इस्लामपूर : नगरपरिषदेचे माजी लोकनियुक्त नगराध्यक्ष, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष व प्रकाश शिक्षण मंडळाचे संस्थापक निशिकांत भोसले-पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा शुक्रवारपासून (दि.८) सुरू होत असल्याची माहिती निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे संस्थापक अक्षय भोसले-पाटील यांनी दिली.
अक्षय पाटील म्हणाले, इस्लामपूर येथील प्रकाश शिक्षण मंडळाच्या प्रकाश क्रीडानगरीमध्ये
राज्यस्तरीय फुटबॉल स्पर्धा होतील. सांगली, सातारा, कोल्हापुर, पुणे, मुंबई, फलटण, बीड यासह विविध जिल्हयातील फुटबॉल टीम सहभागी होणार आहेत. विजेत्या संघास २५ हजार व कायम चषक, उपविजेत्यांना १५ हजार व कायम चषक, तृतीय क्रमांक विजेत्या संघास ११ हजार व कायम चषक बक्षीस म्हणून देण्यात येणार आहेत. या स्पर्धा यशस्वीतेसाठी सांगली जिल्हा फुटबॉल असोसिएशनचे अध्यक्ष जग्गू सय्यद, उपाध्यक्ष प्रशांत माने, अनिल रजपूत, सांगली जिल्हा फुटबॉल अकॅडमीचे अध्यक्ष प्रकाश मगर यांचे विशेष सहकार्य व मार्गदर्शन लाभत आहे.
निशिकांतदादा युथ फाऊंडेशन व निशिकांतदादा स्पोर्टस् फाऊंडेशन यांच्या माध्यमातुन सामाजिक उपक्रमासह, क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंना प्रोत्साहन मिळावे म्हणून सातत्याने विविध स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. स्पर्धा यशस्वीतेसाठी निशिकांतदादा युथ फाऊंडेशनचे अध्यक्ष प्रविण माने, उपाध्यक्ष विजय शिंदे, सचिव विश्वजीत पाटील, राष्ट्रीय खेळाडु जुबेर जमादार, वैभव पाटील, सुदर्शन जाधव, सागर जाधव, रणधीर फार्णे, इंद्रजीत पाटील, प्रणव चव्हाण, वैभव चौधरी आदी सह अन्य पदाधिकारी विशेष परिश्रम घेत आहेत.
सुदान देशाचे खेळाडू होणार सहभागी…!
फुटबॉल स्पर्धेत सुदान देशातील नामवंत फुटबॉलपट्टू सहभागी होणार आहेत. उद्घाटनप्रसंगी महिलांच्या दोन संघात प्रदर्शनीय सामना होणार आहे.