वाईमध्ये सापडली गणपतीच्या आकाराची स्ट्रॉबेरी
वाई : संकष्टचतुर्थीच्या दिवशी वाई येथील शहाबाग येथील स्ट्रॉबेरी फॉर्ममध्ये निसर्गाचा एक अद्भुत चमत्कार अनुभवायला मिळाला. सुहास राजाराम अनपट यांच्या स्ट्रॉबेरी फॉर्ममध्ये चक्क गणपतीच्या आकाराची स्ट्रॉबेरी सापडली. या स्ट्रॉबेरीचे फोटो सोशल मिडियावर प्रचंड व्हायरल झाले असून लाखो लोकांच्या व्हाॅट्सअॅप स्टेट्स, इन्स्टाग्राम अन फेसबूक ट्विटर स्टोरीमध्ये हाच फोटो िफरत आहे. दक्षिण काशी समजल्या जाणाऱ्या वाईचे धार्मिक आणि पौराणिक महत्व खूप मोठे आहे. गणपती घाटावरील पौराणिक मंदिरे पाहिल्यावर वाईच्या धार्मिक परंपरा अधोरेखित होते. वाईचे महागणपती मंदिर लाखाे भक्तांचे, भाविकांचे श्रद्धास्थान..! वाईला आलेला माणूस इथल्या महागणपतीसमोर नतमस्तक न होता जाऊच शकत नाही.
व्हाॅट्सअॅपला स्टेट्स
वाई भागात चतुर्थीच्या दिवशी अनपटवाडी, बावधन येथील सुहास अनपट यांच्या स्ट्रॉबेरीच्या तोडा सुरू असताना त्यांना गणपतीच्या आकाराची एक स्ट्रॉबेरी सापडली. त्यांना याचे खूप कुतूहल वाटले, मग त्यांनी थोडी आणखी फळे शोधली तर त्यांना गणपतीच्या आकाराची आणखी एक स्ट्रॉबेरी सापडली. त्यांनी सहज म्हणून याचा फोटो काढून आपल्या व्हाॅट्सअॅप स्टेट्सला ठेवला. अर्ध्या तासातच सुहास यांच्या फ्रेंड लिस्टमध्ये असणाऱ्या लोकांनी या स्टेट्सचे स्क्रीन शॉट काढून आपल्या व्हाॅट्सअॅपला स्टेट्स ठेवायला सुरुवात केली. थोड्या वेळातच ही पोस्ट फार मोठ्या प्रमाणात सोशल मीडियाच्या सर्वच फ्लॅटफॉर्मवर कमालीची व्हायरल झाली. प्रिंट मीडिया अन इलेक्ट्रॉनिक मीडियाने देखील याची दखल घेतली.
अनुभव भावनिक
बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी निमित्ताने भक्तगण नेहमीच उत्सुक असतात. परंतु, निसर्गाचे गणपतीच्या स्वरूपात दर्शन झाल्याने हा अनुभव अत्यंत भावनिक ठरला आहे. स्ट्रॉबेरीचा आकार अगदी श्री गणेशाच्या मूर्तीप्रमाणे दिसत असल्याने हे दृश्य पाहून सर्वजण थक्क झाले आहेत. चतुर्थीच्या दिवशी असा अनुभव मिळाल्याने आम्ही धन्य झालो आहोत, अशी भावान सुहास अनपट यांनी व्यक्त केली.
मध्यप्रदेशात मिळणार साताऱ्याची स्ट्रॉबेरी
मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पारंपारिक शेतीच्या पलीकडे आपले पहिले पाऊल टाकले आहे. येथील आदिवासी शेतकऱ्यांनी एका नव्या दिशेकडे वाटचाल सुरू केली आहे. मध्य प्रदेशातील झाबुआ जिल्ह्यातील प्रगतीशील शेतकरी रमेश परमार आणि त्यांच्या इतर सहकारी शेतकऱ्यांनी आपल्या धाडसाने, मेहनतीने आणि कल्पकतेने अशक्य ते शक्य करून दाखवले आहे. आदिवासीबहुल भागात प्रथमच स्ट्रॉबेरीची शेती सुरू केली झाली. परंपरेने ज्वारी, मका आणि इतर सर्वसाधारण पिकांसाठी ओळखल्या जाणाऱ्या या भागातील शेतकरी आता बागायती पिकांकडे वळले आहेत. जिल्ह्यातील रामा ब्लॉकमधील भुराडबरा, पालेडी आणि भंवरपिपलिया या तीन गावांतील 8 शेतकऱ्यांच्या शेतात स्ट्रॉबेरीच्या रोपांची लागवड करण्यात आली आहे.
हेही वाचा: Strawberry Farming: मध्यप्रदेशात मिळणार साताऱ्याची स्ट्रॉबेरी; रमेश परमारच्या यशाची कहाणी
महाराष्ट्रातील साताऱ्यातून आणली स्ट्रॉबेरीची रोपे
मध्य प्रदेश कृषी विभागाच्या म्हणण्यानुसार, झाबुआमध्ये, स्ट्रॉबेरी, जे सामान्यतः थंड भागात पिकते, ते अनुकूल परिस्थितीत वाढवण्याचा प्रयोग करण्यात आला. महाराष्ट्रातील सातारा जिल्ह्यातून 5000 रोपे खरेदी करण्यात आली आणि प्रत्येक शेतकऱ्याच्या शेतात 500 ते 1000 रोपे लावण्यात आली, परंतु प्रत्येक रोपाची किंमत फक्त 7 रुपये होती, परंतु ते वाढवण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांना बागायतीच्या प्रगत आणि आधुनिक तंत्राची ओळख झाली.