Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 14 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RTI कायद्यातील बदलांना तूर्तास स्थगिती; मुख्यमंत्री म्हणाले, ‘अण्णांशी चर्चा होईपर्यंत नवे नियम…’

सुधारित नियमांनुसार माहिती अधिकार अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले होते. तसेच माहितीच्या प्रतींसाठी प्रतिपान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले होते.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 03, 2026 | 09:05 AM
Devendra Fadnavis

Devendra Fadnavis

Follow Us
Follow Us:

मुंबई : माहिती अधिकार (आरटीआय) कायद्यांतर्गत राज्य सरकारने केलेल्या वादग्रस्त नियमबदलांना अखेर तूर्तास स्थगिती देण्यात आली आहे. समाजसेवक अण्णा हजारे यांनी या बदलांविरोधात उपोषणाचा इशारा दिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः हस्तक्षेप केला. अण्णा हजारे यांच्याशी चर्चा होईपर्यंत कोणतेही नवे नियम लागू करू नयेत, अशी विनंती मुख्यमंत्र्यांनी राज्य माहिती आयोगाला केली.

मुख्य माहिती आयुक्तांनी १२ जून रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेतील बदलांना स्थगिती देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री फडणवीस यांनी माहिती अधिकार कायद्यात कोणताही बदल केला जाणार नसल्याचे स्पष्ट करत नागरिकांच्या हिताला प्राधान्य दिले जाईल, असेही सांगितले. या निर्णयामुळे माहिती अधिकार क्षेत्रातील कार्यकर्ते, सामाजिक संघटना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. राज्य सरकारने १२ जून रोजी माहिती अधिकार कायदा, २००५ अंतर्गत सुधारित अधिसूचना जारी केली होती. या अधिसूचनेतील विविध नियमांना सामाजिक संघटना आणि माहिती अधिकार कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध दर्शविला होता.

‘जात पडताळणी प्रक्रिया ब्लॉकचेन आणि AI च्या मदतीने अधिक पारदर्शक करा’; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश

विशेषतः अर्ज शुल्क, अपील शुल्क आणि माहितीच्या प्रतींसाठीचे शुल्क वाढवल्यामुळे सामान्य नागरिकांवर अतिरिक्त आर्थिक भार पडेल, अशी टीका करण्यात आली होती. सुधारित नियमांनुसार माहिती अधिकार अर्जाचे शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये करण्यात आले होते. तसेच माहितीच्या प्रतींसाठी प्रतिपान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये करण्यात आले होते. याशिवाय प्रथम अपीलसाठी ५० रुपये आणि द्वितीय अपीलसाठी १०० रुपये शुल्क आकारण्याची तरतूद करण्यात आली होती.

अण्णांनी दिला होता आंदोलनाचा इशारा

अण्णा हजारे यांनी या बदलांमुळे माहिती अधिकार कायद्याचा मूळ उद्देश कमकुवत होईल, असा आक्षेप घेत आंदोलनाचा इशारा दिला होता. त्यानंतर सरकारने घेतलेल्या भूमिकेमुळे सध्या हे सर्व बदल स्थगित करण्यात आले असून, पुढील निर्णय अण्णा हजारे यांच्याशी चर्चेनंतर घेतला जाणार आहे.

प्रस्तावित प्रमुख बदल नेमके काय?

– अर्ज शुल्क १० रुपयांवरून ३० रुपये.
– माहितीच्या प्रतींसाठी प्रतिपान शुल्क २ रुपयांवरून ५ रुपये.

– एका अर्जात केवळ एकाच विषयाची माहिती मागविण्याची अट.
– अर्ज १५० शब्दांच्या मर्यादेत ठेवणे.

– फोटो ओळखपत्र जोडणे अनिवार्य.
– प्रथम अपील शुल्क ५० रुपये.
– द्वितीय अपील शुल्क १०० रुपये.

– माहिती संकेतस्थळावर उपलब्ध असल्यास तेथूनच माहिती घेण्यास सांगण्याची तरतूद.
– पुनरावृत्तीचे आरटीआय अर्ज निकाली काढण्याची मुभा.

– वैयक्तिक माहिती देण्यासाठी मोठे सार्वजनिक हित सिद्ध करणे आवश्यक.
– ई-मेल, ऑनलाइन आणि यूपीआयद्वारे व्यवहारांना वैधता.

– सुनावणीला वारंवार गैरहजर राहिल्यास अपील फेटाळण्याची तरतूद.

Web Title: Stay on amendments to the rti act for now says cm devendra fadnavis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 03, 2026 | 09:05 AM

Topics:  

  • Anna Hazare
  • devendra fadnavis
  • RTI

संबंधित बातम्या

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल
1

Devendra Fadnavis: ‘सरन्यायाधीशांनी आंदोलकांना भेटावं, असं कोणत्या संविधानात लिहिलंय?’ फडणवीसांचा विरोधकांना थेट सवाल

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!
2

Maharashtra Politics: महायुतीत नेमकं चाललंय तरी काय? राज्यात दुष्काळाचे संकट, पण फडणवीसांच्या बैठकीत दोन्ही उपमुख्यमंत्री गायब!

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश
3

Devendra Fadnavis: महाराष्ट्र दुष्काळमुक्त होणार? जलसंधारणाच्या कामांसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करा; देवेंद्र फडणवीसांचे आदेश

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट
4

Sanjay Raut Criticized Gyanesh Kumar: 2024 मध्ये आमचा कृत्रिम पराभव घडवून आणला! संजय राऊतांचा गौप्यस्फोट

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.