घराचे स्वप्न पूर्ण होणार! 'या' तारखेला तब्बल ११,१२० घरांसाठी जाहिरात (Photo Credit- X)
म्हाडा लॉटरीच्या धर्तीवर निवड
जाहिरात प्रसिद्ध होताच नागरिकांकडून ऑनलाइन अर्ज मागविण्यात येणार आहेत. ही प्रक्रिया कोणत्याही प्रकारचा गैरप्रकार होऊ नये आणि पूर्णपणे पारदर्शक राहावी यासाठी लाभार्थ्यांची निवड म्हाडा (MHADA) लॉटरीच्या धर्तीवरच केली जाणार आहे.
प्रकल्प स्थळे:
प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत शहरातील चार मुख्य ठिकाणी घरकूल प्रकल्प उभारण्यात येत आहेत:
या प्रकल्पांमध्ये सुमारे ११ हजार घरे बांधण्यात येत आहेत.
लॉटरी प्रक्रियेसाठी स्वतंत्र सॉफ्टवेअर
निवड प्रक्रिया संगणकीकृत पद्धतीने पार पाडण्यासाठी महापालिकेने प्रोबीटी सॉफ्टवेअर प्रा. लि. या संस्थेची नियुक्ती केली आहे. अर्ज भरण्यासाठी एक स्वतंत्र संकेतस्थळ (वेबसाईट) तयार केले गेले असून, सध्या त्याची तांत्रिक चाचणी (Technical Testing) सुरु आहे. ऑनलाइन अर्जांची अचानक मोठी गर्दी झाल्यास वेबसाईट हँग होऊ नये, यासाठी अधिकाधिक प्रेशर टेस्टिंग करण्यात येत आहे. नागरिकांना अर्ज करताना कुठल्याही अडचणी येऊ नयेत, याची विशेष दक्षता घेण्यात येत आहे.
उपलब्ध घरांचा प्रकल्पनिहाय तपशील
या प्रकल्पांमुळे शहरातील हजारो कुटुंबांना परवडणाऱ्या दरात स्वतःचे घर मिळण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यानंतर अर्ज प्रक्रियेत नागरिकांची प्रचंड उत्सुकता दिसून येण्याची शक्यता आहे.
| प्रकल्पाचे ठिकाण | गट क्रमांक | अंदाजित घरे |
| सुंदरवाडी | गट 10 | ३,२८८ घरे |
| तिसगाव | गट 225/1 | १,९७६ घरे |
| तिसगाव | गट 227/1 | ४,६८० घरे |
| पडेगाव | गट 69 | ६७२ घरे |
| हसूल | गट 216 | ५०४ घरे |
| एकूण घरे | ११,१२० |






