वाई मतदारसंघासाठी अभिमानास्पद आहे.” शेवटी ऋतुजा शिंदे यांनी स्पष्ट संदेश दिला, “माझे सभापतीपद राष्ट्रवादीचेच आहे. या पदाच्या माध्यमातून बावधन गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. विरोधकांनी कितीही आरोप केले तरी‘सूर्याला झाकता येत नाही’—विकासाचा आमचा रथ थांबणार नाही.”मी राष्ट्रवादी पक्षातून निवडून आले आहे. मकरंद पाटील, खा.नितीन पाटील यांच्याबरोबरच बावधन गटातील मतदारांशी मी स्वप्नातही प्रतारणा करू शकणार नाही. राष्ट्रवादीच्याच सदस्याने माझ्या अर्जावर सूचक म्हणून सही केली असून मी राष्ट्रवादीचीच बिनविरोध महिला व बालकल्याण सभापती आहे.मी अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडीवेळी तसेच सभापती निवडीवेळी भाजपला मतदान केले नाही.त्यामुळे माझ्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्यांनी आधी वस्तुस्थिती समजावून घ्यावी असा सल्ला नूतन महिला बालकल्याण सभापती .ऋतुजा विराज शिंदे यांनी दिला. ऋतुजा शिंदे भाजपाला जाऊन मिळाल्या,त्यांनी गद्दारी केली अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप सोशल मीडियावर सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर .ऋतुजा शिंदे आणि विराज शिंदे यांनी प्रसारमाध्यमासमोर आपली बाजू मांडली.
विराज शिंदे म्हणाले,आम्हाला मिळालेलं यश खुपत असल्यानेच काही संधीसाधू जिल्हा परिषद पदाधिकारी निवडीच्या गरम तव्यावर आपली राजकीय पोळी भाजू पाहत आहेत.त्यांना आता माझ्याबाबत असूया वाटू लागली आहे.सत्तेत असो व नसो लोकविकासासाठी मी कायमच आघाडीवर राहत असल्याने अनेकांना आता ‘इनसेक्युरिटी’ वाटत आहे.त्यामुळे दुसऱ्याच्या नथीतून तिर मारून आम्हाला बदनाम करण्याचे कुटील राजकीय डाव संबंधित संधींसाधुंकडून सुरू आहे.ना.मकरंद आबांमुळेच आम्ही बावधन गटाची राष्ट्रवादीचे उमेदवार बनू शकलो,अन विजयी झालो याची रास्त जाणीव आम्हाला आहे. निवडून आल्यानंतर आम्ही कुठल्याही प्रलोभनाला भुललो नाही,घेतला वसा सोडला नाही.सत्ताधारी गटाने कोणत्याही परिस्थितीत सगळ्या समित्या ताब्यात ठेवण्याचा चंग बांधला होता,तो जगजाहीर आहे.पण,त्यांच्याकडे आवश्यक गोळाबेरीज नव्हती ही देखील वस्तुस्थिती आहे.पराभवाच्या मानसिकते ऐवजी .ऋतुजा यांनी लढण्याची भूमिका घेऊन अर्ज दाखल केला.विरोधी गटाकडून विशेषतः राष्ट्रवादीकडून एकमेव अर्ज आल्याने भाजपने आपल्या तीन समित्या बिनविरोध करताना युती धर्म पाळून .ऋतुजा शिंदे यांना बिनविरोध देऊन ऋतुजा शिंदे यांची डाळ शिजली. .ऋतुजा शिंदे यांनी सभापती पद मिळवून बावधन गटाबरोबरच वाई मतदारसंघाचा अभिमान वाढवला आहे. .ऋतुजा शिंदे यांचे सभापतीपद राष्ट्रवादीचेच असून त्या पदाच्या माध्यमातून बावधन गटाच्या सर्वांगीण विकासासाठी आपण सज्ज राहणार आहोत.कुणाच्या झाकण्याने सूर्य उगवायचा राहत नाही.बावधन गटाच्या विकासाचा सूर्य आता तळपण्यासाठी सज्ज झाला असून आमच्या विरोधात गरळ ओकणाऱ्यांनी खुशाल ओरडत राहावे आम्ही राष्ट्रवादीच्या माध्यमातून विकासरथ गतिमान ठेवणारच!






