Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • BMC Election 2026 |
  • PMC Election 2026 |
  • Nagpur Municipal Corporation Election 2026 |
  • Municipal Election |
  • Municipal Election Result 2026
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Satara Political News : युती झाली नाही तर प्रत्येकाला लढायचा मार्ग मोकळा! मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचे स्पष्ट संकेत

पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साताऱ्यामध्ये महायुतीने तयारी सुरु केली आहे. यासंदर्भात काय निर्णय होणार याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मत मांडले आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 18, 2026 | 06:13 PM
Shivendrasinhraje Bhosale reaction on mahayuti meeting for the Panchayat Samiti elections satara news

Shivendrasinhraje Bhosale reaction on mahayuti meeting for the Panchayat Samiti elections satara news

Follow Us
Close
Follow Us:
  • साताऱ्यामध्ये पंचायत समितीच्या निवडणुकीची तयारी
  • या संदर्भाने महायुतीची बैठक सुरु
  • मुलाखतीच्या कार्यक्रमावर मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांची प्रतिक्रिया
Satara Political News : सातारा : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यामध्ये राजकीय (Political News) हालचालींना वेग आला आहे.  सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी पुढाकार घेऊन महायुतीच्या संदर्भाने बैठक बोलावलेली आहे हे मला प्रसार माध्यमातून कळाले. महायुतीच्या बैठकीत काय निर्णय होईलहे सांगता येणार नाही मात्र युती जर झाली नाही तर प्रत्येक जण लढायला मोकळा आहे .प्रत्येक पक्षाची ताकद या (Satara News) जिल्ह्यांमध्ये आहे असे स्पष्ट प्रतिपादन सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले .
शिवतीर्थावर छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याची उंची वाढवण्या संदर्भात पाहणी केल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना शिवेंद्रसिंहराजे भोसले बोलत होते. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती यांच्या निवडणुका या स्वबळावर की महायुती मधून या प्रश्नावर सातारा जिल्ह्याचे राजकारण सध्या सुरू आहे. यासंदर्भात काय निर्णय होणार याबाबत शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मत मांडले आहे. याबाबत बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्यांच्या मुलाखतींचा कार्यक्रम ठेवला आहे. तसेच भारतीय जनता पार्टी सुद्धा आपापल्या पद्धतीने मुलाखतींचा कार्यक्रम राबवत आहे .पालकमंत्री शंभूराजे यांनी आज बैठक बोलावल्याची आमच्याकडे माहिती आहे. या बैठकीला कोणी जायचे याबाबतचा निर्णय सर्वसमानवाने घेतला जाईल मात्र बैठकीत काय ठरेल हे मी सांगू शकत नाही मात्र एकमत जर झाले नाही तर प्रत्येक पक्ष आपापल्या पद्धतीने लढायला मोकळा आहे, असे सूचक विधान मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी केले आहे.
हे देखील वाचा : “आपल्याकडं ही गुंतवणूक का नाही? CM फडणवीसांच्या दावोस दौऱ्यावर रोहित पवारांचा सवाल
पुढे ते म्हणाले की, ‘राष्ट्रवादी दोन्ही गट शिंदे गट या सर्व पक्षांचे जिल्ह्यामध्ये आपापल्या पद्धतीने ताकत आहे जो तो आपल्या पद्धतीने लढायच्या तयारीत असून कोणीही थांबायला तयार नाही .त्यामुळे लढती या होणारच आहेत असे ते स्पष्टपणे म्हणाले राष्ट्रवादी एकीकरणाच्या संदर्भात बोलताना शिवेंद्रसिंहराजे भोसले म्हणाले कोणी काय करायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे मात्र भारतीय जनता पार्टीम्हणून आम्हाला आमच्या कामावर विश्वास आहे महानगरपालिका निवडणुकांमध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उत्कृष्ट यश मिळवले आहे. तसेच केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या माध्यमातूनही भारतीय जनता पार्टीने सांगली कामगिरी बजावली आहे.
हे देखील वाचा : व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपवर राज ठाकरेंबद्दल आक्षेपार्ह पोस्ट अन् पुढच्याच क्षणी घडलं असं काही… कोपरखैरणेत मोठा राडा! Video Viral
सातारा जिल्ह्यातही जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत भारतीय जनता पार्टी चांगली कामगिरी बजावेल आम्हाला आमच्या विकास कामांवर विश्वास आहे. जिल्हा परिषदेचे मतदार भारतीय जनता पार्टीला कौल देतील असा स्पष्ट विश्वास त्यांनी व्यक्त केला. “लेक व्यू हॉटेल येथे होणाऱ्या मुलाखतीला माझ्यासह खासदार उदयनराजे भोसले आमदार जयकुमार गोरे अतुल भोसले मनोज घोरपडे हे सर्व येणार आहेत भारतीय जनता पार्टीच्या वतीने महायुतीच्या बैठकीला कोणी जायचे याचा समन्वय निर्णय घेतला जाईल,” असेही ते म्हणाले. सातारा जिल्हा परिषदेचा अध्यक्ष हा दोन्ही राजांच्या सहमतीने ठरणार का या प्रश्नात बोलताना शिवेंद्रसिंह राजे म्हणाले की, “आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून लढत असतो त्यामुळे अध्यक्ष पदाचा निर्णय होताना सर्व सहमतीने निर्णय घेतला जाईल .सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदाचे आरक्षण महिला ओबीसी प्रवर्गासाठी राखीव आहे .निकालानंतर राजकीय परिस्थिती पाहून सर्व समन्वयाने योग्य तो निर्णय निश्चित घेतला जाईल,” असे त्यांनी स्पष्ट केले

Web Title: Shivendrasinhraje bhosale reaction on mahayuti meeting for the panchayat samiti elections satara news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 18, 2026 | 06:13 PM

Topics:  

  • political news
  • Satara News
  • Shivendrasinharaje Bhosale

संबंधित बातम्या

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार
1

Sangli News : सांगलीत भाजपला सत्तेचा काटेरी मुकुट! काठावरच्या बहुमताने इकडे आड-तिकडे विहीर; बहुमताच्या जुळणीने झाले बेजार

Jalna News :  मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव
2

Jalna News : मुंबई आंदोलनाला परवानगी नाकारल्यानंतर जालन्यात तणाव

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट
3

Jalna News : शेतकऱ्यावर दरोडेखोरांचा सशस्त्र हल्ला, शेतात टेहळणीसाठी गेलेल्या शेतकऱ्याला मारहाण करून लूट

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?
4

Pimpri Chinchwad Election : राष्ट्रवादीच्या विजयी उमेदवारावर क्रॉस व्होटिंगचा आरोप; नेमकं प्रकरण काय ?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.