(फोटो सौजन्य: Instagram)
काय दिसलं व्हिडिओत?
तरुणीने तिच्या या कलाप्रदर्शनासाठी कोणत्याही खास रंगाचा, ब्रशचा किंवा कॅनव्हसचा वापर केला नाही तर झाडालाच कॅनव्हस बनवत त्यावर तिने प्रमानंद महाराजांची हुबेहुब दिसणारी प्रतिकृती साकारली. प्रथम तिने मातीचा एक गोळा झाडावर चिपकवला आणि हळूहळू त्याला आकार देत तिने डोळे, नाक आणि चेहऱ्याचे भाव सुंदररित्या कोरले. यातील भाव आणि जिवंतपणा इतक्या खोलवर रेखाटलेला होता की पाहून सर्वांचाच ऊर भरुन निघाला. आधुनिक उपकरणांशिवाय इतक्या अचूकतेने काम करणे सोपे नाही. पण मुलीने तिच्या समर्पणाने आणि कौशल्याने ते साध्य केले. याचा व्हिडिओ व्हायरल होताच आता यूजर्स तरुणीच्या कलेला निसर्ग आणि कलेचा सुंदर मिलाफ म्हणत आहेत. अनेकांनी तिच्या कलेचे काैतुक केले तर काहींनी तिच्या मेहनतीची प्रशंसा केली.
तरुणीचा हा व्हिडिओ सोशल मिडियावर सर्वांचेचे लक्ष वेधून घेत असून व्हिडिओला @shivi_in_art नावाच्या इंस्टाग्राम अकाऊंटवरुन शेअर करण्यात आले आहे. व्हिडिओला आतापर्यंत लाखो व्युज मिळाल्या असून हजारो युजर्सने व्हिडिओवर कमेंट करत यावर आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत. एका युजरने लिहिले आहे, “तुम्ही खरोखर चांगल्या कलाकार आहात” तर दुसऱ्या युजरने लिहिले आहे, “फार सुंदर” आणखीन एका युजरने लिहिले आहे, “तिच्या कलेला तोड नाही”.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.






