Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 22 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Cockroach Janta Party |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • Navbharat Conclave
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! ‘मृत्युदूत’ बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई; पालिका प्रशासनाकडून दुर्लक्ष

मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल 'आम्ही गिरगावकर' संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

  • By सुरुची कदम
Updated On: May 30, 2026 | 11:30 AM
गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! 'मृत्युदूत' बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई

गिरगावात पाणीटंचाईचा फायदा घेणारे टँकरचालक नशेत ! 'मृत्युदूत' बनलेल्या चालकांवर पोलिसांकडून कारवाई

Follow Us
Follow Us:

मुंबईतील गिरगाव भागात गेल्या काही दिवसांपासून तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाण्यासाठी नागरिकांना स्वतःच्या खिशातून पैसे खर्च करून विकतचे पाणी घ्यावे लागत आहे. मात्र, याच हतबलतेचा गैरफायदा घेत गिरगावात टँकर माफियांचा उच्छाद वाढला असून, हे टैंकर चालक नागरिकांच्या जीवाची कवडीचीही पर्वा करत नसल्याचे समोर आले आहे. अनेक टँकरचालक चक्क दारूच्या नशेत सुसाट वाहने चालवत असल्याचा खळबळजनक आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे. या गंभीर परिस्थितीमुळे संतप्त झालेल्या गिरगावकरांनी आता थेट प्रशासनालाच धारेवर धरले असून, दारू पिऊन टैंकर चालवणारे चालक काय जनतेनेच शोधून आणि पकडून द्यायचे का? महापालिका, पोलिस आणि आरटीओ विभाग काय फक्त नावापुरता उरला आहे का, असा सवाल विचारला आहे.(फोटो सौजन्य – AI)

CNG Price Hiked : मुंबईत CNG च्या दरात पुन्हा वाढ; तब्बल ‘इतक्या’ रुपयांनी महागला गॅस

सिक्कानगरच्या ‘त्या’ काळ्या आठवणी अजूनही ताज्या

तीन वर्षांपूर्वी गिरगावच्या सिक्कानगर भागात एका बेदरकार टैंकर चालकाने एका निष्पाप महिलेला चिरडल्याची TERTANK थरारक घटना घडली होती. या भीषण अपघाताच्या काळ्या आठवणी अजूनही गिरगावकरांच्या मनात ताज्या आहेत. असे असतानाही, आज पुन्हा एकदा गिरगावच्या रस्त्यांवर हे टैंकर ‘मृत्यूदूत’ बनून धावत आहेत. मुजोर टैंकर चालक आणि बेकायदेशीर पाण्याचा उपसा करणारे टैंकर मालक यांच्यावर मुंबई महापालिका आणि संबंधित विभाग कोणतीही ठोस कारवाई का करत नाही, असा सवाल ‘आम्ही गिरगावकर’ संस्थेच्या वतीने उपस्थित करण्यात आला आहे.

कठोर कारवाई न केल्यास आंदोलनाचा इशारा

या मुजोर टैंकर चालकांवर तत्काळ गुन्हे दाखल करून बेकायदेशीर पाणी उपसा करणाऱ्या मालकांवर कठोर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा गिरगावकरांनी दिला आहे. आता यावर पालिका आणि पोलिस प्रशासन काय पावले उचलणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.अवैध पाण्याचा उपसा आणि भरधाव वेगाने धावणारे टैंकर उघड्या डोळ्यांनी पाहूनही पालिका प्रशासन मूग गिळून गप्प का आहे? यावरून, ‘तेरी भी चूप, मेरी भी चूप’ असं म्हणत पालिका प्रशासन आणि टैंकर माफियांचे साटेलोटे तर सुरू नाही ना? अशी शंका येथील नागरिक ज्ञानंद कवठणकर यांनी व्यक्त केली जात आहे.

नियमांतर्गत कामावर रुजू करून घेतले जाते, यासंदर्भात विभागीय अधिकाऱ्यांकडून अधिकृत माहिती मागवण्यात आली आहे. तसेच नशेत गाड्या चालवणाऱ्या बेजबाबदार चालकांविरोधात पोलिसांत रीतसर तक्रारही दाखल करण्यात आली आहे. या समस्येवर कायमस्वरूपी आणि जलद तोडगा काढण्यासाठी आम्ही लवकरच वाहतूक पोलिस आणि महापालिकेचे साहाय्यक आयुक्त यांच्यासोबत एक विशेष संयुक्त बैठक घेणार आहोत, असे मत स्नेहल तेंडुलकर, नगरसेविका यांनी व्यक्त केले आहे.

पाठदुखी, मणक्याचे विकार वाढले! ‘क्रॉनिक पेन’कडे दुर्लक्ष धोकादायक! मुंबईतील MIPSICON परिषदेत तज्ज्ञांचा इशारा

या प्रकरणाची गंभीर दखल घेत तत्काळ कारवाईचा बडगा उगारला आहे. बेदरकारपणे टैंकर चालवणाऱ्या रणजीत यादव या टँकरचालकावर पोलिसांनी ‘ड्रिंक अँड ड्राईव्ह’ (दारू पिऊन वाहन चालवणे) अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला बेड्या ठोकल्या आहेत. तसेच त्याचा वाहनचालक परवाना कायमचा रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली.

डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.

Web Title: Tanker drivers taking advantage of water shortage in girgaon are drunk action by police on drivers who have become messengers of death

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2026 | 11:30 AM

Topics:  

  • Girgaon
  • Mumbai News
  • Water supply

संबंधित बातम्या

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन
1

BEST कर्मचाऱ्यांचा पुन्हा संपाचा इशारा; 15 ऑगस्टपर्यंत निर्णय न झाल्यास बेमुदत आंदोलन

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग
2

Amravati News: अमृत जलपुरवठा योजनेचे ४४ टक्के काम पूर्ण! ९८५.२६ कोटींच्या प्रकल्पाला पावसामुळे ब्रेक; दिवाळीनंतर येणार वेग

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन
3

‘कानडा राजा पंढरीचा’तून भक्तीचा जागर! आषाढी एकादशीनिमित्त मुंबईत विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक
4

Mumbai News: आरे स्टॉलधारकांना दिलासा! पुनर्वसनासह स्वतंत्र धोरणासाठी महापालिका प्रशासन सकारात्मक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.