Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 17 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • Dharmendra Pradhan |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

यवतमाळमध्ये ऊस पिकावर पांढऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव वाढल्यामुळे उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे. यामुळे ऊस उत्पादक शेतकरी चिंतेमध्ये पडला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: Aug 30, 2026 | 11:00 AM
पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

पांढऱ्या किडीचा प्रादुर्भावाने ऊसपीक धोक्यात! वाढ खुंटल्याने पाने पिवळी; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

Follow Us
Follow Us:

परिसरातील ऊस पिकावर पांढऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत आहेत. किडीमुळे उसाची वाढ खुंटून पाने पिवळी पडत आहेत. प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात न आल्यास उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे. शेंबाळपिंपरी परिसरात इसापूर धरणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. ऊस हे नगदी पीक असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. परिसरापासून सहा ते ३० किलोमीटरच्या अंतरात दोन-तीन साखर कारखाने असल्याने ऊस उत्पादकांना बाजारपेठही उपलब्ध आहे. मात्र, सध्या पिकावर पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे राहिले आहे.(फोटो सौजन्य – istock)

Yavatmal News: दर्जेदार बियाण्यांसाठी राष्ट्रीय संस्थांशी करार! आता हवामानानुकूल व अधिक उत्पादनक्षम वाण उपलब्ध होणार

सध्या ऊस पीक उंच वाढले आहे. त्यामुळे पारंपरिक फवारणी यंत्राद्वारे शेतात जाऊन औषध फवारणी करणे कठीण झाले आहे. मजुरांकडून फवारणी केल्यास उसाचे धांडे मोडण्याची शक्यता आहे. तसेच कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. पांढऱ्या किडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम असून, त्यावर कोणती औषधे व कोणत्या पद्धतीने फवारणी करावी, याबाबत कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी होत आहे.

४३ हजार शेतकरी झाले कर्जमुक्त! ३७४ कोटी ३१ लाख रुपये खात्यात जमा; पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजना

ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी कृषी विभाग तसेच परिसरातील साखर कारखान्यांच्या कृषी विभागाने संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात. उंच वाढलेल्या उसावर प्रभावीपणे फवारणी करण्यासाठी ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही तर ऊस उत्पादनावर मोठा परिणाम होण्याची शक्यता असल्याने प्रशासन आणि कारखाना व्यवस्थापनाने तातडीने दखल घ्यावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Sugarcane crop at risk due to white grub infestation stunted growth causing leaves to turn yellow

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 30, 2026 | 11:00 AM

Topics:  

  • farmer
  • Sugarcane Farmers
  • Yavatmal

संबंधित बातम्या

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट
1

Amravati News: अपुऱ्या पावसाचा रब्बी हंगामाला मोठा फटका! गहू-हरभरा पेरणीपूर्वीच शेतकऱ्यांसमोर संकट

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन
2

Yavatmal News: जन्म-मृत्यूची नोंदणी सीआरएसवर अनिवार्य! २१ दिवसांच्या आत नोंदणी करा, जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार
3

Sugar Factory Strike : महाराष्ट्रातील साखर कारखाने उद्यापासून बंद? राजू शेट्टी आक्रमक, ऊसाचे ट्रॅक्टर-ट्रक अडवणार

Akola News: हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ
4

Akola News: हप्ता थकला म्हणून फायनान्सवाले थेट घरी; पत्नीचा फोटो काढल्याच्या आरोपाने खळबळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.