मुंबई : राज्यातील सत्तातरानंतर शिवसेना व शिंदे गटासाठी कालचा पहिलाच दसरा मेळावा होता. दरम्यान, दसरा मेळाव्यावरुन (Dasara melava) शिवसेना व शिंदे गटात (Shinde group) आरोप-प्रत्यारोप, टिका तसेच राजकारण होताना सर्वांनी पाहिले. शिवाजी पार्कवर (Shivaji Park) दसरा मेळावा (Dasara Melava) उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा झाला, तर बीकेसीत (BKC) शिंदे गटाचा दसरा मेळावा झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा आपपल्यासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा असल्याचे वातावरण केले होते. त्यामुळं कोणत्या दसरा मेळाव्याला जास्त गर्दी होती. कोणाचे भाषण गाजले यावर तर्कवितर्क लढविले जात आहेत. दरम्यान, आता कुठल्या दसरा मेळाव्याला आवाज जास्त होता याचा अहवाल समोर आला आहे.
[read_also content=”राज्यातील जनतेच्या बँक खात्यात ३००० रुपयांची ‘दिवाळी भेट’ जमा करा, नाना पटोले यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र https://www.navarashtra.com/maharashtra/nana-patole-writing-letter-to-cm-eknath-shinde-about-diwali-help-333258.html”]
दरम्यान, दोन्ही दसरा मेळाव्यातील आवाजाची तीव्रता मोजण्यात आली आहे. आवाज फाऊंडेशनने (Awaj foundation) आवाजाची मर्यादा चेक केली असता, आवाज फाऊंडेशनच्या मोजणीत शिवाजी पार्कच्या मेळाव्यात १०१.६ डेसिबल इतका आवाज होता. तर, वांद्र्यातील बीकेसीत एकनाथ शिंदे यांच्या मेळाव्यात ८८ डेसिबल इतका आवाज नोंदवला गेला. शिवाजी पार्क येथे किशोरी पेडणेकर यांचा आवाज सर्वाधिक नोंदवला गेला. त्यांच्या भाषणावेळी ९७ डेसिबलपर्यंत आवाज होता तर, सुषमा अंधारे यांच्या भाषणादरम्यान ७०.६ ते ९३.१ डेसिबलपर्यंत आवाज नोंदवला गेला आहे. शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांचं भाषण शिवाजी पार्कवर गाजलं.