Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 3 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara News : ठेवीदारांनी ‘या’ तारखेपर्यंत सातारा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचं आवाहन

कार्यवाही होण्यासाठी ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय,सातारा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण येथे झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले. यावेळी पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.

  • By Ankita Karangutkar
Updated On: May 17, 2026 | 03:10 PM
Satara News : ठेवीदारांनी ‘या’ तारखेपर्यंत सातारा आर्थिक गुन्हे शाखेशी संपर्क साधा, पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांचं आवाहन
Follow Us
Follow Us:
  • सातारा जिल्ह्यातील ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक
  • गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहांकडे
  • चौकशीकामी उपस्थित रहण्याच्या सूचना
सातारा/पाटण : कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया आणि संपर्क ॲग्रो ठाणे, शाखा पाटण या कंपनीत पाटण तालुक्यासह सातारा जिल्ह्यातील ठेवीदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाली आहे. ठेवीदारांचे पैसे परत मिळवून देण्यासाठी गृह विभाग शर्थीचे प्रयत्न करत असून यासाठी फसवणूक झालेल्या ठेवीदारांकडून शासन परिपत्रक क्र. एमपीआय १११९/ प्र.क्र.०९/पोल-११ /२०१९ मध्ये दिलेल्या निर्देशा प्रमाणे कार्यवाही होण्यासाठी ठेवीदारांनी आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय,सातारा यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पाटण येथे झालेल्या ठेवीदारांच्या बैठकीत आर्थिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी केले. यावेळी पाटणचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांची प्रमुख उपस्थिती होती

मुळा-मुठा नदीकाठची गावे दूषित पाण्याच्या विळख्यात; 70 ते 80 गावांमध्ये पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर

गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहांकडे

कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया आणि संपर्क अॅग्रो लि. ठाणे शाखा पाटण मध्ये आर्थिक गुंतवणूक केलेल्या ठेवीदारांची फसवणूक झाल्याबाबत पाटण पोलीस ठाणे येथे गु.नॉ.क्र. १६/२०२२ कलम ४२०, ४०६, ३४ भा.दं.सं. सह कलम ३ व ४ महाराष्ट्र ठेवीदारांचे (वित्तीय संस्थामधील) हितसंबधांचे संरक्षण अधिनियम, १९९९ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. सदर गुन्हयाचा तपास आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा कडे असुन सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक हेमंतकुमार शहा हे करत आहेत.

पोलीस निरीक्षकांच्या उपस्थितीत ठेवीदारांची बैठक घेतली

कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया कंपनी, पाटण शाखा या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे, त्यांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग शासन परिपत्रक क्र. एमपीआय १११९/ प्र.क्र.०९/पोल-११, दि.२५/०२/२०१९ मध्ये दिलेल्या निर्देशा प्रमाणे गुंतवणूकदारांनी भरुन द्यावयाच्या विहीत नमुन्यातील फॉर्म बाबत तसेच आर्थिक गुंतवणूकीच्या जनजागृतीबाबत पाटण येथे शनिवार दि.१६ मे रोजी सुस्वाद हॉल, पाटण येथे पाटण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक अविनाश कवठेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत ठेवीदारांची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीस कालिकाई इंडस्ट्रिज आणि संपर्क अॅग्रो मध्ये आर्थिक फसवणूक झालेले ठेवीदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी नमुद गुन्हयाच्या अनुषंगाने ठेविदारांनी करावयाच्या कार्यवाहीची माहिती आर्थिक गुन्हे शाखा, साताराचे पोलिस निरीक्षक हेमंतकुमार शहा यांनी दिली. यावेळी सहकारी हवालदार वैशाली गुरव, हवालदार संतोष राऊत, संतोष माने यांनी सहकार्य केले.

चौकशीकामी उपस्थित रहण्याच्या सूचना

कालिकाई इंडस्ट्रिज इंडिया आणि संपर्क अॅग्रो या कंपनीमध्ये ज्या गुंतवणूकदारांनी आर्थिक व अन्य गुंतवणूक केली आहे, अशा ठेवीदारांनी त्यांनी महाराष्ट्र शासन, गृह विभाग शासन परिपत्रकात दिलेल्या निर्देशा प्रमाणे गुंतवणूकदारांनी भरुन द्यावयाच्या विहीत नमुन्यातील फॉर्म भरुन देण्याबाबत दि.१६/०५/२०२६ ते दि.३१/०५/२०२६ या कालावधीत सकाळी १० ते दुपारी १२.३० या वेळेत आर्थिक गुन्हे शाखा, पोलीस अधीक्षक कार्यालय, सातारा येथे खालील कागदपत्रांसह चौकशीकामी उपस्थित रहावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

ही कागदपत्रे आवश्यक

यावेळी येताना गुंतवणूक केल्याचा पुरावा, उदाहरणार्थ मुळ ठेव पावती, प्रमाणपत्र, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्या आर्थिक व्यवहाराचे बैंक खात्याचे स्टेटमेंट व अन्य पुरावा.
गुंतवणूकदाराचे बैंक पासबुकच्या पहिल्या पानाची ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती, गुंतवणूकदाराचे आधारकार्ड, गुंतवणूकदाराचे पॅनकार्ड, गुंतवणूकदारास अंशतः किंवा पुर्णतः किंवा गुंतवणूकदारास मिळालेल्या परताव्याचा पुरावा,
उदाहरणार्थ: पावती, ज्या बँकेच्या खात्यातून आर्थिक व्यवहार झालेला आहे, त्या आर्थिक व्यवहाराचे बँक खात्याचे स्टेटमेंट व अन्य पुरावा.
वर नमूद सर्व कागदपत्रांच्या ठळक व सुस्पष्ट दिसणा-या २ झेरॉक्स प्रती आणाव्यात, असे आवाहन करण्यात आले आहे.

 Ahilyanagar News : हाय गर्मी… तापमानाचा पारा चढला! थंडावा मिळवण्यासाठी कुत्र्यांनी शोधला अनोखा ‘थंडगार’ निवारा

Web Title: Satarakalikai industries sampark agro fraud patan eow satara appeal to investors marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 17, 2026 | 03:09 PM

Topics:  

  • Froud
  • Marathi News
  • Patan News
  • Satara

संबंधित बातम्या

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक
1

दिव्यांगांचा संताप अनावर! जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनापर्यंत लोटांगण; पोलिसांशी शाब्दिक चकमक

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा
2

Satara News: स्मार्ट मीटर सक्तीविरोधात सातारकरांचा जनआक्रोश मोर्चा; जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक, सरकारला आंदोलनाचा इशारा

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात
3

Russian Oil Imports: जग पाहतच राहिलं आणि भारताने खेळली जबरदस्त खेळी; जूनमध्ये कच्च्या तेलाची रेकॉर्डतोड आयात

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?
4

Magicbricks चा धमाका! 80 लाख युनिक व्हिजिटर्ससह रिअल इस्टेट क्षेत्रात अव्वल; पाहा 99acres आणि Housing.com ची काय स्थिती?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.