Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Marathi news |
  • Political news |
  • Ind Vs Sa |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात सामंत, डॉ गोऱ्हे, शिवतारेच शिंदेंचे शिलेदार; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेची जोरदार तयारी

शिंदेंच्या शिवसेनेने मंत्री उदय सामंत, डाॅ. नीलम गाेऱ्हे, आमदार विजय शिवतारे यांच्याकडे पुण्यातील पक्षाची जबाबदारी साेपवली आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Mar 30, 2025 | 11:54 AM
पुण्यात सामंत, डॉ गोऱ्हे, शिवतारेच शिंदेंचे शिलेदार; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेची जोरदार तयारी

पुण्यात सामंत, डॉ गोऱ्हे, शिवतारेच शिंदेंचे शिलेदार; महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर शिवसेनेची जोरदार तयारी

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पुण्यात शिंदेंच्या शिवसेनेने तयारीस सुरुवात केली आहे. मंत्री उदय सामंत, विधान परीषदेच्या उपसभापती डाॅ. नीलम गाेऱ्हे, आमदार विजय शिवतारे यांच्याकडे पुण्यातील पक्षाची जबाबदारी साेपविण्यात आली आहे. तसेच माजी आमदार रवींद्र धंगेकर यांना सक्रीय हाेण्याच्या सुचना देण्यात आल्या आहेत.

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुणे जिल्हा व त्यातही पुणे शहरावर लक्ष केंद्रीत केले असल्याचे बोलले जात आहे. काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांच्यासह त्यांनी शहरात काही जणांना पक्षात प्रवेश दिला असल्याने या चर्चेला पुष्टी मिळत आहे. पुणे जिल्ह्यात शिंदे शिवसेनेचे दोन आमदार आहेत. त्यातील पुरंदरचे विजय शिवतारे हे शिवसेनेच्या फुटीच्या पहिल्या दिवसापासून त्यांच्याकडे आहेत. दुसरे जुन्नरमधून अपक्ष म्हणून निवडून आलेले शरद सोनवणे यांनीही निकालानंतर लगेचच शिंदे यांना पाठिंबा जाहीर केला व आता तर त्यांच्या पक्षातच प्रवेश केला आहे. पुणे शहरातील कसबा विधानसभा पोटनिवडणूकीत काँग्रेसकडून विजयी झालेले, मात्र नंतरच्या सार्वत्रिक निवडणूकीत पराभव झालेले रवींद्र धंगेकर यांना शिंदे यांनी आता पक्षात प्रवेश दिला आहे. शिंदे यांचे हे धोरण पुणे जिल्हा व शहरात शिवसेनेची राजकीय शक्ती वाढवण्यासाठीच असल्याचे दिसते आहे.

राजेश पळसकर यांचा नुकताच शिंदेसेनेत प्रवेश

शिवसेना (ठाकरे गट) पक्षाच्या शहर व जिल्हा शाखेतील कार्यकर्ते, पदाधिकारी यांनाही ते पक्षात घेत आहेत. ठाकरे गटाचे जिल्हा उपप्रमुख असलेले राजेश पळसकर यांनी नुकताच शिंदेसेनेत प्रवेश केला. त्याचबरोबर शहरातील पदाधिकारी बाळासाहेब मालुसरे यांनीही आपल्या कार्यकर्त्यांसह शिंदेसेनेला जवळ केले आहे. मंत्री उदय सामंत यांच्याकडे शिंदे यांनी पुण्याची जबाबदारी दिली आहे. विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनाही त्यांनी पुण्यावर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. मंत्री उदय सामंत यांच्या आदेशाने शहराध्यक्ष नाना भानगिरे व जिल्ह्याचे पदाधिकारी रमेश कोंडे यांनी नुकताच पुणे जिल्हा व शहर असा एकत्रित शिवसंवाद मेळावा नुकताच घेतला. त्याला सामंत, डॉ. गोऱ्हे यांच्याबरोबरच आमदार विजय शिवतारे, आमदार शरद सोनवणे हेही उपस्थित होते. धंगेकर यांना पुणे शहरात लक्ष घालण्याविषयी सांगण्यात आले असल्याचे यात सांगण्यात आले. त्यांनीही त्यानंतर लगेचच संघटनेत काम करण्याची इच्छा व्यक्त केली.

वादंग होणार नसल्याची घेतली काळजी

राजकीय मोर्चेबांधणी करताना जिल्ह्यात राजकीय वर्चस्व असलेल्या व राज्यातील सत्तेत जवळ असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर वादंग होणार नाही याचीही काळजी शिंदे यांच्याकडून घेण्यात येत आहे. आपल्या शिलेदारांनाही त्यांनी तसेच बजावले आहे. त्यामुळेच त्यांना धक्का लागणार नाही, अशा पद्धतीने शांतपणे शिंदे यांचे काम शहर व जिल्ह्यात सुरू आहे.

Web Title: Shiv sena has started preparations in earnest in the backdrop of the pune municipal corporation elections nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 30, 2025 | 11:54 AM

Topics:  

  • ajit pawar
  • Eknath Shinde
  • maharashtra
  • Neelam Gorhe
  • pune news
  • Uday Samant

संबंधित बातम्या

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’
1

उपमुख्यमंत्री अजित पवारांचे आव्हान! बारामतीचा चेहरामोहरा बदलणार, IIT, IIM आणणार; ‘फक्त राष्ट्रवादीच्या सर्व उमेदवारांना…’

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी
2

Yavatmal News : गावाची लोकसंख्या १५००, तरीही तीन महिन्यांत २७,३९७ नवजात बाळांचा जन्म? भाजप नेत्याची चौकशीची मागणी

Manikrao Kokate Resignation: ‘दादां’नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला; पक्ष संदर्भात अजित पवारांचा महत्वाचा निर्णय
3

Manikrao Kokate Resignation: ‘दादां’नी माणिकराव कोकाटे यांचा राजीनामा स्वीकारला; पक्ष संदर्भात अजित पवारांचा महत्वाचा निर्णय

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?
4

महापौर पदाला प्रतिष्ठा; पण इचलकरंजीत पहिल्या महापौराला शासकीय बंगल्याविना कारभार?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.