सौजन्य : iStock
शिमला : हिमाचल प्रदेशात मागील काही दिवसांत मुसळधार पाऊस झाला होता. मात्र, आता या ठिकाणी मान्सूनचा वेग मंदावला आहे. पाऊस कमी झाला असला तरी राज्यातील नागरिकांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. कारण, आता पावसानंतर ऐन सप्टेंबरच्या अखेरीस उष्णतेची लाट आल्याचे पाहिला मिळत आहे. राजधानी शिमला येथे या उष्णतेच्या लाटेने मागील 30 वर्षांच रेकॉर्डच मोडित काढला आहे.
हेदेखील वाचा : अतिवृष्टीमुळे बाधीत शेतकऱ्यांसाठी 237 कोटीहून अधिक निधी मंजूर, जिल्हानिहाय निधीवाटपाची यादी जाहीर
राजधानी शिमलामध्ये सप्टेंबरमध्ये दिवसाचे तापमान तीन दशकांनंतर 28 अंश सेल्सिअस नोंदवले गेले. यापूर्वी सप्टेंबर 1994 मध्ये शिमलाचे कमाल तापमान 28.6 अंश होते. कल्पा, कुफरी, नारकंडा आणि डलहौसी या इतर थंड डोंगराळ भागातही कमाल तापमानात वाढ झाली. मैदानी भागात मे महिन्याप्रमाणेच उष्णतेची लाट दिसून येत आहे. हमीरपूर, कांगडा, बिलासपूर आणि उना येथे कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसवर पोहोचले आहे.
ढग नसल्यामुळे हिल स्टेशनमध्येही उष्णतेमुळे लोक हैराण झाले आहेत. दरम्यान, मुसळधार पावसानंतर दरड कोसळली होती. त्यामुळे 23 रस्ते अजूनही बंद आहेत. त्यापैकी सर्वाधिक 10 रस्ते कांगडा जिल्ह्यातील आहेत. मंडी जिल्ह्यात सहा रस्ते, कुल्लूमध्ये चार, शिमल्यात दोन आणि सिरमौरमध्ये एक रस्ते बंद आहेत.
28 आणि 29 तारखेलाही हलका पाऊस?
मान्सून आता अंतिम टप्प्यात असून 26 आणि 27 सप्टेंबर रोजी त्याचा प्रभाव दिसून येईल. या कालावधीत राज्याच्या अनेक भागात मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज आहे. 26 सप्टेंबरपासून सक्रिय मान्सूनमुळे पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 26 आणि 27 सप्टेंबर रोजी मैदानी आणि मध्य पर्वतीय भागात मुसळधार पाऊस आणि गडगडाट इशारा जारी करण्यात आला आहे.
हेदेखील वाचा : सतत लॅपटॉपवर काम करून डोळ्यांचा ताण वाढला आहे? मग ‘या’ टिप्स वापरून डोळ्यांच्या समस्या होतील दूर