
Sugarcane Crushing Record Indapur Baramati, Chhatrapati, Chhatrapati Sugar Factory, Baramati News, Indapur News,
छत्रपती कारखान्याचे अध्यक्ष पृथ्वीराज जाचक, उपाध्यक्ष शिवाजीराव निंबाळकर तसेच सर्व संचालक मंडळ यांच्या नेतृत्वाखाली कारखान्याने या ऊस गळीत हंगामाचे उत्कृष्ट नियोजन केले आहे.कारखान्याच्या ३० ऑक्टोबर २०२६ रोजीच्या दैनंदिन गाळप अहवालानुसार, एका दिवसात ८ हजार ६८८ मेट्रिक टन उसाचे गाळप करण्यात आले. यामध्ये सभासदांच्या उसाचे ४ हजार ५१० टन, तर बिगरसभासदांच्या उसाचे ४ हजार १७८ टन गाळप झाले. हंगाम सुरू झाल्यापासून कारखान्याने गाळपाची गती टिकवून ठेवत विक्रमी कामगिरीच्या दिशेने वाटचाल सुरू केली आहे. दरम्यान छत्रपती कारखान्याने ऊस उत्पादकांच्या ऊसाला पहिली उचल ३५०१ रुपये तर कामगारांना पंधरा टक्के बोनस जाहीर केला आहे.
आता प्रकरण संपणार? Vinesh Phogat च्या ‘त्या’ याचिकेवर हायकोर्टाचे WFI ला आदेश; दोन आठवड्यात…
कारखान्याच्या अहवालानुसार, हंगामात आतापर्यंत सभासदांच्या उसाचे १ लाख २४ हजार ४४३ टन, तर बिगरसभासदांच्या उसाचे ७० हजार २८९ टन गाळप झाले आहे. दोन्ही मिळून एकूण गाळपाचा आकडा १ लाख ९४ हजार ७३२ टनांवर पोहोचला आहे. कारखान्याने ऊस उपलब्धतेनुसार गाळपाचे नियोजन केल्याचे या आकडेवारीवरून स्पष्ट होते.
साखर कारखानदारीत गाळपाचा वेग, साखर उतारा, यंत्रणेची कार्यक्षमता आणि ऊस वाहतुकीचे नियोजन या बाबींना विशेष महत्त्व असते. या पार्श्वभूमीवर श्री छत्रपती कारखान्याने पहिल्या २० दिवसांत केलेली कामगिरी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
Diwali 2026 : शेतकऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या दोन लाख शेतकरी कुटुंबांची
Ans: कारखान्याने गळीत हंगामाच्या सुरुवातीच्या अवघ्या २० दिवसांत तब्बल १ लाख ९४ हजार ७३२ मेट्रिक टन उसाचे विक्रमी गाळप केले आहे.
Ans: ३० ऑक्टोबर रोजी कारखान्याने एकाच दिवसात ८ हजार ६८८ मेट्रिक टन (सभासदांचा ४,५१० टन आणि बिगरसभासदांचा ४,१७८ टन) उसाचे उच्चांकी गाळप केले आहे.
Ans: कारखान्याने ऊस उत्पादक शेतकऱ्यांना ३,५०१ रुपये पहिली उचल आणि कामगारांना १५ टक्के बोनस जाहीर केला आहे.