मुंबई : अंधेरी पोटनिवडणुकीत (Andheri East bypoll) भाजपाने अर्ज मागे घ्यावा, असं काल शरद पवार आणि राज ठाकरे यांनी म्हटलं होतं. त्यानंतर आज भाजपचे उमेदवार मुरजी पटेल यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी यासंदर्भात नागपूरमध्ये घोषणा केली आहे. भाजपचे राष्ट्रीय सचिव सी.टी. रवी (BJP leader C.T.Ravi) आज मुंबईत आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात आज ‘वर्षा’ बंगल्यावर बैठकही झाली होती. भाजपच्या नेत्यांच्या बैठकीनंतर मुरजी पटेल यांचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दरम्यान, आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन राजकीय वर्तुळातून प्रतिक्रिया येत आहेत.
[read_also content=”आमदार भरत गोगावले यांना ग्रामपंचायत निवडणुकीत धक्का, गोगावलेंची ग्रामपंचायत महाविकास आघाडीकडे https://www.navarashtra.com/maharashtra/mla-bharat-gogavle-shocked-in-gram-panchayat-elections-gogavles-gram-panchayat-mahavikas-aghadi-337018.html”]
दरम्यान, ठाकरे गटाकडून आता उमेदवारी अर्ज मागे घेण्यावरुन प्रतिक्रिया येत आहेत. समोर पराभव दिसत असल्यानं भाजपाने अर्ज मागे घेतला आहे. भाजपा हा संवेदनशील पक्ष वैगरे काही नाही. त्यांना समोर पराभव दिसत असल्यामुळं त्यांनी हा निर्णय घेतला आहे. अशी टिका ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांनी केली आहे. दरम्यान, या निवडणुकीत ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके यांना उभं करण्यात आलं आहे. भाजपच्या निर्णयानंतर लटके यांनी सगळ्यांचे आभार मानले आहेत.