Sharad Pawar Targeted Pm Modi Said Prime Minister Has Proved His Allegations Against Ncp Are False This Is A Good Side For Us Nryb
पंतप्रधानांनी सिद्ध केले त्यांनी राष्ट्रवादीवर भ्रष्टाचाराचे केलेले आरोप खोटे, आमच्यासाठी ही जमेची बाजू : शरद पवार
आज राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ( NCP chief Sharad Pawar ) यांनी कराड येथे स्वर्गीय यशंवराव चव्हाण यांच्या प्रीतिसंगम स्मृतिस्थळाला जाऊन दर्शन घेतल्यानंतर पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. यावेळी त्यांनी माध्यमांशी बोलताना अनेक गोष्टींवर भाष्य करीत पंतप्रधान मोदींवर निशाणा ( Sharad Pawar Targeted PM Modi ) साधत, त्यांनी आमच्या पक्षावर भ्रष्टाचाराचा आरोप करीत, त्यांच्यावर चौकशी लावली जाणार असल्याचे सांगितले होते. परंतु, त्यांनी आमच्या सहकाऱ्यांनाच मंत्रिमंडळात स्थान दिल्याने त्यांचे आरोप खोटे असल्याचे त्यांनीच सिद्ध केले आहे.
कराड : काल महाराष्ट्राच्या राजकारणात ( Maharashtra Power Politics ) काल मोठा भूकंप होऊन मोठे सत्तेचे राजकारण घडले. शिवसेनेनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्येदेखील उभी मोठी फूट पडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते तथा विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी भाजप-शिंदे सरकारसोबत सत्तेत सहभागी होत, उपमुख्यमंत्रिपदाची (DCM) शपथ घेतली. महाराष्ट्राच्या राजकारणात मोठे सत्तानाट्य पाहायला मिळाले.
#WATCH | I have past experiences of MLAs leaving the party…Results will be good in future: NCP chief Sharad Pawar pic.twitter.com/vWv8wRPIwi
आज शरद पवार यांनी यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीस्थळाचे दर्शन घेतल्यानंतर माध्यमांशी संवाद साधताना, मी गुरूपौर्णिमेच्या मुहूर्तावर पक्षबांधणीसाठी निघालो असल्याचे सांगितले आहे. यावेळी त्यांनी पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. यावेळी ते म्हणाले की, जर आमच्या पक्षावर त्यांनी एवढे भ्रष्टाचाराचे आरोप केले तर त्यांनी आमच्या सहकाऱ्यांना सत्तेत सामील करण्यापासून रोखणे गरजेचे होते. परंतु त्यांनी तसे केले नाही. उलट त्यांना सत्तेत स्थान दिले याचा अर्थ हा आहे की, त्यांनी केलेले आरोप खोटे होते. ही राष्ट्रवादीकरिता जमेची बाजू असणार आहे.
तरुणांना नाउमेद करणारा नाही
आमचे अनेक सहकारी ज्यांना हजारो कार्यकर्त्यांनी शक्ती दिली पाठिंबा दिला. त्यांच्याकडून पक्षबांधणीची अपेक्षा असताना हे संगठन बळकट करण्याचे त्यांचे काम असताना त्यांनी आमच्या विचारधारेपासून वेगळी भूमिका घेत आमच्या विरोधी पक्षाशी संगनमत केले. धर्माधर्मामध्ये एकप्रकारचे वातावरण वेगळे करण्याचा प्रयत्न केला जातो. अशा पक्षाशी ते सत्तेत सहभागी झाले. आज देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमामधून समाजासमाजामध्ये एक प्रकारचे वेगळे वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला जातो. यावेळी सामाजिक ऐक्य प्रस्थापित करण्याचा आमचा प्रयत्न असताना, आमच्या सहकाऱ्यांनी वेगळी भूमिका घेणे चुकीचे आहे. त्यामुळे या तरुण कार्यकर्त्यांना नाउमेद करणार नाही, त्यांच्या विश्वास ढळू देणार नाही, याकरिता मी पक्षबांधणीसाठी निघालो आहे.
माझ्या स्वागतासाठी 70 ते 80 तरुण कार्यकर्ते
आमच्या सहकाऱ्यांनी, मित्रांनी वेगळी भूमिका केली. आमचा संघर्ष असलेल्या पक्षाशी आमच्या सहकाऱ्यांनी हातमिळवणी केली. त्यामुळे नवीन कार्यकर्ता नाउमेद होऊ नये यासाठी मी पक्षबांधणीसाठी बाहेर पडलो आहे. आज सकाळपासून मी गाडीत बसल्यापासून कराडला येईपर्यंत माझ्या स्वागतासाठी 70 ते 80 टक्के तरूण स्वागता आलेले होते.
Web Title: Sharad pawar targeted pm modi said prime minister has proved his allegations against ncp are false this is a good side for us nryb