सिंधुदुर्ग : गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या अशा जयघोषात सिंधुदुर्ग जिल्ह्यात पाच दिवसाच्या सुमारे १० हजार ४५७ खाजगी ११ सार्वजनिक गणेशमूर्तींचे अनंत चतुर्थीच्या दहाव्या दिवशी ठिकठिकाणी मोठ्या भक्ती भावाने फटाक्यांच्या आणि सभाजीत टाळ मृदंगाच्या गजरात ‘पुढ्च्या वर्षी लवकर या ” च्या जयघोषात रात्री उशिरापर्यंत विसर्जन करण्यात आले.
कोकणात विशेषता सिंधुदुर्गात काही तुरळक प्रमाणात पाच सात अकरा दिवसाच्या गणेश मूर्तीची विसर्जन करण्यात येते यावर्षी दरवर्षी प्रमाणे प्रतिपदा नक्षत्रामुळ व पौर्णिमा मुळा नक्षत्रामुळे मोठ्या प्रमाणात १० हजार ४५७ खाजगी ११ सार्वजनिक गणेश मूर्तींची विसर्जन करण्यात आले. पावसाने दोन दिवस काही प्रमाणात विश्रांती घेतली होती तरी आज दहाव्या दिवसाच्या गणेश मूर्ती विसर्जनाच्या वेळी सकाळच्या सत्रात काही अंर्षी पावसाचे सावट ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. तरीही मोठ्या भक्ती भावाने अनंत चतुर्थी दहाव्या दिवसाच्या गणेश भक्तांनी आरती भजन पूजेमध्ये दंग झाले होते.
तसेच जिल्ह्यात तालुक्यात ठिकाणी मोठ्या प्रमाणात भक्ती भावाने गणेश मूर्तींचे विसर्जन केले. गणेशोत्सवापूर्वी पावसाने काही अशी दडी मारली तरी गणेशोत्सव काळात अधून मधून पावसाच्या सरी कोसळत असल्यामुळे काही प्रमाणात आरती आणि भजन करणाऱ्या गणेश भक्तांचा काहीसा हिरमुड होत गेला. दहा दिवस गणेश भक्तगण उत्सवात दंग झाले होते. रात्री उशीरापर्यत गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी… लवकर या च्या जयघोषात विसर्जन सुरु होते.