अकोल्यात औरंगजेबावर उदात्तीकरणासाठी दुधाने अभिषेक करण्याचा प्रयत्न झाला (फोटो - सोशल मीडिया)
Crime News : अकोला : अकोला शहरात धक्कादायक घटना घडली आहे. ईद-ए-मिलादुन्नबीनिमित्त काढलेल्या मिरवणुकीत वादग्रस्त पोस्टर दाखवण्यात आले असून यामुळे नवीन वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे. अकोल्यामध्ये झुलुसच्या कार्यक्रमात औरंगजेब आणि इब्राहिम गाझी यांचा प्रचार करण्याचा प्रयत्न झाला असल्याचे उघडकीस आले आहे. टिळक रोडवरील कापडा बाजार चौकात काढलेल्या या मिरवणुकीत इब्राहिम गाझी आणि औरंगजेब यांच्या फोटोवर दूध आणि पाणीने अभिषेक करणाऱ्या तिघांवर शहर कोतवाली पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
अकोल्यामध्ये ईदच्या कार्यक्रमात औरंगजेब आणि इब्राहिम गाझीच्या फोटोवर अभिषेक करणाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्यांमध्ये साई शारिक साई जमीर (वय वर्षे२७), मोहिन खान मतीन खान (वय वर्षे २७), रहिवासी झमझम पार्क गंगानगर आणि साई आसिफ साई अल्ताफ (वय वर्षे २७) यांचा समावेश आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, कोतवाली शहर पोलिसांनी 8 ते 10 अज्ञात लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. आणि आरोपींचा शोध सुरू आहे. व्हिडिओमध्ये काही तरुणांनी औरंगजेबाच्या पोस्टरवर अभिषेक केला आणि इब्राहिम गाझीच्या पोस्टरवरही असेच करण्याचा प्रयत्न केला आहे.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
औरंगजेबाचे पोस्टर भिरकावून ईदच्या जुलूसमध्ये मिरवणूक काढण्यात आली. यामुळे अकोल्यामध्ये तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले आहे. सोशल मीडियावर याचे व्हिडिओ देखील व्हायरल झाले आहेत. एका व्हिडिओमध्ये काही तरुण औरंगजेबाच्या फोटोसह नाचताना दिसत आहेत. ही कृती सामाजिक एकता बिघडवण्याचा प्रयत्न आहे आणि जिल्हा दंडाधिकाऱ्यांच्या आदेशांचे उल्लंघन आहे. हरिहर पेठ आणि शीतला माता मंदिर चौकातही औरंगजेबाचे पोस्टर्स लावण्यात आले आहेत. शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. महाराष्ट्रामध्ये सुरु असलेले हे औरंगजेबाचे उद्दात्तीकारण सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करत आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
शिवसेनेने केले शुद्धीकरण
शहरातील टिळक रोडवरील कापडा बाजार चौकातील औरंगजेबाच्या पुतळ्यावर दूध ओतून काही तरुणांनी हिंदू समाजाच्या भावना दुखावण्याचा प्रयत्न केला होता. या कृत्याचा तीव्र विरोध करत, शिवसेनेने (शिंदे गट) रविवारी त्याच ठिकाणी गोमूत्र आणि गंगाजलाने शुद्धीकरण केले आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन केले. महाराष्ट्रात हिंदूंवर अत्याचार करणाऱ्या आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे पुत्र संभाजी महाराज यांची हत्या करणाऱ्या औरंगजेबाला आदरांजली वाहण्यामागील मानसिकता काय आहे, हा तपासाचा विषय आहे, असे शिवसेनेच्या नेत्यांनी म्हटले आहे.