खासदार नारायण राणे (फोटो- ट्विटर )
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणच्या राजकोट भागातील छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. अवघ्या आठ महिन्यात हा पुतळा कोसळल्याने विरोधकांनी सरकारला चांगलेच धारेवर धरले आहे. यानंतर मालवणमध्ये प्रचंड रोष निर्माण झाल्याचे पाहिला मिळत आहे. ठाकरे गटाचे समर्थक आणि राणे समर्थक आमनेसामने आले आहेत. या दोन्ही गटांमध्ये प्रचंड राडा होत झालेला पाहायला मिळाला. छत्रपती शिवाजी महाराज यांचा पूर्णाकृती पुतळा कोसळल्याने विरोधकांकडून जोरदार निशाणा साधला. या परिसरात आदित्य ठाकरे पाहणी करण्यासाठी गेले होते. मात्र, त्याचवेळी भाजप तसेच राणे समर्थकही आक्रमक झाले. त्यामुळे ठाकरे समर्थक आणि राणे समर्थकांमध्ये प्रचंड राडा झाल्याचे पाहिला मिळाले. त्यानंतर आता माजी केंद्रीय मंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेऊन विरोधकांवर टीका केली आहे.
मालवणमध्ये राजकोट किल्ल्यावर झालेल्या राड्यानंतर खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना ते म्हणाले, ”छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण ८ महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले होते आणि ऐन पावसाळ्यात जोराचे वारे वाहत होते. त्यामुळे हा पुतळा कोसळला आहे. कोणाला दोष देण्याऐवजी हा पुतळा बांधणाऱ्यांची चौकशी व्हावी आणि कशामुळे हा पुतळा कोसळला याच कारण बाहेर यावं. त्यानंतर त्यांच्यावर कारवाई व्हावी अशी माझी आणि जनतेची इच्छा आहे. विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून काही विरोधक याच भांडवल करत आहेत.”
पुढे बोलताना खासदार नारायण राणे म्हणाले, ”सिंधुदुर्ग जिल्ह्यात विरोधकांना टीका करण्यासाठी कोणतेही कारण मिळत नाही आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला हे निमित्त करून सगळे जण शिवसेना उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेस हे सगळे एकत्र येऊन टीका करत आहेत.”
”या जिल्ह्यात पुतळा तयार झाला. मालवण जिल्ह्यातील लोक महाराजांसमोर नतमस्तक झाली. पण आज बाहेरून आलेले सगळे पुढारी गेल्या ८ महिन्यात महाराजांच्या पुतळ्यासमोर नतमस्तक होयला आले नाहीत, दिसले नाहीत. यातल्या एकाने तरी कधी राष्ट्रपुरुषांच्या पुतळा उभारला. एखादी शाळा बालवाडी, एखादे धार्मिक स्थळ अशा कोणत्याच गोष्टीत योगदान नाही. आताच्या सरकारवर आरोप करण्यापलीकडे यांचं एकही विधायक सामाजिक कार्य काम नाही. उद्धव ठाकरे शिवद्रोही म्हणाले. उद्धव ठाकरेंकडून चांगल्या भाषेची काय अपेक्षा करणार? मला त्याला सांगाव वाटत शिवसेनेच्या जन्मपासून छत्रपती शिवाजी महाराज आणि हिंदुत्व या दोन विषयांना उदरनिर्वाहाचे साधन बनवले. या गोष्टींवरच पैसे कमवला. स्वतःच्या वडिलांचा पुतळा पण महाराष्ट्र सरकारच्या खर्चाने बनवला. म्हणून उद्धव ठाकरेंना बोलायचं नैतिक अधिकार नाही. त्याला चांगलं बोलता येत नाही. शिव्या घालण्यापलीकडे दुसरं काय काळात नाही. अडीच वर्षे मुख्यमंत्री तेव्हा काय केलं ते त्यानं सांगावं”, असे नारायण राणे म्हणाले.