फोटो सौजन्य AI
सोलापूर, शहर प्रतिनिधी. रस्ता तयार झाल्यानंतर पुन्हा खोदकामाची वेळ येऊ नये, यासाठी पाणीपुरवठा, ड्रेनेज, स्टॉर्म वॉटर ड्रेन, वीजवाहिन्या आणि इतर भूमिगत सुविधांची कामे समन्वयाने पूर्ण करण्याचे निर्देश महापौर विनायक कोंड्याल यांनी दिले. महापौर कार्यालयात झालेल्या आढावा बैठकीत एमएसआयडीसी आणि महापालिकेच्या विविध विभागांनी संयुक्त पाहणीतील निष्कर्षांवर चर्चा केली. या बैठकीला उपमहापौर ज्ञानेश्वरी देवकर, सभागृह नेते नरेंद्र काळे, महापालिका आयुक्त डॉ. सचिन ओम्बासे, अतिरिक्त आयुक्त संदीप कारंजे, एमएसआयडीसीचे अधिकारी तसेच महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी व लोकप्रतिनिधी उपस्थित होते.
Solapur News : दिव्यांगांना मिळाली श्रद्धेची पॉवर , महापालिकेचा मोठा दिलासा
यावेळी ५०० मिमी मुख्य जलवाहिनी, ड्रेनेज लाईन, स्टॉर्म वॉटर ड्रेन, चौकांचे नियोजन तसेच वाढत्या वाहतुकीचा विचार करून रस्त्याचा आराखडा तयार करण्यावर भर देण्यात आला. महापौर कोंड्याल म्हणाले की, वारंवार होणाऱ्या खोदकामामुळे नागरिकांना होणारा त्रास थांबविणे हे प्रशासनाचे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्यामुळे सर्व विभागांनी वेळेत नियोजन करून कामे पूर्ण करावीत आणि नागरिकांना सुरक्षित, दर्जेदार व दीर्घकाळ टिकणारा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अशा सूचना महापौर काेंड्याल यांनी दिल्या.
‘माऊली’च्या गजरात संत निवृत्तीनाथ महाराजांच्या पालखीचे सोलापूर जिल्ह्यात जल्लोषात स्वागत
पाणीपुरवठा व ड्रेनेजची कामे आधी पूर्ण होणारस
्टॉर्म वॉटर ड्रेनचे नियोजन होणार
वाढत्या वाहतुकीनुसार रस्त्याचा विकास
नागरिकांना मिळणार सुरक्षित व टिकाऊ सुविधा






