Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 6 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Baramati By Election: सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज; मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित

बारामती विधानसभा पोटनिवडणुकीसाठी सुनेत्रा पवार उद्या ६ एप्रिलला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत शक्तीप्रदर्शन करणार आहे.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Apr 05, 2026 | 09:47 PM
सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज (Photo Credit- X)

सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज (Photo Credit- X)

Follow Us
Follow Us:

 

  • सुनेत्रा पवार सोमवारी भरणार उमेदवारी अर्ज
  • मुख्यमंत्र्यांसह राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थित
बारामती/प्रतिनिधी: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापू लागले आहे. राष्ट्रवादीकडून या पोटनिवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. या निवडणुकीसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार सोमवार, दि. ६ एप्रिल रोजी आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. बारामती प्रांत कार्यालयात हा अर्ज दाखल करण्यात येणार असून यावेळी महायुतीतील प्रमुख नेत्यांची उपस्थिती राहणार आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार असल्याने बारामतीच्या पोटनिवडणुकीसाठी विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. सोमवारी (दि ६ एप्रिल)दुपारी १२.३० ते १.३० या वेळेत सुनेत्रा पवार उमेदवारी अर्ज सादर करणार आहेत.

यापूर्वी सकाळपासूनच त्यांचा दौरा नियोजित करण्यात आला आहे. सकाळी ९ वाजता त्या काटेवाडी येथील निवासस्थानी भेट देणार असून त्यानंतर ९.१५ वाजता कण्हेरी येथील हनुमान मंदिरात दर्शन घेणार आहेत. पुढे ९.३० वाजता विद्या प्रतिष्ठान शैक्षणिक संकुलातील क्रीडांगणावर उभारण्यात आलेल्या अजित पवार यांच्या स्मृतीस्थळाला भेट देऊन अभिवादन करणार आहेत.

शेवटच्या निर्णायक क्षणी सुनेत्रा पवारांचा राजकीय डाव; बारामतीसाठी सुनेत्रा पवारांचा थेट काँग्रेस प्रदेशाध्यांना फोन

यानंतर सकाळी १० वाजता बारामती शहरातील कसबा परिसरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येणार आहे. पुढे सव्वा दहा वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासही अभिवादन करण्यात येणार आहे.

त्यानंतर सकाळी साडेदहा ते दुपारी सव्वा बारा या वेळेत कविवर्य मोरोपंत नाट्यगृह येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्याचे आयोजन करण्यात आले असून या मेळाव्यात सुनेत्रा पवार कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत.

या सर्व कार्यक्रमांनंतर त्या प्रशासकीय भवन येथे जाऊन आपला अधिकृत उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. दरम्यान बारामती विधानसभा मतदारसंघाची पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी कार्यकर्त्यांनी पूर्ण ताकतीने प्रयत्न करावा असे आवाहन युवा नते जय पवार यांनी केले आहे.

NCP Politics : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या पुन्हा सुरु झाल्या चर्चा; सुनेत्रा पवार राजी, पण प्रफुल्ल पटेल अन् तटकरे…

Web Title: Sunetra pawar to file nomination for baramati bye election mahayuti show of strength

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 05, 2026 | 09:46 PM

Topics:  

  • baramati
  • baramati news
  • Mahayuti
  • Sunetra Pawar

संबंधित बातम्या

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास
1

Baramati Theft News: बारामतीत टायरच्या दुकानात चोरी; ५१ हजार ४१४ रुपयांचा मुद्देमाल केला लंपास

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक
2

Baramati Politics: दादा नसताना अशी सभा घ्यावी लागेल, असे कधीच वाटले नव्हते; जय पवार भावूक

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा
3

सोमेश्वर कारखाना कोणा एकाची प्रॉपर्टी नाही, अजितदादांचा फोटो का वापरता? सुनेत्रा पवारांचा पुरुषोत्तम जगतापांवर निशाणा

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!
4

MLC Election 2026 : महायुतीचा जागावाटपाचा तिढा सुटला; पुणे शिक्षक भाजपकडे, अमरावती शिवसेनेकडे, तर राष्ट्रवादीला संभाजीनगर!

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.