Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

सर्वेनुसारच रस्त्याचे काम करावे. तसेच शेतकऱ्यांची कोणतीही चर्चा न करता त्यांना कोणतीही पूर्व सूचना न देता त्यांच्या सातबारावर सदर जागेचा बोजा चढवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत.

  • By कृपादान आवळे
Updated On: Aug 25, 2026 | 11:55 AM
मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

मायणी येथील शिंदेवाडी ग्रामस्थांनी शक्तिपीठ महामार्गाची रोखली मोजणी

Follow Us
Follow Us:

मायणी / मारुती पवार : नागपूर-गोवा या शक्तिपीठ महामार्गाच्या अधिग्रहण करावयाच्या जागेची मोजणी करणे व येथील जमीन मालकांशी समन्वय साधने यासाठी शासकीय अधिकारी खटाव तालुक्यातील शिंदेवाडी येथील आले होते. मात्र, जागेची मोजणी करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना ग्रामस्थांनी सदर वेळी तीव्र विरोध दर्शविल्याने विना मोजणी करता परत जावे लागले.

सदर मार्ग माण व खटाव तालुक्यातून जात आहे. खटाव तालुक्यातील मायणी शेजारील शिंदेवाडी येथे मार्गाची मोजणी करणे व येथील जमीन मालकांशी समन्वय साधने यासाठी शासकीय अधिकारी आले होते. अधिकारी आल्याचे समजताच शिंदेवाडीमधील सर्व ग्रामस्थ एकत्र आले व त्यांनी आम्हाला रस्ता नको, मोजणी करू नका, असा संताप अधिकाऱ्यांपुढे व्यक्त करून मोजणीस प्रतिबंध केला.

सदर वेळी खटावच्या तहसीलदार बाई माने, भूमापन उपअधीक्षक भूमिलेख खटावचे अधिकारी सुनील राऊत, रस्त्याचे काम करणाऱ्या मोनोज कंपनीचे प्रतिनिधी प्रमोद सावंत, मायणीचे सरपंच प्रतिनिधी रणजीत माने, तलाठी ढोले, मायणीचे पोलीस पाटील प्रशांत कोळी, पोलीस विभागाचे कर्मचारी व ग्रामस्थ उपस्थित होते. त्यावेळी ग्रामस्थांनी पुढीलप्रमाणे या रस्त्यासंदर्भात तक्रारी केल्या. आम्हास हा रस्ताच नको, पिढ्यान पिढ्या शेतीवर जीवन चरितार्थ चालवणाऱ्या आम्हा लोकांना सदर जमीन गेल्यामुळे भूमीहीन व्हावे लागेल, जमिनी गेल्यामुळे आमच्या पुढच्या पिढ्या जगणार कशा, त्याचप्रमाणे या शक्तीपीठ महामार्गाचा जुना मार्ग होता.

Protest : आता Gen-Z क्रिकेटर्स उतरले रस्त्यावर ! स्टेडियमच्या बाहेर 250 खेळाडूंचं आंदोलन, काय आहे कारण

त्या सर्वेनुसारच रस्त्याचे काम करावे. तसेच शेतकऱ्यांची कोणतीही चर्चा न करता त्यांना कोणतीही पूर्वसूचना न देता त्यांच्या सातबारावर सदर जागेचा बोजा चढवण्यात आला आहे. त्यामुळे त्यांना बँका कर्ज देण्यास नकार देत आहेत. त्याचप्रमाणे सदर मोजणीची नोटीस ही 12 ऑगस्ट रोजी आली असताना कोणत्याही शेतकऱ्यास सदर नोटीस दिली गेली नाही, त्याचप्रमाणे दिलेल्या नोटिसीवर कोणत्याही जबाबदार अधिकाऱ्याची सही नाही.

दिल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्यात आम्हास मिळणारी रक्कम ही किती दिवस पुरणार आहे. आमच्या पुढच्या पिढीने काय करावयाचे, शेतीशिवाय आम्हास अन्य कोणताही उद्योगधंदा नाही. त्यामुळे आमच्या जमिनीचे अधिग्रहण करू नये, अशा तीव्र प्रतिक्रिया ग्रामस्थांनी यावेळी तहसीलदार यांच्यापुढे मांडल्या.

या संदर्भात बोलताना तहसीलदार म्हणाल्या, सदर रस्त्याचे कामी माण तालुक्यातील चौदा गावातील लोकांनी तसेच, खटाव तालुक्यामधील पाचपैकी चार गावातील लोकांनी सहकार्याची भूमिका घेतली असून, आपणही या कामी सहकार्य द्यावे. आपल्या ज्या काही अडचणी असतील त्या आपण आपल्या निवेदनाद्वारे आमच्याकडे दिल्यास त्या अडचणी आम्ही शासनापुढे मांडू मात्र या कामास आपण विरोध करू नये.

Web Title: Shindewadi villagers from mayani halted the survey for the shaktipeeth highway

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 25, 2026 | 11:55 AM

Topics:  

  • maharashtra news
  • Satara News
  • Shaktipeeth Highway

संबंधित बातम्या

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई
1

Satara News: खण आळीतील रस्ता होणार मोकळा, अतिक्रमणे हटविण्यासाठी सात दिवसांचा अल्टिमेटम! मुदत संपताच पालिकेची कारवाई

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?
2

Jalgaon News: पायांना साखळी, कुलूप अन् तापी नदीत मृतदेह! जोडप्याच्या हत्येने खळबळ; नेमकं काय घडलं?

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू
3

Satara Water Crisis: साताऱ्याच्या दुष्काळी भागात पाण्यासाठी वणवण!; माण, खटाव अन् फलटणमध्ये ३५ टँकर सुरू

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी
4

Satara Drought: पावसाअभावी उभी पिके करपली; वाई तालुका दुष्काळग्रस्त घोषित करण्याची काँग्रेसची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.