शरद पवारांच्या आमदाराला धक्काबुक्की; बापू पठारे- बंडू खांदवेंमध्ये नेमकं काय झालं?
Bapu Pathare News: वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आमदार बापू पठारे यांना लोहगाव परिसरातील एका कार्यक्रमादरम्यान धक्काबुक्की झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे बंडू खांदवे यांच्यासोबत झालेल्या वादानंतर बापू पठारे यांना ही धक्काबुक्की झाल्याचे बोलले जात आहे.
नेपाळचा एक धबधबा जिथल्या दगडांमध्ये दिसतं हत्तीच्या मुखाचं दर्शन, फार अद्भुत आहे याचं सौंदर्य
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे शनिवारी संध्याकाळी झालेल्या एका स्थानिक कार्यक्रमादरम्यान आमदार बापू पठारे आणि अजित पवार गटाचे बंडू खांदवे यांच्यात शाब्दिक चकमक झाली. पण हा वाद चांगलाच चिघळला. यावेळी दोन्ही बाजूंमध्ये मारामारी झाल्याचेही काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याच्या कामावरून हा वाद झाल्याचे बोलले जात आहे.
प्रशासनाने काही कारणास्तव लोहगाव परिसरातील रस्त्याचे काम थांबवले होते. या निर्णयाच्या विरोधात खांदवे आंदोलन करण्याच्या तयारीत असताना याच मुद्द्यावरून दोन्ही नेत्यांमध्ये वाद झाल्याचे सांगितले जात आहे.
लोहगाव येथील वाघोली रोडवरील गाथा लॉन्स याठिकाणी माजी सैनिकांच्या सत्काराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्या कार्यक्रमासाठी बापूसाहेब पठारे या कार्यक्रमाला आले होते. तर त्याच कार्यक्रमातून लोहगाव ग्रामपंचायतीचे माजी सभापती बंडू खांदवे बाहेर पडत होते. त्याचवेळी आमदार बापू पठारे तिथे पोहचले. दोघांमध्येही सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाली, पण नंतर हा वाद चांगलाच पेटला. बापू पठारे आणि बंडू खांदवे यांचा झटापटही झाली. खांदवे यांच्याकडून आमदार पठारे यांना थेट धक्काबुक्की करण्या तआली. तर पठारे यांच्या समर्थकांना ही माहिती करळात त्यांचे समर्थकांनी तिथे गेले. त्यामुळे परिसरात तणाव चांगलाच वाढला होता.
संभाजीनगरमध्ये कार-दुचाकीचा भीषण अपघात; माजी उपनगराध्यक्षासह शिक्षकाचा मृत्यू, दोन दिवसांपूर्वीच
पण दुसरीकडे. वातवरण आणखी चिघळू नये म्हणूल पालकमंत्री अजित पवार यांनी फोनवरून पुण्याचे पोलिस आयुक्त अमितेशकुमार यांना परिस्थिती हाताळण्याचे आदेश दिली. काहीच वेळातच कार्यक्रमाच्या ठिकाणी पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला. या प्रकरणात विमानतळ पोलिस स्टेशनला तक्रार नोंदवण्यात आली.
“०८ डिसेंबर २०२३ रोजी रस्त्यांसाठी ३१ कोटी रुपये मंजूर झाले होते; तर २०२४ पर्यंत कोणाने अडवले होते? जर तुम्हाला रस्ते बांधण्याचे ज्ञान असते तर मुद्दा समजून घेतला असता, पण राजकारण म्हणून आंदोलन करणे तुम्हाला शोभते का? त्या रस्त्यावर पाणीपुरवठ्याची लाईन नव्हती, ड्रेनेज नव्हते; नागरिकांनी ती जोडली नसती तर रस्ते कसे करायचे? पाच वर्षे सत्ता मध्ये असताना आरपी मार्ग, डीपी मार्ग का तयार झाले नाहीत — कोण तरी अडवलं का? आता चुकीची यादी दाखवून लोकांना फसवण्याचे काम करतो का? समोर येऊन बोला; माझ्याबरोबर खोटं राजकारण करू नका. जनता हे माफ करणार नाही,” अशी तीव्र प्रतिक्रिया आमदार बापू पठारे यांनी व्यक्त केली.
“आमचे आंदोलन प्रशासनाविरुद्ध होते; परंतु आमदारांनी हा विषय स्वतःवर ओढून शाब्दिक वाद घातला. त्यांनी वेळ पडली तर आम्ही गाव विकत घेऊ अशी धमकी दिली. झटापटीमध्ये आमदारांचे तीन ते चार सुरक्षारक्षकांनी माझे शर्ट फाडले आणि मला मारहाणही केली,” असे बंडू खांदवे यांनी सांगितले. घटनेचे नेमके कारण आणि पुढील कारवाईबाबत अधिकृत तपशील अद्याप उपलब्ध झालेले नाहीत.