पालिकेच्या 14 शाळांमध्ये केवळ 695 विद्यार्थी (File Photo : Student)
पुणे : पुण्यासह पिंपरी-चिंचवडमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. यातच हवामान विभागाकडून आज (दि.26) विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरातील सर्व शाळा व महाविद्यालयांना गुरुवारी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. याबाबतचा निर्णय जिल्हाधिकारी डॉ. सुहास दिवसे यांनी घेतला आहे.
हेदेखील वाचा : अतिवृष्टीमुळे हैराण झालेल्या हिमाचल प्रदेशातील नागरिकांना आता उष्णतेचा बसतोय फटका; शिमल्यात 30 वर्षांचा रेकॉर्ड मोडला
हवामान विभागाकडून पुणे जिल्ह्यासाठी पुढील 24 तासांसाठी ‘ऑरेंज अलर्ट’ जारी करण्यात आला आहे. पुणे शहर आणि जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. अनेक ठिकाणी झाडांची पडझड झाल्याचे दिसून आले. इतकेच नाहीतर काही घरांमध्ये पावसाचे पाणीदेखील गेले. बुधवारी झालेला पाऊस आणि हवामान विभागामार्फत देण्यात आलेला अंदाज या सर्व पार्श्वभूमीवर जिल्हा प्रशासनामार्फत पुणे आणि पिंपरी चिंचवड या दोन शहरातील शाळा, महाविद्यालय यांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
मुंबई, पुण्यासह सातारा जिल्ह्यातील मायणी येथे ढगफुटीसद़ृश पाऊस झाला. या पावसामुळे सर्वत्र एकच हाहा:कार उडाला असून, मल्हारपेठ-पंढरपूर महामार्गासह अनेक रस्ते अक्षरश: पाण्याखाली गेल्याचे पाहिला मिळाले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. या भागातील पिकांचे नुकसानही झाले. पावसाचे पाणी अनेक घरांमध्ये घुसले आहे.
विजांच्या कडकडाटासह पुण्यात पाऊस
पुणे शहरासह जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागात मुसळधार पाऊस झाला. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. गुरुवारी सकाळीदेखील अनेक भागांत पाऊस बरसताना दिसून आला. या पावसामुळे रस्ते जमलय झाले.
हवामान विभागाकडून ‘अलर्ट जारी’
भारतीय हवामान विभागाकडून बुधवारी रात्री पावसाचा अलर्ट देण्यात आला आहे. त्यात IMD मुंबईने म्हटले की, ‘आज ते उद्या सकाळी (दि.२६) पर्यंत पुणे, रायगड, रत्नागिरी या ठिकाणी वादळ व विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे. नागरिकांनी सतर्क राहावे’.
हेदेखील वाचा : पावसाळ्यातही झाला नाही तेवढा कोल्हापुरातील ‘या’ ठिकाणी झाला पाऊस; नाले-ओढ्यांना अक्षरश: पूर