Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 17 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न! शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय खळबळ; ‘रयत’च्या बैठकीत बंद दाराआड जोरदार चर्चा

Sharad Pawar Satara Visit: आजारपणातून सावरल्यानंतर प्रथमच साताऱ्यात दाखल झालेल्या पवारांचे शासकीय विश्रामगृह येथे तुतारीच्या जयघोषात आणि घोषणांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: May 08, 2026 | 09:37 PM
साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न!

साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न!

Follow Us
Follow Us:

 

  • साताऱ्यात पुन्हा एकदा ‘पवार’ पॅटर्न!
  • शरद पवारांच्या उपस्थितीत राजकीय खळबळ
  • ‘रयत’च्या बैठकीत बंद दाराआड जोरदार चर्चा
सातारा : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सातारा दौऱ्याने शनिवारी जिल्ह्याच्या राजकारणात पुन्हा एकदा प्रचंड खळबळ उडाली. आजारपणातून सावरल्यानंतर प्रथमच साताऱ्यात दाखल झालेल्या पवारांचे शासकीय विश्रामगृह येथे तुतारीच्या जयघोषात आणि घोषणांच्या कडकडाटात जंगी स्वागत करण्यात आले. कार्यकर्त्यांच्या प्रचंड गर्दीमुळे संपूर्ण परिसर राष्ट्रवादीमय झाला होता.

मुंबईवरून सायंकाळी चारच्या सुमारास पवारांचे वाहन शासकीय विश्रामगृहात दाखल होताच “शरद पवार आगे बढो”, “तुतारी वाजणारच” अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्त्यांचा उत्साह एवढा प्रचंड होता की, खाजगी सुरक्षा रक्षक आणि सातारा पोलिसांना बंदोबस्तासाठी अक्षरशः धावपळ करावी लागली. यावेळी खासदार सुप्रिया सुळे, राष्ट्रवादी प्रदेशाध्यक्ष तथा माजी आमदार शशिकांत शिंदे, जिल्हाध्यक्ष माजी आमदार बाळासाहेब पाटील, राजकुमार पाटील यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

९ मे, कर्मवीर भाऊराव पाटील पुण्यतिथी आणि शरद पवारांचा सातारा दौरा हे समीकरण राज्याच्या राजकारणात नेहमीच चर्चेचा विषय राहिले आहे. राष्ट्रवादीत फूट पडून दोन गट निर्माण झाले असले तरी साताऱ्यातील पवारनिष्ठ कार्यकर्ता अजूनही शरद पवारांभोवती ठामपणे उभा असल्याचे चित्र या दौऱ्यात स्पष्ट दिसून आले.

Baramati Politics: मोठी बातमी! शरद पवारांनी बोलवली पवार कुटुंबाची तातडीची बैठक

दरम्यान, कर्मवीर पुण्यतिथीनंतर होणारी रयत शिक्षण संस्थेची बैठक अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जात असून संस्थेतील आगामी संघटनात्मक बदल, धोरणात्मक निर्णय आणि पुढील दिशा यावर बंद दाराआड जोरदार चर्चा सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या बैठकींमध्ये रयत शिक्षण संस्थेचे महत्त्वाचे पदाधिकारी उपस्थित होते.

याशिवाय आगामी स्थानिक राजकारण, जिल्ह्यातील बदलती समीकरणे आणि राष्ट्रवादीच्या संघटनात्मक पुनर्बांधणीवरही सखोल चर्चा झाल्याचे समजते. प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे आणि माजी आमदार बाळासाहेब पाटील यांच्यावर जिल्ह्यात पक्ष बळकट करण्याची मोठी जबाबदारी सोपवली जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

शासकीय विश्रामगृहातील अँटी चेंबरमध्ये तब्बल दीड तास सुरू असलेल्या बैठकींमुळे राजकीय चर्चांना आणखी उधाण आले. खासदार सुप्रिया सुळे या स्वतः सर्व बैठका, हालचाली आणि समन्वयावर बारकाईने लक्ष ठेवून होत्या. राज्यातील महिला अत्याचारांच्या वाढत्या घटना आणि पोलीस तपास यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत त्यांनी तीव्र नाराजी आणि चिंता व्यक्त केल्याची माहितीही समोर आली आहे.

Baramati Assembly bypoll Elections 2026: बारामतीत ३५ वर्षांनंतर पुन्हा पोटनिवडणूक! १९९१ मध्ये अजित पवारांनी रचला होता इतिहास

Web Title: Sharad pawar satara visit rayat shikshan sanstha meeting political update

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 08, 2026 | 09:36 PM

Topics:  

  • maharashtra
  • NCP Chief Sharad Pawar
  • Satara
  • Sharad Pawar

संबंधित बातम्या

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण
1

सातारा वनविभागाला वन्यजीव बचावासाठी आधुनिक बळ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या हस्ते रुग्णवाहिका आणि रेस्क्यू वाहनांचे लोकार्पण

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल
2

मुंबईकरांनो, आता तुरुंगवासासाठीही तयार राहा! २० दिवसांत राँग साईडने गाडी चालवल्याबद्दल ३४३ चालकांवर गुन्हा दाखल

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान
3

Mumbai News: मोहिमेचा धडाका १४ दिवसांत ६८ किलोमीटरचे पदपथ अडथळामुक्त! मुंबईत पालिकेचे ‘पादचारी प्रथम’ अभियान

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा
4

Mumbai University: मुंबई विद्यापीठ प्रशासनाचा विद्यार्थ्यांशी थेट संवाद; समस्या, अपेक्षा आणि शैक्षणिक गुणवत्तेवर चर्चा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.