उपमुख्यमंत्री अजित पवार (फोटो- टीम नवराष्ट्र)
बारामती विमानतळ नाईट लँडिंग सुरू होण्याची शक्यता
बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी सर्वेक्षण करण्याचे निर्देश
संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक तयार करण्याचे निर्देश
मुंबई: बारामतीसह यवतमाळ, धाराशिव व लातूर विमानतळांच्या विकासासाठी महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील त्यांच्या समिती कक्षात बारामती विमानतळाचा नाईट लँडिंगसह विकास करण्यासंदर्भात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.
एमआयडीसीने तयार केलेला बारामती विमानतळ नाईट लँडिंगचा सविस्तर प्रकल्प अहवाल महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीकडे हस्तांतरित करावा. उद्योग विभागाने विमानतळ हस्तांतरणासाठी आवश्यक तो शासन निर्णय निर्गमित करावा. बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणाचा तपशीलवार बृहत आराखडा महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावा, असे निर्देशही यावेळी देण्यात आले.
महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने एअरपोर्ट ॲथॉरिटी ऑफ इंडियाच्या समन्वयाने बारामती विमानतळाचा विकास करण्यासाठी आवश्यक ते सर्वेक्षण करावे. बारामती विमानतळाच्या उन्नतीकरणासाठी संभाव्य खर्चाचे अंदाजपत्रक महाराष्ट्र विमानतळ विकास कंपनीने तयार करावे, अशा सूचनाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी यावेळी दिल्या.
Ajit Pawar : मला माझे मन सांगायचे की…; अजित पवारांकडून पुन्हा एकदा शरद पवारांचं कौतुक
यावेळी वित्त विभागाचे अपर मुख्य सचिव ओ.पी. गुप्ता, सामान्य प्रशासन विभागाचे (विमान चालन) अपर मुख्य सचिव संजय सेठी, नियोजन विभागाचे प्रधान सचिव सौरभ विजय, महाराष्ट्र विमानतळ विकास प्राधिकरणाच्या उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक स्वाती पांडेय, उपमुख्यमंत्र्यांचे सचिव डॉ. राजेश देशमुख, उद्योग विभागाचे सहसचिव श्रीकांत पुलकुंडवार, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाचे मुख्य अभियंता कैलास भांडेकर हे मंत्रालयातून तर पुण्याचे विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, एमआयडीसी पुणेचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील दूरदृश्य संवाद प्रणालीद्वारे उपस्थित होते.
पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग
पुरंदर तालुक्यातील कुंभारवळण, एखतपूर, पारगाव, मुंजवडी, खानवडी, उदाची वाडी आणि वनपुरी या सात गावांमध्ये विमानतळ उभारण्यात येणार असून, यापैकी कुंभारवळण, एखतपूर, मुंजवडी या तीन गावांमधील ३२१ हेक्टर जमिनीची मोजणी पूर्ण झाली आहे. अशी माहिती पुरंदर तालुक्याच्या प्रांत वर्षा लांडगे यांनी माहिती दिली.
Purandar Airport: पुरंदर एअरपोर्टच्या कामाला आला वेग; आतापर्यंत तब्बल…; 150 कर्मचारी तैनात
पुरंदर तालुक्यातील ज्या सात गावांमधील जमीन विमानतळासाठी संपादित केली जाणार आहे, त्याच्या मोजणीची सुरुवात शुक्रवार पासून करण्यात आली. रविवारचा दिवस वगळता या चार दिवसात म्हणजे आजपर्यंत ३२१ हेक्टर जमिनी प्रत्यक्ष मानवी मोजणी करण्यात आली आहे. यासाठी प्रशासनाचे म्हणजेच महसुलचे १५० कर्मचारी कार्यरत आहेत. या सातही गावातील जमिनीची मोजणी येत्या २० ऑक्टोबर पर्यंत पूर्ण करण्यात येणार असल्याचे लांडगे यांनी सांगितले.