Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • raj thackeray |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”

सातारा पालिकेतील अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर खासदार उदयनराजे आणि मंत्री शिवेंद्रसिंहराजे यांनी भाजप नगरसेवकांची बैठक घेत शिस्तीचा बडगा उगारला. तसेच विधान परिषदेसाठी सुनील काटकर व धैर्यशील कदम यांच्या नावांची शिफारस केल्याचे स्पष्ट केले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 24, 2026 | 07:27 PM
Satara News: भाजप नगरसेवकांना दोन्ही राजेंची तंबी “अंतर्गत वाद बाजूला ठेवा; विकासकामांवर लक्ष केंद्रित करा”
Follow Us
Close
Follow Us:

 

  • साताऱ्यात दोन्ही राजेंची नगरसेवकांना ‘शिस्ती’ची तंबी
  • अंतर्गत गटबाजीवर उदयनराजे अन् शिवेंद्रसिंहराजे भडकले
  • विधान परिषदेसाठी दोन नावांची शिफारस
सातारा, दि. २४ (प्रतिनिधी): सातारा पालिकेतील वाढत्या अंतर्गत मतभेदांच्या पार्श्वभूमीवर भाजपच्या नगरसेवकांची रविवारी फर्न हॉटेल येथे महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. खासदार उदयनराजे भोसले आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी संयुक्तपणे उपस्थित नगरसेवकांना संघटनात्मक शिस्त, समन्वय आणि विकासाभिमुख कामकाजाचा स्पष्ट संदेश दिला.

पालिकेतील काही विषयांवरून नगरसेवकांमध्ये वाढत असलेल्या कुरबुरी, गटबाजी आणि परस्परांवरील आरोपांमुळे पक्षप्रतिमेवर परिणाम होत असल्याची नाराजी बैठकीत व्यक्त करण्यात आली. आगामी काळात निवडणुकांचे आव्हान लक्षात घेता सर्वांनी एकत्रितपणे काम करण्याची गरज असल्याचे दोन्ही नेत्यांनी स्पष्ट केले. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी नगरसेवकांना संबोधित करताना, “पालिका सभागृहातील मतभेद सार्वजनिक पातळीवर जाणे योग्य नाही. विषयांवर चर्चा व्हावी; मात्र त्यातून पक्षाची प्रतिमा मलीन होता कामा नये,” असे सांगितले. नवीन नगरसेवकांना मार्गदर्शन करून त्यांना कामकाजात सामावून घेण्याचाही त्यांनी सल्ला दिला.

पालिकेतील प्रशासनिक बाबींमध्ये अनावश्यक हस्तक्षेप टाळण्याचे निर्देश देतानाच मुकादम बदल्या आणि स्थानिक पातळीवरील तणावांवरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. “विकासकामे आणि नागरी सुविधा यावर भर द्या. परस्परांतील संघर्षामुळे नागरिकांमध्ये चुकीचा संदेश जातो,” असे ते म्हणाले. शहरातील अतिक्रमण, हॉकर्स, स्वच्छता व्यवस्था आणि आर्थिक अडचणी या विषयांवरही बैठकीत सविस्तर चर्चा झाली. शहरासाठी स्वतंत्र हॉकर्स झोन उभारणे, महसूल वाढवण्यासाठी स्वनिधी बळकट करणे आणि विविध विकास योजनांसाठी राज्य व केंद्र शासनाचा निधी मिळवण्याबाबत सकारात्मक भूमिका घेण्यात आली.

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम

खासदार उदयनराजे भोसले यांनी नगरसेवकांना नागरिकांशी अधिक संवाद ठेवण्याचे आवाहन केले. “प्रत्येक प्रभागात स्थानिक पातळीवर समित्या कार्यरत करून नागरिकांच्या समस्या प्राधान्याने सोडवाव्यात. वैयक्तिक मतभेद बाजूला ठेवून विकासकामे गतीने पूर्ण करणे गरजेचे आहे,” असे त्यांनी नमूद केले. बैठकीत सफाई कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा मुद्दाही उपस्थित झाला. संबंधित ठेकेदारांकडून कामगार महिलांना वेळेवर आणि योग्य मोबदला मिळत नसल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. स्वच्छता व्यवस्थेचे नियोजन अधिक सक्षम पद्धतीने करण्यासाठी नवीन यंत्रणा उभारण्याचा विचार सुरू असल्याचेही सांगण्यात आले. यानंतर दोन्ही राजांनी पालिका अधिकाऱ्यांची स्वतंत्र बैठक घेत विविध प्रलंबित कामांचा आढावा घेतला. प्रशासनाने अधिक समन्वयाने आणि जबाबदारीने काम करण्याच्या सूचनाही यावेळी देण्यात आल्या. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा भाजपमध्ये संघटनात्मक बांधणी मजबूत करण्यासाठी ही बैठक महत्त्वाची मानली जात आहे.

सातारा सांगली स्थानिक स्वराज्य संस्थांची विधान परिषदेची निवडणूक जाहीर झाली आहे या निवडणुकीमध्ये सातारा जिल्ह्यातून लोकसभा संयोजक सुनील काटकर आणि भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष धैर्यशील कदम या दोघांची नावे पाठवण्यात आली आहेत .ही निवडणूक महायुतीच्या माध्यमातून लढण्याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांनी घेतला आहे यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राष्ट्रवादीच्या अध्यक्ष सुनीताताई पवार व शिवसेनेचे अध्यक्ष उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी घेतला आहे .त्यामुळे कोणाला उमेदवारी मिळणारी याचा निर्णय वरिष्ठ नेत्यांच्या बैठकीतून होणार आहे त्यानंतर कोणत्या जिल्ह्यातून कोणाला उमेदवारी मिळणार हा सुद्धा विषय चर्चेला जाणार आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातून सध्या तरी दोघांची नावे पाठवण्यातआल्याचे स्पष्टीकरण शिवेंद्रसिंह राजे यांनी दिले.

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

Web Title: Udayanraje and shivendrasinhraje warns bjp corporators over groupism satara vidhan parishad two names finalised

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 24, 2026 | 07:12 PM

Topics:  

  • Satara
  • Satara News
  • Shivendra Raje Bhosale
  • Udyanraje bhosale

संबंधित बातम्या

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम
1

सातारा जिल्ह्यात खंडाळ्याचा डंका; मुख्यमंत्री समृद्ध पंचायत अभियानमध्ये विंग ग्रामपंचायत प्रथम

सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णा ठरली देशाची वेगवान धावपट्टू; झारखंडच्या स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक
2

सातारा-जावळी एक्सप्रेस सुदेष्णा ठरली देशाची वेगवान धावपट्टू; झारखंडच्या स्पर्धेत मिळवले सुवर्णपदक

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त
3

Satara Crime: डॉलरमध्ये उकळत होते पैसे; साताऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, लाखोंचा मुद्देमाल जप्त

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन
4

Satara News: लोकप्रतिनिधींनी स्वेच्छेने निवृत्तीवेतनाचा त्याग करावा; सामाजिक कार्यकर्ते सुशांत मोरेंचे आवाहन

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.