Someshwar Temple Darshan
रविवारी (दि. 6) रोजी मध्यरात्री १२ वाजता राष्ट्रवादीचे युवा नेते जय पवार तसेच उपविभागीय पोलिस अधिकारी चैतन्य कदम यांच्या हस्ते महापूजा पार पडली. यावेळी पुणे जिल्हा बँकेचे संचालक संभाजी होळकर, सोमेश्वरचे संचालक अभिजित काकडे, ऋषिकेश गायकवाड, करंजेचे सरपंच भाऊसो हुंबरे, देवस्थानचे अध्यक्ष अनंत मोकाशी, सचिव सचिन भांडवलकर, विपुल भांडवलकर, विश्वस्त समिती सदस्य उपस्थित होते.
परंपरेप्रमाणे शेवटच्या सोमवारी सोमेश्वर देवस्थानच्या श्री सोमेश्वर देवाची पालखी सोहळा मोठ्या भक्तिभावात पार पडला. सकाळी नऊ वाजता विधिवत पूजाअर्चा झाल्यानंतर अंबावडे गावचे मानकरी तसेच सोमेश्वर परिसरातील मानकरी, खांदेकरी यांच्या उपस्थितीत पालखी वाजतगाजत मार्गस्थ झाली. सकाळी साडेअकराच्या सुमारास पालखी खोमणे माळावर आणण्यात आली. शेला पागोटे अर्पण करण्यात आले. यावेळी जळगाव सुपे, कोऱ्हाळे बुद्रुक, कोऱ्हाळे खुर्द आदी गावांतील खोमणे मानकरी उपस्थित होते. पारंपरिक पद्धतीने वाजतगाजत पालखी पुन्हा श्री सोमेश्वर मंदिराकडे मार्गस्थ झाली. पालखी सोहळ्यासाठी परिसरातील हजारो भाविक उपस्थित होते. यावेळी ‘स्वरगंध’ प्रस्तुत ‘अभंगवाणी’ तसेच तेजस कदम यांचा ‘शिवआराधना’ कार्यक्रम पार पडला. भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. भाविक किशोर हिंगणे महाराज यांच्या वतीने भाविकांसाठी खिचडीचे तसेच पिण्याच्या पाण्याचे वाटप करण्यात आले.
बारामतीतील मयूर बोबडे, उद्योजक आर. एन. शिंदे, किरण आळंदीकर यांनी मंदिर परिसराला आकर्षक पुष्प-फळ सजावट केली. संध्याकाळी महाप्रसाद व्यवस्था प्रमोदकुमार गीते, उद्योजक नामदेवराव शिंगटे यांच्या वतीने केली गेली. रविवारी जिल्हा क्रीडा अधिकारी जगन्नाथ लकडे व सोमेश्वर चालक-मालक वाहन संघटनेच्या वतीने महाप्रसाद वाटप झाले. होळ प्राथमिक आरोग्य केंद्र, साई सेवा हॉस्पिटलच्या वतीने भाविकांवर मोफत औषधोपचार करण्यात आले. बारामती आगाराच्या वतीने जादा गाड्यांची सोय करण्यात आली होती. मंदिर परिसर मिठाई, हार-फुले, खेळणी, पाळणे, विविध दुकानांनी गजबजून गेला होता. वडगाव निंबाळकरचे सहायक पोलिस निरीक्षक जीवन मोहिते, उपनिरीक्षक राहुल साबळे, अझर मुलाणी व कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवत . यात्रा काळात चांगला व्यवसाय झाल्याचे व्यवसायिकानी सांगितले.
मुंबई, ठाणे, रायगड, कोकण या भागातून मोठ्या प्राणावर कोळी शिवभक्त दरवर्षी येत असतात. त्यांच्या मुक्कामाची सोय भक्तनिवासात केली गेली. त्यांनी आपले नवस या ठिकाणी पूर्ण केले.
Nitesh Rane: दीड-दोन तासांचा प्रवास अवघ्या 15 मिनिटांत! सिंधुदुर्गात सुरू होणार आधुनिक फेरीबोट सेवा






