
शाळांना पोषण आहारासाठी परवाना सक्ती नको! मुख्याध्यापक संघ आक्रमक, बहिष्काराचा इशारा
Chandrapur News: चंद्रपुरात वाहतूक नियम तोडणाऱ्यांवर पोलिसांचा बडगा; 19 हजारांहून अधिक जणांवर कारवाई
शासनामार्फत महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये इयत्ता पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजना राबवली जात आहे. त्यासाठी शासनाकडून नेमून दिलेल्या यंत्रणेमार्फत आवश्यक अन्नधान्य पुरवण्यात येते. सदर अन्नधान्य मिळाल्यानंतर शाळा, स्वयंपाकी / मदतनीस अथवा विविध बचत गट अथवा केंद्रीय स्वयंपाक गृह यांच्यामार्फत अन्न शिजवून वितरित करतात. याबाबतीत शाळा प्राधिकरणास शासनाकडून अथवा इतर यंत्रणेकडून कोणताही आर्थिक मोबदला मिळत नाही. (फोटो सौजन्य – AI Created)
अन्न व औषध प्रशासन विभागाच्या आयुक्तांनी २८ जुलै २०२६ रोजी काढलेल्या आदेशानुसार राज्यातील प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजना राबविणाऱ्या प्रत्येक शाळेत अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) विनिमय २०११ नुसार नोंदणी करण्यास आदेशित करण्यात आले आहे.
अन्न सुरक्षा व मानके (अन्न व्यवसायांचे परवाना व नोंदणी) विनिमय २०११ च्या नियम २.१.१ व २.१.७ नुसार ज्या अन्न तयार करून विक्री करणाऱ्या व्यावसायिक यंत्रणेचा वार्षिक व्यवहार १.५ कोटी पर्यंत आहे त्यांना नोंदणी व ज्या यंत्रणेचा वार्षिक व्यवहार १.५ कोटीपेक्षा जास्त आहे. त्यांना परवाना सक्तीचा आहे. त्यामुळे शाळांना हे नियम लागू होत नाहीत कारण शाळा अन्न तयार करून विक्री करण्याचा व्यवसाय करत नसल्याची बाब मुख्याध्यापक संघ महामंडळाने राज्याच्या शिक्षण आयुक्तांच्या निदर्शनास आणून दिली आहे.
शालेय पोषण आहार योजनेबाबत मुख्याध्यापकांवरील जबाबदारी कमी केली असून सर्व जबाबदारी बचत गटांकडे असताना पुन्हा नाहक मुख्याध्यापकांना त्रास देण्याचा हा प्रकार असल्याचे संघटनेचे म्हणणे आहे. त्यामुळे शाळांना प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजना नोंदणी/ परवाना करण्याची सक्ती रद्द करण्यात यावी तसेच प्रधानमंत्री पोषण आहार सक्ती निर्माण योजना स्वतंत्र यंत्रणेमार्फत चालवण्यात यावी, अशी मागणी मुख्याध्यापक संघ महामंडळाने शिक्षण आयुक्तांकडे केली आहे.
Raigad News: महाडकरांना अखेर मोठा दिलासा! पाणीटंचाई दूर, नियमित पाणीपुरवठा पूर्ववत
ही मागणी मान्य न झाल्यास राज्यातील खाजगी अनुदानित शाळांतील सर्व मुख्याध्यापक प्रधानमंत्री पोषण आहार शक्ती निर्माण योजनेवर बहिष्कार टाकतील असा इशारा महामंडळाचे अध्यक्ष तानाजी माने, कार्याध्यक्ष आमदार ज्ञानेश्वर म्हात्रे यांनी दिला आहे.