Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 5 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Election : महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा…; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा, स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत शंभूराज देसाई यांनी दिले.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 16, 2026 | 01:23 PM
महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा...; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

महायुतीमधील घटक पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी, अन्यथा...; शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत

Follow Us
Follow Us:
  • महायुतीमधील पक्षांकडून सन्मानाची वागणूक मिळावी
  • …अन्यथा आमच्याकडे पर्याय खुले
  • शंभूराज देसाईंचे स्पष्ट संकेत
सातारा : महायुतीमधील घटक पक्षांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांच्या संदर्भाने शिवसेना शिंदे गटातील शिवसैनिकांचा सन्मान करावा. आत्मसन्मान मिळाला तर निश्चितच महायुती म्हणून विचार होईल. वाटाघाटी यशस्वी झाल्या तर एकत्रितपणे निवडणुकीला सामोरे जाऊ. मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा, स्वबळावर लढू किंवा इतर चर्चेचे पर्याय आमच्यासाठी खुले आहेत, असे स्पष्ट संकेत सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी पत्रकार परिषदेत दिले.

 

साताऱ्यात एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचा मेळावा नुकताच पार पाडला. या मेळाव्यात मार्गदर्शन केल्यानंतर शंभूराज देसाई यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी व्यासपीठावर आमदार महेश शिंदे, संजू राजे नाईक निंबाळकर, अनिकेत राजे नाईक निंबाळकर, कराडचे नगराध्यक्ष राजेंद्र यादव, जिल्हाध्यक्ष रणजितसिंह भोसले, शिंदे गटाच्या जिल्हा संपर्कप्रमुख रेशमाताई जगताप इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

देसाई पुढे म्हणाले, महायुतीला घटक मानून जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत जागा वाटपाला आमचे प्राधान्य राहील मात्र तिन्ही घटक पक्षांनी शिवसेनेला सन्मानाची वागणूक द्यावी. जागा वाटपात प्राधान्याने आमचा विचार व्हायला हवा. वाटाघाटी यशस्वी झाल्या तरच महायुती म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. मानसन्मान राखला तर ठीक अन्यथा स्वबळावर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आमचे चर्चेचे सर्व पर्याय खुले आहेत. जो आमच्याशी समविचाराने चर्चा करेल त्या बाबतीत नक्कीच राजकीय समीकरणांचा विचार केला जाईल, असे स्पष्ट संकेत त्यांनी दिले .

पालिका निवडणुकीप्रमाणे महायुती झाली नाही तर यावेळी स्वतंत्र निवडणूक शिवसेना लढवणार आहे. शिवसेना पूर्ण ताकतीने आपल्या पद्धतीने निवडणुकीत उतरेल. कराडमध्ये पालिका निवडणूक ज्या पद्धतीने लढवली त्याच पद्धतीने जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका लढवल्या जातील यावेळी कोणाचाही विचार करणार नाही. फलटण पालिकेत आमचे काही अंदाज चुकले त्यामुळे आम्हाला अपयश आल्याचे त्यांनी मान्य केले. राष्ट्रवादी अजित पवार यांच्या पक्षाबरोबर अद्याप कोणताही निर्णय झालेला नाही तसेच भारतीय जनता पार्टी कडून सुद्धा कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव आपल्याला आला नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. प्रत्येक विधानसभा मतदारसंघ निहाय पक्ष निरीक्षक नेमून त्यांच्याकडून अहवाल घेतले जाणार आहेत. पक्षाने निवडणूक लढवण्याची पूर्ण तयारी केली आहे. त्यासाठीच शिवसैनिकांची बैठक घेण्यात आल्याचे देसाई यांनी सांगितले. जिल्हा परिषद गट आणि पंचायत समिती गण निहाय इच्छुकांची माहिती घेण्यात आली आहे, असे देसाई म्हणाले.

हे सुद्धा वाचा : पुण्याचा कारभार कोणाच्या हातात जाणार? निकालाआधीच रविंद्र धंगेकरांचा मोठा विश्वास

Web Title: Shambhuraj desai has presented shiv senas position regarding the zilla parishad elections

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 16, 2026 | 01:23 PM

Topics:  

  • Election News
  • Satara News
  • Shambhuraj Desai
  • ZP Election

संबंधित बातम्या

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा
1

Satara News: मनोज जरांगे पाटलांच्या समर्थनात वाईत रस्ता रोको; सकल मराठा समाजाचा राज्य सरकारला थेट इशारा

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या
2

Wai News : दिव्यांग शेतकऱ्याच्या उपोषणाकडे प्रशासनाची डोळेझाक; तामखडा शिवारात 1500 ग्रामस्थांचा ठिय्या

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!
3

Maratha Reservation : कराड-चिपळूण मार्गावर ‘रास्ता रोको’, वारुंजी फाट्यावर भगवे वादळ!

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी
4

Satara News: सातारा जिल्ह्यात आरोग्य आणि शिक्षणाचा विकास; स्मार्ट आरोग्य केंद्रे व आदर्श शाळांसाठी कोट्यवधींचा निधी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.