Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 28 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • Ashadhi Ekadashi |
  • Maharastra |
  • IND VS ZIM
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद 

जिल्हा प्रशासन, केंद्रीय संचार ब्यूरोचा उपक्रम

  • By Aparna
Updated On: Oct 31, 2022 | 03:07 PM
सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित एकता दौडला उत्स्फूर्त प्रतिसाद 
Follow Us
Follow Us:

सोलापूर : एकसंघ भारताचे शिल्पकार लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांची जयंती केंद्र शासनाच्या वतीने “एकतेचा उत्सव” म्हणून साजरा करण्यात येत आहे. यानिमित्ताने जिल्हा प्रशासन, सोलापूर, जिल्हा क्रिडा अधिकारी, नेहरू युवा केंद्र संघटन आणि माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या केंद्रीय संचार ब्यूरो, सोलापूर यांच्या संयुक्‍त विद्यमाने आज सकाळी 7.00 वाजता हुतात्मा चौक ते शासकीय विश्रामगृह सात रस्ता अशा जिल्हास्तरीय एकता दौडचे आयोजन करण्यात आले होते. एकता दौडला सोलापूरकरांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

एकता दौडला पोलीस आयुक्त डॉ. राजेंद्र माने यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला. यावेळी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, जिल्हा क्रीडा अधिकारी नितिन तारळकर, क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंकुश चव्हाण, पोलीस उपायुक्त बापू बांगर, दिपाली धाटे, पोलीस उपअधीक्षक अमोल भारतीय, पोलीस निरीक्षक सुहास जगताप, सहायक पोलीस निरीक्षक राजुरकर, जिल्हा युवा अधिकारी अजीतकुमार, सहायक क्षेत्रीय प्रचार अधिकारी अंबादास यादव, क्रीडा अधिकारी सत्येन जाधव, पोलीस उपनिरीक्षक नितिन थेटे, पोलीस उपनिरीक्षक अविनाश सातपुते, डॉ. विक्रम दबडे, डॉ.स्वप्निल कोठाडिया, विश्वास बिराजदार आणि सतीश घोडके उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात पोलीस बॅँड पथकाद्वारे राष्ट्रगीताने करण्यात आली. जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी सर्वांना राष्ट्राची एकता, अखंडता व सुरक्षा अबाधित ठेवण्याची शपथ दिली. पोलीस बॅंड पथकाच्या विविध संगीत स्वराने संपूर्ण परिसर देशभक्तीमय झाला होता. एकता दौडमध्ये जिल्हा प्रशासनाचे अधिकारी, कर्मचारी, सोलापूर रनर्स असोसिएशन, राज्य राखीव पोलीस दलातील जवान, क्यू.आर.टी. दल, एस.आर. पोलीस प्रशिक्षण केंद्र, उत्कर्ष क्रीडा मंडल, स्वामी समर्थ प्रशिक्षण केंद्र, शहरातील विविध सामाजिक व क्रिडा संस्था, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या प्रमाणात सामील झाले होते. दौडचा समारोप सात रस्ता येथे झाला.

Web Title: Spontaneous response to ekta daud on sardar vallabhbhai patels birth anniversary nrab

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 31, 2022 | 03:07 PM

Topics:  

  • maharashtra
  • Marathon
  • Western Maharashtra

संबंधित बातम्या

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा
1

धाराशिवात मुसळधार पावसालाही न जुमानता आंबेडकरी एल्गार! आनंदराज आंबेडकरांनी दिला सरकारला इशारा

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास
2

शिवाजीराव आढळराव पाटलांचं खासदार अमोल कोल्हेंना आव्हान; ‘या’ प्रकल्पाबाबतही विचारला सवास

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही
3

जिल्हा परिषदेच्या आदेशालाच हरताळ! ७ दिवसात चौकशी अहवाल सादर करण्याचे आदेश; ५० दिवस उलटूनही चौकशीही नाही

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक
4

Bhandara: ३ महिन्यात दूध संकलनात मोठी घट; प्रशासकीय कारवाईचा धसका! भेसळ प्रकरण निरंक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.