Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

नाशिक विधान परिषदेतून विजयानंतरही सत्यजीत तांबेंबाबत सस्पेन्स कायम, भाजपात जाणार की काँग्रेसमध्येच राहणार? काय म्हणाले नाना पटोले आणि अजित पवार?

“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे.

  • By Sunil Chavan
Updated On: Feb 03, 2023 | 03:28 PM
नाशिक विधान परिषदेतून विजयानंतरही सत्यजीत तांबेंबाबत सस्पेन्स कायम, भाजपात जाणार की काँग्रेसमध्येच राहणार? काय म्हणाले नाना पटोले आणि अजित पवार?
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई – विधान परिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाच्या पाच जागांसाठीच्या निवडणुकीचे निकाल समोर आले आहेत. या निवडणुकीत महाविकास आघाडीने भाजपा-शिंदे गटावर मात केली आहे. नाशिक पदवीधर मतदारसंघ या निवडणुकीच्या केंद्रस्थानी होता. या जागेवर विजयी उमेदवार सत्यजित तांबे यांनी काँग्रेस पक्षाशी बंडखोरी करून अपक्ष म्हणून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. त्यानंतर सत्यजित तांबेंच्या या बंडखोरीमागे भाजपाचाच हात आहे, असा दावा काँग्रेसकडून केला जात होता. त्यावरच आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाष्य केले आहे. नाशिक जागेसाठी भाजपाने केलेली खेळी आमच्या जिव्हारी लागलेली आहे. त्या भागातून आमचा एक नेता त्यांनी नेला असला तरी तेथून आगामी काळात आम्ही ५० आमदार निर्माण करणार, असे नाना पटोले म्हणाले. ते आज (३ फेब्रुवारी) पत्रकार परिषदेत बोलत होते.

जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल
“भाजपा दुसऱ्यांचे घर फोडते. दुसऱ्यांचे घर फोडताना ते हसत आहेत. जेव्हा त्यांचे घर फुटेल तेव्हा त्यांना समजेल असे सूचक विधान मी केले होते. आज अमरावती, नागपूर अशा दोन्ही विभागांमध्ये भाजपाच्या अनेक नेत्यांनी आम्हाला मदत केलेली आहे. नाशिकमध्ये काँग्रेसचे घर तोडण्याचा प्रयत्न केला गेला. त्रास देण्याचा प्रयत्न झाला. हाच त्रास आमच्या जिव्हारी लागलेला आहे. त्यांनी आमचा एक नेता नेला. पुढच्या काळात नाशिकमधून मी काँग्रेसचे पन्नास आमदार निर्माण करेन. तशी रणनीती आम्ही आखली आहे. त्या रणनीतीमध्ये आम्हाला यश येईल,” असे नाना पटोले यांनी सांगितले.

राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना मदत केली
सत्यजित तांबे यांच्या विजयासाठी राष्ट्रवादीच्या नेत्यांनी मदत केली, असे विधान अजित पवार यांनी केल्याचे नाना पटोले म्हणाले. तसेच महाविकास आघाडीच्या बैठकीत यावर चर्चा केली जाईल, असेही नाना पटोले यांनी सांगितले. “अजित पवार यांनी एक चांगला खुलासा केला आहे. राष्ट्रवादीने सत्यजित तांबे यांना मदत केली आहे, असे अजित पवार म्हणाले. अजित पवार ही जबाबदार व्यक्ती आहेत. एक जबाबदारी व्यक्ती असे बोलत असेल तर आमच्या मनात चिंता आहे. जेव्हा महाविकास आघाडीची बैठक होईल, त्यात या सर्व बाबींचा खुलासा होईल. महाविकास आघाडीच्या उमेदवाराला पूर्ण ताकद दिली असती, तर तो उमेदवार निवडून आला असता,” असेही नाना पटोले म्हणाले.

Web Title: Satyajeet tambe even after winning from nashik vidhan parishad there is still suspense about satyajeet tambe will he go to bjp or stay in congress what did nana patole and ajit pawar say

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 03, 2023 | 03:28 PM

Topics:  

  • Aditya Thackeray
  • ajit pawar
  • amit shaha
  • Ashish Shelar
  • Cm Eknath Shinde
  • Congress
  • J. P. Nadda
  • jayant patil
  • Maharashtra BJP
  • mit thackeray
  • uddhav thackerye

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा
1

Devendra Fadnavis : २०२६ ठरणार पदभरतीचे वर्ष, देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?
2

शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर, आज राज्यभर तीव्र आंदोलन; नेमकं काय आहेत मागण्या?

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा
3

स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकीसाठी काँग्रेसची जोरदार तयारी; ‘या’ तारखेला होणार विचारमंथन कार्यशाळा

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली
4

कॉंग्रेस नेत्याची जीभ वळवळली! RSS चा दहशतवादी संघटना असा उल्लेख; BJP ने प्रत्युत्तर देत लाजच काढली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.