Ahilyanagar News: रस्त्याच्या त्रासातून सुटका कधी हेणार, ठेकेदारांचा नियोजनशून्य कारभार
नगरपरिषद निवडणुकां डोळ्यासमोर ठेवून शहरातील पारगाव रस्ता, शनीचौक ते जोधपूर मारुती चौक रस्ता ते सिद्धार्थनगर रस्ता हे रस्ते एका बाजूने खोदून ठेवण्यात आलेले आहेत. महिने उलटून देखील रस्त्याची कामे रखडलेली आहेत, रस्ते खोदल्यामुळे एकाच बाजूने वाहतुक सुरु असताना आता बसस्थानक परिसरातील मुख्य रस्त्यावरील वाहतूक पुलाच्या कामामुळे याच अपुऱ्या रस्त्यानवरून वळल्यामुळे श्रीगोंद्यात वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण झाली आहे. शहरातील रस्त्याची कामे आधी पूर्ण करून मग पुलाचे काम सुरु करणे जरुरी असताना सुद्धा ठेकेदाराने केलेल्या घाईमुळे लोकांना यावा त्रास सहन करावा लागत आहे.
Ahilyanagar News: अकोल्यात अनधिकृत लॅबचा सुळसुळाट! डॉक्टरांची साथ अन् आरोग्य विभागाचे दुर्लक्ष
पारगाव रस्त्याचे काम करणाऱ्या ठेकेदाराला अपूर्ण काम पूर्ण करण्याबाबत कुठलीच ताकीद दिली जात नसल्यामुळे हे काम तसेच ठप्प आहे. आधीच रस्त्याच्या अपूर्ण कामामुळे शहरातून एकेरी वाहतूक सुरु असतानाच, आता दौड जामखेड रस्त्याची सगळी वाहतूक त्याच अपूर्ण रस्त्याला वळवल्यामुळे सगळा गोंधळ उडाला आहे. त्यामुळे शहरातील रस्त्यांची कामे पूर्ण करण्या सोबतच दौंड जामखेड रस्त्यावर वाहतूक वळविल्याबाबत आणि रस्ता बंद असून पर्यायी रस्ता कोणता आणि कसा वापरायचा, याबाबत शहरातील मुख्य भागात वाहनचालकांना दिसेल असे दिशादर्शक फलक लावण्याबाबत नगरपरिषदेने संबंधित ठेकेदाराला सूचना करणे गरजेचे आहे.
सरस्वती नदीवरील पुलाच्या पुढे वाहतूक वळण्याबाबत सुचना करणारा फलक लावलेला असला तरी, बसस्थानकाकडे जाणारा रस्ता सुरु असल्यामुळे अनेक वाहनचालक त्या रस्त्याचा वापर करून सरळ पुढे बाजारतळावर पुलाचे काम सुरु असलेल्या ठिकाणी जात आहेत आणि तिथून परत वळून पाठीमागे येत आहेत. रात्रीच्या वेळेस तर काही चालकांना नेमके बाहेर कुठून जायचे हे उमगत नसल्यामुळे ते शहरातील झेंडा चौक, जमादार गल्ली, कुरेशी गल्ली या अरुंद गल्ली बोळात आपली मोठी वाहने घालून तिथून बाहेर निघण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या भागातील नागरिक प्रचंड संतापले आहेत. अरुंद रस्ते आणि त्या भागात असणारी मोठी लोकवस्ती यामुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.






