Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 26 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Solapur News : करमाळ्यात फुटली राजकीय हंडी! काँग्रेस तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप समर्थकांसह भाजपमध्ये

Solapur News : करमाळ्यात काँग्रेसला मोठा राजकीय धक्का बसला असून तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी समर्थकांसह भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या राजकीय पक्षबदलामुळे करमाळ्यातील स्थानिक राजकारणात नव्या समीकरणांची चर्चा सुरू झाली असून आगामी काळात त्याचा राजकीय परिणाम पाहायला मिळण्याची शक्यता आहे.

  • By Chaitanya Pisal
Updated On: Sep 09, 2026 | 09:30 PM
फोटो सौजन्य सोशल मीडिया

फोटो सौजन्य सोशल मीडिया

Follow Us
Follow Us:
  • काँग्रेसला धक्का, भाजपला संघटनात्मक बळ
  • विकासाच्या भूमिकेवर काम करणार
  • दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय रंग
Solapur News :श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त करमाळा येथे भारतीय जनता पार्टीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या भव्य दहीहंडी उत्सवाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार तथा भाजप नेते रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या उत्सवाला राजकीय घडामोडीची किनार लाभली. काँग्रेसचे करमाळा तालुकाध्यक्ष प्रतापराव जगताप यांनी आपल्या समर्थकांसह भाजपमध्ये जाहीर प्रवेश केल्याने करमाळ्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

दहीहंडी उत्सवाच्या जल्लोषात प्रतापराव जगताप यांचा भाजप प्रवेश झाला. त्यांच्यासोबत करमाळा तालुका काँग्रेस आयचे भटक्या-विमुक्त जातीचे तालुकाध्यक्ष देवराव सुकळे, शिवसेनेचे युवक नेते संभाजी शिंदे, शहर युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष सुजय जगताप, योगेश राखुंडे यांच्यासह काँग्रेसचे विविध उपाध्यक्ष, पदाधिकारी आणि शाखाध्यक्षांनी आपल्या पदांचे राजीनामे देत भाजपमध्ये प्रवेश केला. या सामूहिक पक्षप्रवेशामुळे दहीहंडीच्या निमित्ताने करमाळ्यात मोठी राजकीय घडामोड घडल्याचे मानले जात आहे.

Solapur News : १,४८३ कोटींच्या जलआराखड्याला ब्रेक; ८५० कोटींची योजना १४८३ कोटींवर कशी, मुख्य सचिवांचा सवाल

काँग्रेसला धक्का, भाजपला संघटनात्मक बळ

प्रतापराव जगताप हे माजी आमदार नामदेवराव जगताप यांचे चिरंजीव आहेत. करमाळा तालुक्यात त्यांचे कार्यकर्ते व समर्थकांचे संघटन असल्याचे मानले जाते. त्यामुळे त्यांच्या भाजप प्रवेशाकडे आगामी विधानसभा मतदारसंघातील राजकीय समीकरणांच्या दृष्टीने पाहिले जात आहे. त्यांच्या प्रवेशामुळे काँग्रेसला स्थानिक पातळीवर धक्का बसल्याची चर्चा असून, भाजपला मात्र संघटनात्मक बळ मिळाल्याचे चित्र आहे.

भाजपचे नूतन सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांनी जिल्हाध्यक्षपदाची सूत्रे स्वीकारल्यानंतर अवघ्या महिनाभराच्या कालावधीत काँग्रेसच्या तालुकाध्यक्षांचा भाजप प्रवेश घडवून आणला आहे. त्यामुळे करमाळा तालुक्यात पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने हा प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. आगामी काळात आणखी काही राजकीय घडामोडी घडतात का, याकडेही राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

Solapur-Mumbai Air Service Suspended Again: सोलापूर-मुंबई विमानसेवेला पुन्हा ‘ब्रेक’! Star Airचा मोठा निर्णय; नेमकं कारण काय?

विकासाच्या भूमिकेवर काम करणार

भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर प्रतापराव जगताप यांनी भाजपचे जिल्हाध्यक्ष गणेश चिवटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे विचार, विकासाची भूमिका आणि ध्येयधोरणे जनसामान्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रामाणिकपणे काम करणार असल्याचे सांगितले. पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी तालुक्यात सक्रियपणे काम करण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.

दहीहंडीच्या उत्सवाला राजकीय रंग

दहीहंडी फोडण्यासाठी गोविंदा पथकांनी केलेल्या थरारक प्रयत्नांनी उत्सवात रंगत आणली. मात्र, प्रतापराव जगताप यांच्यासह काँग्रेस व अन्य पक्षांच्या पदाधिकाऱ्यांच्या भाजप प्रवेशामुळे उत्सवाला राजकीय रंग चढला. दहीहंडीच्या निमित्ताने केवळ गोविंदांनीच हंडी फोडली नाही, तर करमाळ्यात राजकीय हंडीही फुटल्याची चर्चा कार्यकर्त्यांमध्ये रंगली.

या पक्षप्रवेशामुळे भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचे नेतृत्व, गणेश चिवटे यांची संघटनात्मक रणनीती आणि प्रतापराव जगताप यांचे स्थानिक पातळीवरील संघटन यांचा मेळ आगामी काळात भाजपला करमाळ्यात कितपत बळकटी देतो, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

दहीहंडी उत्सवाच्या व्यासपीठावर भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी उपसभापती चिंतामणी दादा जगताप, करमाळा नगरपालिकेचे माजी बांधकाम सभापती राहुल जगताप, भाजप मंडलाध्यक्ष काकासाहेब सरडे, महाराष्ट्र चॅम्पियन अफसर जाधव, नगरसेवक रामभाऊ ढाणे, शहराध्यक्ष जगदीश अग्रवाल, जिल्हा सरचिटणीस सचिन शिंदे आदी उपस्थित होते.

आगामी राजकीय समीकरणांकडे लक्ष

दहीहंडीच्या निमित्ताने झालेल्या या पक्षप्रवेशामुळे करमाळा तालुक्यातील राजकीय वातावरण तापले असून, आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या प्रवेशाचा भाजपच्या संघटनात्मक ताकदीवर आणि स्थानिक राजकीय समीकरणांवर काय परिणाम होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Web Title: Solapur news political handi breaks in karmala congress taluka president prataprao jagtap joins bjp along with his supporters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 09, 2026 | 09:30 PM

Topics:  

  • BJP
  • Congress Party
  • Solapur News
  • Solapur Politics

संबंधित बातम्या

Solapur DCC Bank Election : शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन; रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक
1

Solapur DCC Bank Election : शेतकऱ्यांच्या हितासाठी सर्वपक्षीय एकजुटीचे आवाहन; रणजितसिंह मोहिते-पाटील यांची भूमिका ठरणार निर्णायक

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक
2

Solapur District Bank : ‘रणजितदादा बाहेर पडा, भाकरी फिरवा’; मोहिते-पाटील गटाच्या नेते, कार्यकर्त्यांची शिवरत्न बंगल्यावर बैठक

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश
3

आरोप-प्रत्यारोप बंद करा, शेतकऱ्यांच्या मदतीला जा! एकनाथ शिंदेंचे शिवसेना नेत्यांना आदेश

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’
4

Sanjay Gaikwad : महायुतीत पुन्हा ठिणगी! संजय गायकवाडांचा भाजपवर हल्लाबोल! ‘शिंदेंनी उठाव केला नसता तर भाजपचे आमदार घरी बसले असते’

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.