पावसातही लालपरी सुसाट; अवघ्या दोन दिवसांत 83 लाख प्रवाशांनी केला एसटीतून प्रवास (फोटो सौजन्य-X)
अकोला : सर्वात किफायतशीर आणि तितकाच सुरक्षेच्या दृष्टीने चांगला असा एसटी बसचा प्रवास मानला जातो. याला चांगली पसंतीही मिळत आहे. त्यातच आता महाराष्ट्रातील ग्रामीण भागात एसटी बसेस हा लोकांसाठी सर्वात मोठा आधार आहे. मात्र, आता ज्या गावांमध्ये रस्ते खराब आहेत तिथे बसेस जाणार नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय अकोल्याच्या एसटी डेपोने घेतला आहे.
महामंडळाने अकोल्यातील धामणा आणि बोरगाव वैराळे ग्रामपंचायतींना बस सेवा रद्द केल्याची माहिती दिली आहे. धामणा ते हातरुण दरम्यानचा 10 किलोमीटरचा रस्ता पूर्णपणे खराब झाला आहे आणि सर्वत्र खड्डे आहेत. त्यामुळे एसटी बसला अवघ्या एका वर्षात मोठे नुकसान सहन करावे लागत आहे. यासोबत अशा रस्त्यांवरून प्रवास करताना अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे अकोला डेपोने हा निर्णय घेतला आहे.
हेदेखील वाचा : कमीत कमी किती डाउन पेमेंट केल्यास Range Rover Velar होईल तुमची? असा असेल EMI चा हिशोब
अकोल्यातील धामणा आणि बोरगाव वैराळे गावातील रस्ते खूपच खराब झाले आहेत. त्यामुळे गावाची बस सेवा बंद होण्याची शक्यता आहे. याबाबत एसटी डेपोने दोन्ही ग्रामपंचायतींना पत्र लिहून गावातील रस्ते दुरुस्त करण्याचे आदेश दिले आहेत. अन्यथा बस फेऱ्या रद्द केल्या जातील.
विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास होईल
सध्या, अकोला ते धामणा रस्त्यावर दिवसातून तीन वेळा फेरी सेवा धावते. या मार्गावरील प्रवासाला सुमारे अर्धा तास लागतो. पण रस्त्यांवर खड्डे असल्याने प्रवासाला एक तास लागतो. तसेच, खराब रस्त्यांमुळे एसटीला खूप नुकसान सहन करावे लागत आहे आणि गाडी चालवणेही कठीण होत असल्याचे एसटी चालकांचे म्हणणे आहे. गावात बस थांब्यामुळे विद्यार्थ्यांना सर्वाधिक त्रास सहन करावा लागणार आहे.