पुणे : कल्याणीनगर पोर्शे कार अपघात प्रकरणी कार चालक अल्पवयीन मुलाला वाचवण्यासाठी त्याचे रक्ताच नमुने कचऱ्यात फेकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या गैरप्रकाराची चौकशी करण्यासाठी विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली. त्याच्या अध्यक्षा डॉ. पल्लवी सापळे यांच्यावरच यापूर्वी भ्रष्टाचाराचे आरोप झाले आहेत. त्यांची नेमणूक रद्द झाली पाहिजे. नेमणुकीसाठी वेगळा डॉक्टरची नेमणूक करावी. जो डॉक्टर अगोदरच वादग्रस्त आहे ज्याच्यावर सरकार पक्षाने भ्रष्टाचाराचे चिक्कार आरोप केले आहेत अशांकडून आम्ही प्रामाणिक तपासाची काय अपेक्षा करणार असा सवाल शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी केला आहे.
रक्तातला प्लाजमा काढून विकण्याचा आरोप
रक्त नमुन्यात फेरफार झाला म्हणून हे प्रकरण पुढे आले. त्यात डॉक्टरांना अटक झाली. अटकेची मागणी आठ महिन्यापूर्वी केली होती ते आता झाले परंतु त्यात जुजबी कलमे लावले आहेत. त्यामुळे त्यांची पटकन सुटका होईल. रक्त नमुन्यातील फेरफार बाबत समितीत आणलेल्या डॉ. त्यांच्यावर रक्तातला प्लाजमा काढून विकण्याचा आरोप आहे. हा आरोप मी केला नाही तर सरकार पक्षातल्या यामिनी जाधव यांनी केला आहे. सभागृहाच्या पटलावर हा आरोप केला आहे. आणि विशेष एखादी समिती नेमली जात असेल तर वेगवेगळ्या विभागातील तीन सदस्या नेमले पाहिजे असेही अंधारे म्हणाल्या.
काय आहे नेमकं प्रकरण
पुणे पोर्शे अपघात प्रकरणामध्ये ससून रुग्णालयात अल्पवयीन आरोपी मुलाचे रक्ताचे नमुने घेण्यात आल्यानंतर ते ससूनमध्ये चाचणीसाठी पाठवण्यात आले होते. मात्र, आरोपीचे रक्ताचे नमुने फेकून देत अज्ञात दुसऱ्याचे मुलाचे नमुने चाचणीसाठी पाठवण्यात आले. यानंतर ससून रुग्णालयातील तीन जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. यामध्ये दोन डॉक्टरांना अटक करण्यात आली होती. यानंतर आता धक्कादायक बाब समोर आली आहे. ससून रुग्णालयातील रक्त चाचणी विभागातील एक कर्मचारी पळून गेल्याची माहिती समोर येत आहे.
रक्त तपासणी विभागाची चौकशी