मुंबई : सायन (Sion) परिसरात असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त केंद्राला (BMC lokmanya tilak Hospital blood centre) नुकताच महाराष्ट्राचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण या खात्यांचे मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) आणि अन्न व औषध प्रशासन खात्यांचे मंत्री राजेंद्र शिंगणे (Rajendra Shingane) यांच्या उपस्थितीत राज्यस्तरीय रक्तदाता गौरव करण्यात आले आहे. ( Blood Center honored) सन २०२० मध्ये १६९ रक्तदान शिबिरे आयोजित करणे आणि १५ हजार ५८९ रक्त पिशव्यांचे संकलन केले आहे. तर सन २०२१ मध्ये १५४ रक्तदान शिबिरे आयोजित करण्यासह १४ हजार ३४८ पिशव्यांचे रक्तसंकलन (Blood collection) केल्याची दखल राज्य स्तरावर घेण्यात येऊन हा सन्मान करण्यात आल्याची माहिती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी (Mohan Joshi) यांनी दिली आहे.
[read_also content=”…अपक्षांच्या भेटीसाठी जेव्हा प्रवीण दरेकर व आमदार गिरीश महाजन लोकल ट्रेन प्रवास करतात https://www.navarashtra.com/maharashtra/praveen-darekar-and-girish-mahajan-travel-by-train-to-meet-mla-hitendra-thakur-294000.html”]
दरम्यान, दरवर्षी १४ जून रोजी ‘जागतिक रक्तदाता दिन’ असतो. यानिमित्ताने मुंबईतील नरिमन पॉईंट परिसरात असणाऱ्या यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या सभागृहात आयोजित कार्यक्रमा दरम्यान सायन रुग्णालयाच्या रक्त केंद्राचा सन्मान करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयातील रक्त संक्रमण अधिकारी डॉक्टर आशिष मिश्रा आणि संबंधित समुपदेशक श्रीमती सुनिता घमंडी यांनी हा सन्मान मंत्री महोदयांच्या हस्ते स्वीकारला. या कार्यक्रमाला राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेच्या संचालक डॉक्टर साधना तायडे आणि सहाय्यक संचालक डॉक्टर अरुण थोरात हे मान्यवर उपस्थित होते. महाराष्ट्र राज्याच्या रक्तसंक्रमण परिषदेद्वारे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, अशी माहिती सायन रुग्णालयातील रक्तकेंद्राच्या प्रमुख डॉक्टर अंजली महाजन यांनी दिली आहे.