Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 26 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, ‘सभापतींचा आदेश म्हणजे…’

संविधानानुसार मंत्रिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद या तिन्हींचे अधिकार निश्चित आहेत. सर्वांना आपापल्या चौकटीत राहून काम करावे लागते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Mar 25, 2026 | 08:34 AM
पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'सभापतींचा आदेश म्हणजे...'

पोलिस अधीक्षक तुषार दोशींच्या निलंबनावर मुख्यमंत्र्यांचं मोठं विधान; म्हणाले, 'सभापतींचा आदेश म्हणजे...'

Follow Us
Follow Us:

मुंबई : साताऱ्याचे पोलिस अधीक्षक तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी दिले आहेत. त्या आदेशावरूनच राजकारण तापले आहे. असे असताना आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या आदेशावरून महत्त्वपूर्ण विधान केले. ‘सभापती आपल्या अधिकारात आदेश देऊ शकतात. मात्र, त्यांचा आदेश म्हणजे ‘ब्रह्मवाक्य’ नाही’, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी कायदेशीर आणि घटनात्मक पेचप्रसंगावर भाष्य केले.

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, संविधानानुसार मंत्रिमंडळ, विधानसभा आणि विधान परिषद या तिन्हींचे अधिकार निश्चित आहेत. सर्वांना आपापल्या चौकटीत राहून काम करावे लागते. अध्यक्षांच्या किंवा सभापतींच्या पदाचा सन्मान राखलाच पाहिजे आणि त्यांच्या निर्देशांचे पालन करणे अनिवार्य आहे. परंतु, अध्यक्ष ‘कार्यपालिका’ म्हणजेच सरकारच्या प्रशासकीय निर्णयांमध्ये थेट हस्तक्षेप करू शकत नाहीत. एखाद्या मंत्र्याने अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे आदेश दिले, तर तो सभागृहाचा निर्देश होतो. मात्र, जर वस्तुस्थिती वेगळी असेल, तर कार्यपालिका त्या निर्णयात बदल करू शकते. आदेशाची अंमलबजावणी करणे शक्य नसेल, तर तसे सभागृहाला कळवावे लागते, असे मुख्यमंत्री म्हणाले.

दरम्यान, ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांनी या निलंबनावर कायदेशीर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी विचारले की, एका आयपीएस अधिकाऱ्याला निलंबित करण्याचे निर्देश देण्याचा अधिकार उपसभापतींना आहे का? जर नसेल, तर त्यांनी असा आदेश कसा दिला? त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर केला आहे का? यावर मुख्यमंत्र्यांनी स्पष्टीकरण दिले.

निलंबनावरुन आमने-सामने

सातारा जिल्हा परिषद निवडणुकीत गोंधळ झाला होता, ज्यामध्ये पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी पोलिसांवर गैरवर्तणुकीचा आरोप केला होता. या तक्रारीची दखल घेत विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी एसपी तुषार दोशी यांना निलंबित करण्याचे आदेश दिले होते. मंत्री जयकुमार गोरे यांनी या निलंबनाला विरोध केला, तर शिंदे गट आणि विरोधी पक्षांनी (अनिल परब) अधिकारांच्या मर्यादेवरून सरकारला घेरले. शिवसेनेच्या मंत्र्यांनी पदाचा राजीनामा देण्याची भाषा केल्याचे समजते.

हेदेखील वाचा : Ahilyanagar News : रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार, ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार

Web Title: Speakers order is not final word says cm devendra fadnavis on suspension order of ips officer doshi

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 25, 2026 | 08:34 AM

Topics:  

  • CM Devendra Fadnavis
  • Maharashtra Politics
  • political news
  • Tushar Doshi

संबंधित बातम्या

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा
1

Maharashtra Politics: ‘महेंद्र थोरवे तिसऱ्यांदा आमदार होणार’; भरत गोगावलेंचा 2029 च्या निवडणुकीबाबत दावा

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन
2

मनसे अध्यक्ष राज ठाकरेंची मोठी घोषणा; आता ईव्हीएमविरोधात करणार जनआंदोलन

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च
3

BJP Politics : निवडणुकीतील खर्चात ‘भाजप एक पाऊल पुढे’; पश्चिम बंगालमधील निवडणुकीत भाजपने केला सर्वाधिक खर्च

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा
4

शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी! दुष्काळग्रस्तांना मदतीचा आदेश उद्याच काढणार; मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांची मोठी घोषणा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.