कणकवली : गुरुवारी झालेल्या चक्रीवादळात हरकुळ बुद्रुक येथील सुमारे ५२ घरांचे नुकसान झाले. ऐन पावसाळ्याच्या तोंडावर नुकसान झालेल्या या अपघातग्रस्तांना उबाठा शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांच्या माध्यमातून पत्रे, कौलांचे वाटप करण्यात आले. हरकुळ बुद्रुक शेखवाडी येथे झालेल्या या वाटपावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख संदेश पारकर, विधानसभाप्रमुख सतीश सावंत, सरपंच आनंद ठाकूर, उपसरपंच नित्यानंद चिंदरकर, सर्फराज शेख, रफिक शेख, सलाम शेख, कबरेश शेख, अब्दुल समद शेख, आझाद शेख, आब्बास शेख व ग्रामस्थ उपस्थित होते.
[read_also content=”नववी नापास मुलाचे कारनामे; युट्युबवर बघून छापल्या नकली नोटा https://www.navarashtra.com/crime/exploits-of-the-ninth-fail-boy-fake-notes-printed-by-watching-on-youtube-navi-mumbai-534807.html”]
२४ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा
गुरूवारी झालेले वादळ हे हवामान खात्याने कोणत्याही प्रकारची पुर्व कल्पना न देता झालेले होते. या वादळात तालुक्यातील अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. शासनाने या सर्वांना तातडीने तौक्के वादळाच्या भरपाईनुसार जास्तीची भरपाई देण्याची आमची मागणी आहे. दिनाक २४ मेपर्यंत कार्यवाही न झाल्यास आंदोलन छेडण्याचा इशारा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख विधानसभा प्रमुख सतीश सावंत यांनी सांगितले.
हरकुळ बुद्रुक येथील ग्रामस्थांच्या पाठीशी शिवसेना आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने खा.विनायक राऊत यांच्या माध्यमातून सिमेंट पत्रे आणि कौलांचे वाटप केले आहे. अपघातग्रस्तांना जास्तीत जास्त मदत मिळवून देण्यासाठी शिवसेनेचा पुढाकार राहिल असे उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे जिल्हाप्रमुख संदेश पारकर यांनी सांगितले. महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमच्या झालेल्या ग्रामीण भागातील नुकसानाची दाद घेतलेली नाही. शासकीय यंत्रणा पोचली मात्र नुकसान ग्रस्तांना नुकसान भरपाईची अद्याप मिळावी नसल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत.