Sharad Pawars Criticism Of Modi Government From Common Questions They Say Unemployment Has Increased In Country Onion Has No Price Farmers Goods Have No Price Nryb
देशात बेरोजगारी वाढली, कांद्याला भाव नाही, शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाही’, सामान्यांच्या प्रश्नांवरून शरद पवारांची मोदी सरकारवर टीका
Sharad Pawar Kolhapur Sabha : शेतकरी मोठ्या प्रमाणात आत्महत्या करीत आहेत. जीव जाणे ही साधी गोष्ट नाही. शेतीमालाला भाव नाही. शेतकऱ्याच्या डोक्यावर कर्ज आहे. नाशिकमध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या घामाची किंमत मिळत नाही. कांदा हा जगात पाठवला पाहिजे. मात्र, मोदी सरकारने या कांद्यावर प्रचंड कर बसवलेला आहे. बाहेर देशात या कांद्याला ग्राहक मिळत नाही. कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी आंदोलन केली. पण केंद्र सरकार त्याकडे दुर्लक्ष करीत आहे, असे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार म्हणाले आहेत.
भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र
कोल्हापूर येथील जाहीर सभेत बोलताना शरद पवार यांनी भाजप सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. देशात वाढत असलेल्या बेरोजगारीवरून केंद्र सरकारला लक्ष्य करीत ते म्हणाले की, या सरकारमध्ये लोक महागाईने त्रासले आहेत. आम्ही कष्ट करायला तयार आहे, घाम गळायला तयार आहे, आम्हाला नोकरी द्या अशी मागणी देशातील तरुण करीत आहेत.
दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन
शरद पवार म्हणाले की, दिल्लीमध्ये शेतकऱ्यांचे वर्षभर आंदोलन झाले. दिल्लीच्या सीमेवर शेतकऱ्यांनी कुटुंबासोबत आंदोलन केले. मोदी सरकारने त्यांच्या सहकार्याने त्यांच्याकडे ढुंकूनही पाहिले नाही. देशाच्या इतिहासात शेतकऱ्यांचा एवढा मोठा अपमान कुठल्याही सरकारने केला नाही.
मणिपूर हिंसाचारावर काही नाही
शरद पवार पुढे म्हणाले की, मणिपूरमध्ये दोन समाजाचा संघर्ष आहे. आया बहिणींची धिंड काढली जात आहे. ज्यांच्या हातात सत्ता आहे, त्यांनी महिलांना सुरक्षा दिली नाही. आया बहिणींना सुरक्षा देण्याची ताकद ज्यांच्यात नाहीत, त्यांना सत्तेत बसण्याचा अधिकार नाही.
तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात
ते म्हणाले की, आज सत्तेचा वापर विरोधी पक्षांच्या लोकांना त्रास देण्यासाठी होत आहे. तेरा महिने राज्याचा गृहमंत्री तुरुंगात जातो. त्यांना आमच्या गटात या, असे सांगण्यात आले, जर आला नाही तर, तुमची जागा तुरुंगात आहे, असेही त्यांनी सांगितले.
Web Title: Sharad pawars criticism of modi government from common questions they say unemployment has increased in country onion has no price farmers goods have no price nryb