लेकीच्या लग्नासाठी ठेवली होती बँकेत रक्कम; तिच मिळत नसल्याने आलं नैराश्य (Photo : Suicide)
पालघर : बोईसर परिसरातील दहावीतील विद्यार्थ्यांने आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. नितीन मुखिया (वय १७) असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्यांचे नाव असून, तो खैरापाडा परिसरातील एका नामांकित शाळेत इयत्ता दहावीमध्ये शिक्षण घेत होता.
आई-वडील दोघेही मजुरीसाठी घराबाहेर असताना मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास नितीन याने आपल्या राहत्या खोलीत गळफास घेतला. शेजारी राहणाऱ्या लहान मुलांनी घराचा दरवाजा उघडल्यानंतर ही दुर्दैवी घटना उघडकीस आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांनी नितीनला तातडीने बोईसर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मृत घोषित केले. लोग्वंदी पादा येथील अगदी छोट्या खोलीत राहणाऱ्या नितीनच्या आई वडिलांची परिस्थिती अतिशय गरीब आहे.
हालाखीची परिस्थिती असताना देखील त्यांनी आपल्या मुलाला काबाडकष्ट करून इंग्रजी माध्यमाच्या शाळेत शिक्षणासाठी ठेवले होते. मागील दोन-तीन दिवसांपासून नितीन शाळेत जात नव्हता. दरम्यान, दहावीची परीक्षा जवळ आली असताना एकुलत्या एक मुलाने अचानक आत्महत्या केल्याने त्याच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे. आई-वडील दोघेही मजूरी करत असल्याने मुखिया कुटुंबावर मोठे संकट आले आहे.
प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी
मुलाच्या आत्महत्या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी वडिलांनी बोईसर पोलिसांकडे केली असून, अकस्मात मृत्यूची नोंद बोईसर पोलिस ठाण्यात करण्यात आली आहे. नितीन मुखिया या शाळकरी विद्यार्थ्याने केलेल्या आत्महत्येमागे शाळेतील किंवा इतर काही कारणे आहेत का? याची चौकशी बोईसर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक शिरीष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान चौधरी हे करीत आहेत.
आत्महत्येपूर्वी तयार केली ऑडिओ क्लिप
आमचा मुलगा काही दिवस शाळेत जात नव्हता. तो निराश होता. मात्र, त्याने त्याची ऑडिओ क्लिप तयार करून ठेवली, त्यानंतर त्याने आपले जीवन संपवले. शाळा प्रशासनाकडून माझ्या मुलाला त्रास होता. या प्रकरणाचा तपास करून तशी कारवाई करावी.
– सुरेश मुखिया, पालक