Sopara Jam Due To Historical Nirmal Yatra Motorists Suffer Due To Traffic Jam Vasai Virar Palghar Traffic Issue
ऐतिहासिक निर्मळ यात्रेमुळे सोपारा जाम, वाहनचालक वाहतूक कोंडीमुळे त्रस्त
भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निर्मळ भुमीत आद्य शंकराचार्यांच्या समाधीची यात्रा भरते. तब्बल पंधरा दिवस ही यात्रा वसई-अर्नाळा या राज्य महामार्गावर भरत असते.
वसई : ८ तारखेला सुरु झालेल्या ऐतिहासिक निर्मळ यात्रेमुळे सोपारा, समेळगाव आणि परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतुक कोंडी होत असून, या कोंडीत वाहनचालकांना तासभर अडकून पडावे लागत असतानाही वाहतुक पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे संताप व्यक्त करण्यात येत आहे.
भगवान परशुरामाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या निर्मळ भुमीत आद्य शंकराचार्यांच्या समाधीची यात्रा भरते. तब्बल पंधरा दिवस ही यात्रा वसई-अर्नाळा या राज्य महामार्गावर भरत असते. त्यामुळे येथील वाहतुक गास-सोपारा मार्गे वळवली जाते. गास-सोपारा या रस्त्याला सनसिटी-वसई हा रस्ता छेद देत असल्यामुळे या मार्गावर नेहमीच वर्दळ असते. यात्रेसाठी निर्मळची वाहतुक वळवण्यात आल्यामुळे या रस्त्यावर अतिरीक्त भार पडून दररोज वाहतुक कोंडी होऊ लागली आहे. त्यात शनिवार-रविवारी कळंब समुद्र किनारी जाणाऱ्या पर्यटकांची भर पडत असल्यामुळे वाघोली-सोपारा, गास-सोपारा, समेळगाव-सोपारा या रस्त्यात शेकडो वाहने तासनतास अडकून आहेत.
ही कोंडी सोडवण्यासाठी अमोल राऊत, रोहन पाठारे, उन्मय पाटील, भाविक म्हात्रे, प्रणिता पाटील आणि स्वप्नाली म्हात्रे या तरुण कार्यकर्त्यांनी नालासोपारा पोलीस आणि वाहतुक पोलीसांकडे लेखी मागणी केली. ट्रफीकच्या वेळी सोपारा गावातील मुख्य रस्त्यावर दोन ठिकाणी वाहतुक पोलीस तैनात करण्यात आले होते, तर कोंडी सुटेल असेही त्यांनी सुचीत केले. ८ तारखेला त्यांनी केलेल्या या मागणीकडे दोन्ही पोलीसांनी दुर्लक्ष केल्यामुळे शेकडो वाहने रस्त्यावर अडकून पडत आहेत. त्यामुळे शाब्दिक बाचाबाची ही होत आहे. त्यातून पोलीसांबद्दलचा संतापही व्यक्त केला जात आहे.
Web Title: Sopara jam due to historical nirmal yatra motorists suffer due to traffic jam vasai virar palghar traffic issue