Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 13 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

शाहू कला मंदिरात कंत्राटी कर्मचारी बेपत्ता अन् साऊंड सिस्टिम ठप्प; नगरपालिकेच्या कंत्राटी व्यवस्थेचा खेळखंडोबा

शाहू कला नाट्यगृहासाठी चार कंत्राटी कर्मचारी दाखवले जात असले, तरी रोजच्या कामावर फक्त एकच कर्मचारी दोन तास हजर राहत असल्याचे समोर आले आहे. उर्वरित कर्मचारी मात्र ‘बेपत्ता’ असूनही त्यांचा पगार नियमित काढला जातो.

  • By प्रीति माने
Updated On: Apr 07, 2026 | 04:12 PM
Shahu Kala Mandir bad condition No Contractual Staff Sound System Shut Down Satara News

Shahu Kala Mandir bad condition No Contractual Staff Sound System Shut Down Satara News

Follow Us
Follow Us:

Satara News : सातारा : शाहू कला मंदिरातील कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून “काम कमी, पगार जास्त” या प्रकाराने नगरपालिकेचा आर्थिक बोजा वाढत असल्याची चर्चा रंगली आहे. नाट्यगृह अधीक्षक शैलेश अष्टेकर हे धडाडीचे अधिकारी असताना कंत्राटी कर्मचारी घरबसल्या पगार कसा घेतात याविषयी प्रचंड आश्चर्य आहे.

 

प्रत्यक्षात नाट्यगृहासाठी चार कंत्राटी कर्मचारी दाखवले जात असले, तरी रोजच्या कामावर फक्त एकच कर्मचारी दोन तास हजर राहत असल्याचे समोर आले आहे. उर्वरित कर्मचारी मात्र ‘बेपत्ता’ असूनही त्यांचा पगार नियमित काढला जात असल्याचा आरोप होत आहे. माहितीनुसार, या कर्मचाऱ्यांना दरमहा सुमारे २५ हजार रुपये मानधन दिले जाते. मात्र, प्रत्यक्ष ड्युटी फक्त दोन तासांची असल्याने उर्वरित वेळ ते कामावरच नसतात. नाट्यप्रयोगाच्या वेळी पूर्वी दोन कर्मचारी हजर असायचे, परंतु आता एकाच व्यक्तीकडे जबाबदारी दिल्याने व्यवस्थापनाचा बोजवारा उडाला आहे. या निष्काळजीपणाचा थेट परिणाम नाट्यगृहाच्या सुविधांवर झाला असून साऊंड सिस्टिम अनेक दिवसांपासून बंद अवस्थेत आहे. दुरुस्तीबाबत कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. त्यामुळे कलाकार आणि प्रेक्षक दोघांनाही त्रास सहन करावा लागत आहे.

हे देखील वाचा : कृतघ्न मुलगा अन् कुटुंबाच्या पूर्वपुण्याईवर खासदार; काँग्रसेनी पार्थ पवारांना धरलं धारेवर

नगरपालिकेतील काही स्रोतांच्या मते, या प्रकरणात कंत्राटी नियुक्त्यांमध्ये पारदर्शकतेचा अभाव असून संबंधितांची नावे आणि हजेरी तपासली, तर मोठा घोटाळा उघड होण्याची शक्यता आहे. तरीही प्रशासनाकडून याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले जात असल्याची टीका होत आहे.
दरम्यान, “आठ तास ड्युटी बंधनकारक करावी, अनुपस्थित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी आणि नाट्यगृहाची सुविधा तात्काळ पूर्ववत करावी,” अशी मागणी स्थानिकांकडून जोर धरत आहे. या प्रकरणात वरिष्ठ कलाकार आणि सांस्कृतिक क्षेत्रातील मान्यवर पुढे येऊन मोठा खुलासा करतील, अशीही चर्चा रंगली आहे.

हे देखील वाचा :  “सुनेत्रा पवारांना महाविकास आघाडीकडून अधिकृत पाठिंबा नाही पण..; खासदार संजय राऊतांनी स्पष्टच सांगितलं

अष्टेकर साहेब थोडासा खुलासा कराल का? 

सातारा पालिकेचे ठेके आणि राजकीय दबाव यांची विळ्या भोपळ्याचे नाते आहे .त्यामुळे येथे ठेकेदाराचे ठराविक लाडके कर्मचारीदोन तास काम करून घरी जातात .प्रत्यक्ष प्रयोगाच्या वेळी दोन ते तीनच कर्मचारी उपस्थित असतात .नाट्यगृह अधीक्षक शैलेश अष्टेकर हे अत्यंत कर्तव्यनिष्ठ समजले जातात असे असताना सुद्धा त्यांच्या हाताखालीलकर्मचारी त्यांना अजिबात दाद देत नसल्याची तक्रार आहे .साऊंड सिस्टिम च्या दुरुस्तीचे कागदोपत्री खेळ रंगले प्रत्यक्षात सिस्टीम मात्र दुरुस्त झालेली नाही .त्यामुळे अष्टेकर साहेबांनी त्याचा खुलासा करावा अन्यथा सातारकरांना नगराध्यक्षांकडे विचारावे लागेल असा सवाल रंगकर्मी करत आहेत .

Web Title: Shahu kala mandir bad condition no contractual staff sound system shut down satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 07, 2026 | 04:12 PM

Topics:  

  • Satara Municipality
  • Satara News

संबंधित बातम्या

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा
1

Wai News : दोन खोल्यांत आरोग्यसेवा; मालतपूरच्या सुसज्ज आरोग्य केंद्राचा प्रश्न रखडला, रोहित वाडकर यांचा आमरण उपोषणाचा इशारा

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब
2

Satara News : साताऱ्याच्या ‘आझाद’ची राज्यात डरकाळी; तीन सुवर्णपदकांसह पटकावला ‘बेस्ट डॉग’चा किताब

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक
3

Satara News: शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ज्येष्ठाला गंडा; साताऱ्यात १ कोटी ७१ लाखांची फसवणूक

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा
4

सभापतींच्या गावातीलच नागरिक बांधकाम विभागाला वैतागले; अधिकारी-ठेकेदारांना गावात फिरकू न देण्याचा संतप्त नागरिकांचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.