Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Bihar Election 2025 |
  • Political News |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Lawyer Protection Act: वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार, हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

Advocates Protection Act: न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक असलेल्या वकिलांना हल्ले, धमक्या आणि खोट्या गुन्ह्यांपासून वाचवण्यासाठी आ. सुनील प्रभू यांनी महाराष्ट्र विधान सभेत अशासकीय विधेयक सादर केले आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Nov 12, 2025 | 08:31 PM
वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार (Photo Credit - X)

वकिलांच्या सुरक्षिततेसाठी कठोर कायदा येणार (Photo Credit - X)

Follow Us
Close
Follow Us:
  • न्यायदात्यांसाठी ‘सुरक्षा कवच’
  • वकिलांना संरक्षण देणारा कायदा हिवाळी अधिवेशनात!
  • वकिलांवरील हल्ल्याबाबत शिक्षेची तरतूद व्हावी

मुंबई, नवराष्ट्र न्यूज नेटवर्क: महाराष्ट्र राज्यात वकील हे न्यायव्यवस्थेचे अविभाज्य घटक असून कायद्याचा अर्थ लावून न्यायदान करण्याच्या प्रक्रियेत ते नागरिकांच्या मूलभूत अधिकारांचे रक्षण करण्याचे महत्त्वाचे कार्य करतात. अलिकडच्या काळात वकिलांवर पोलीस ठाण्यात हल्ला होणे, सार्वजनिक ठिकाणी शारीरिक व मानसिक हल्ले होणे, धमक्या मिळणे, पोलिसांकडून खोटे गुन्हे दाखल करण्यात येणे आदी घटनांमुळे न्यायव्यवस्थेचे संरक्षण करणाऱ्या वकिलांचे संरक्षण व सुरक्षितता धोक्यात आली आहे.

आ. सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयक सादर केले आहे

अशा घटनांमुळे न्यायव्यवस्थेची प्रतिष्ठा धोक्यात येऊन नागरिकांचा न्यायप्रक्रियेवरील विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. वकिलांच्या संरक्षणासाठी भारतीय न्याय संहिता आणि भारतीय नागरिक सुरक्षा संहिता या अधिनियमात सुधारणा करण्यासाठी आ. सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयक सादर केले आहे.

हे देखील वाचा: अभिमानास्पद! स्वातंत्र्यवीरांचे वास्तव्य असलेले ‘इंडिया हाऊस’ महाराष्ट्र शासन ताब्यात घेणार

हिवाळी अधिवेशनात चर्चेला येणार विधेयक

या विधेयकामुळे वकिलांना कायदेशीर सुरक्षा प्राप्त होऊन दिलासा मिळणार असल्याने राज्यातील वकील संघटनानी आमदार सुनिल प्रभु यांचे विशेष आभार मानले आहेत. महाराष्ट्र विधानसभेचे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे मुख्य प्रतोद, आमदार सुनील प्रभू यांनी ०६.११.२०२५ रोजी महाराष्ट्र विधान सभेत अशासकीय विधेयक सादर केले आहे. आगामी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात हे विधेयक माननीय अध्यक्षांच्या परवानगीने चर्चेला येणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

वकिलांवरील हल्ल्याबाबत शिक्षेची तरतूद व्हावी

वकिलावर होणारे हल्ले गंभीर व अजामिनपात्र गुन्हा घोषित करून त्यासाठी किमान दोन वर्षांपासून ते कमाल सात वर्षे शिक्षा आणि मृत्यू झाल्यास भारतीय संहितेनुसार आजन्म कारावासाच्या शिक्षेची तरतूद या विधेयकात वकिलांच्या सुरक्षेसाठी करण्यात आली आहे. या अशासकीय विधेयक सभागृहाने स्वीकृत करून त्याचे अधिनियमात रूपांतरित करून अंमलबजावणी करावी, अशी आमदार सुनील प्रभू यांनी अशासकीय विधेयकाद्वारे शासनाकडे मागणी केली आहे.

हे देखील वाचा: Mira Bhayandar News: तब्बल 11 वर्षांनंतर जनता दरबाराच्या निमित्ताने गणेश नाईकांची मिरा-भाईंदरमध्ये एन्ट्री!

Web Title: Strict law will be introduced for the safety of lawyers bill will be discussed in the winter session

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 12, 2025 | 08:31 PM

Topics:  

  • maharashtra
  • maharashtra news
  • police
  • Sunil Prabhu

संबंधित बातम्या

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती
1

Mumbai Water Cut: मुंबईकरांनो सावधान…! दोन दिवस पाणीपुरवठा बंद , जाणून घ्या तुमच्या भागातील परिस्थिती

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…
2

Ladki Bahin Yojana: लाडक्या बहि‍णींना मिळणाऱ्या 1500 रुपयांबाबत सरकारचा महत्त्वाचा निर्णय, ‘त्या’ महिलांसाठी बदल…

पावसामुळे पिकांचे नुकसान, शेतमालाला भाव नाही..राज्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट
3

पावसामुळे पिकांचे नुकसान, शेतमालाला भाव नाही..राज्यातील शेतकऱ्यांवर दुहेरी संकट

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने EMBED कार्यक्रमाचे दशकपूर्ती यश; आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल!
4

महाराष्ट्र सरकारच्या सहकार्याने EMBED कार्यक्रमाचे दशकपूर्ती यश; आरोग्यव्यवस्थेत आमूलाग्र बदल!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.