Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 24 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Housing Problems: उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Housing Problems: आदिवासी नागरिकांच्या समस्या संपता संपत नाही. उपोषणे केली, आंदोलने झाली, आश्वासनेही मिळाली; मात्र टाटा कंपनीकडून जमीन आणि घरे मिळाली नसल्याची व्यथा स्थानिक नागरिक मांडत आहेत. घरांवर दगड पडणे, भिंतींना तडे जाणे यांसारख्या समस्यांमुळे रहिवासी त्रस्त आहेत. या प्रश्नावर कंपनी आणि प्रशासनाकडून ठोस तोडगा कधी निघणार?

  • By श्वेता झगडे
Updated On: Oct 24, 2026 | 12:50 PM
उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

उपोषणे झाली, आश्वासनेही मिळाली; तरी टाटा कंपनीकडून ना जमीन, ना घरे! तापकीरवाडीतील आदिवासींच्या समस्या कायम

Follow Us
Follow Us:
  • घरांवर दगड, भिंतींना तडे
  • तापकीरवाडीतील आदिवासी त्रस्त
  • टाटा कंपनीच्या आश्वासनांचे काय झाले?
कर्जत: कर्जत तालुक्यातील टाटा समूहाच्या माध्यमातून धरण बांधले जाणार आहे. या धरणाचे खोदकाम गेली वर्षभर सुरू आहे.या खोदकामाचे बाजूला असलेल्या आदिवासी वाडी आणि धनगर वाडा वस्तीमधील घरांवर ब्लास्टिंग केल्यानंतर दगड कोसळत आहेत. दरम्यान,गेली वर्षभर या आदिवासी वाडीमधील रहिवाशांना जमीन घेऊन घरे बांधून दिली जाणार आहेत. मात्र आमच्या कोणत्याही मागण्या मान्य न करता आदिवासी लोकांचे बळी घ्यायचा टाटा कंपनीचा डाव आहे असा जाहीर आरोप येथील ज्येष्ठ महिलांनी केला आहे. (Housing Problems)

कर्जत तालुक्यातील तापकीरवाडी धनगरवाडामध्ये टाटा कंपनीच्या कारभारामुळे अशी घटना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. टाटा कंपनीकडून जलविद्युत प्रकल्पासाठी 65 एकर जमिनीमध्ये खोदकाम करून पाणी साठवण धरण बांधले जात आहे. दरम्यान या पाणी साठवण धरणासाठी केले जात असलेले खोदकाम केलेली माती यांचे डोंगर उभे राहिले आहेत. ते डोंगर उद्या तापकीरवाडी धनगरवाडा या 22 घरांवर कोसळून येथे मोठी दुर्घटना होण्याची शक्यता आहे.

Raigad News: ‘एकही झाड तोडू देणार नाही’, कर्जतमधील टोरंट प्रकल्पाला नागरिकांचा विरोध; झाडांना मिठी मारून होणार चिपको आंदोलन!

टाटा कंपनी मालकीच्या जमिनीवर धरण…

कर्जत तालुक्यातील भिवपुरी ग्रामपंचायत हद्दीत भिवपुरी गावच्या टाटा कंपनी आपल्या मालकीच्या जमिनीवर धरण बांधत आहे. कंपनीच्या मालकीच्या जमिनीमध्ये 100 मीटर खोदकाम करून पाणी साठवण करणारे मोठा तलाव निर्मिती केली जात आहे. टाटा कंपनी कडून येथे विद्युत स्टोअरेज करण्यासाठी उदांचन १००० मेगाव्हॅट प्रोजेक्ट च्या काम वर्षभरापासून सुरू आहे. काम सुरू झाल्यापासून माती आणि दगड फोडून खोदकाम सुरू असून प्रचंड प्रमाणात सुरुंग स्फोट केले जात आहेत.

65 एकर जमिनीमध्ये खोल खड्डा खोदला जात असून ही खोदकाम गेल्या वर्षापासून सुरू असून टाटा कंपनीकडून सुरू असलेले उत्खनन यामुळे परिसरात पर्यावरण धोक्यात आले आहे. खोदकाम करण्यासाठी अवजड मशिन आणण्यात आल्या असून दिवसरात्र हे काम सुरू आहे.त्यावेळी खोदकाम करण्यासाठी प्रसंगी सुरुंग स्फोट केले जात असतात आणि त्यावेळी निघणारी माती ही एका बाजूला साठवून ठेवली जात आहे.त्यात दगड एका बाजूला आणि दुसरी बाजूला मातीचे ढीग अशी रचना असून ते इमारती एवढ्या उंचीचे मातीचे ढीग हे तेथील आदिवासी लोकांसाठी जीव घेणारे ठरू शकतात.

मातीचे डोंगर स्थानिकांसाठी धोकादायक

गतवर्षी मे महिन्यापासून जमिनीमध्ये उत्खनन सुरू असून मातीचे ढीग बाहेर निघत आहेत. हे मातीमुळे डोंगर तयार झाले असून त्यातून मोठ मोठे डोंगर तयार झाले आहेत.हे मातीचे डोंगर स्थानिकांसाठी धोकादायक बनले आहेत.टाटाचे उदांचन १००० मेगा व्हॅट क्षमतेचा प्रोजेक्ट तयार केला जात आहे. या प्रोजेक्ट साठी खूप मोठ्या प्रमाणात उत्खन केले जात आहे. विद्युत निर्मितीसाठी वापरला जाणारे पाणी स्टोरेज करून पुन्हा उपयोगात आणण्यासाठी उत्खनन केले जात आहे हे स्थानिकांचा जीव घेणारे ठरू शकतात.

प्रशासनाने याबाबत कोणत्याही हालचाली केल्या नाहीत आणि त्यामुळे तापकीर वाडी येथील धनगरवाडा हे येथील आदिवासी ग्रामस्थ आपला जीव मुठीत घेऊन जीवन जगत आहेत. टाटा कंपनी कडून धरणाच्या भिंतीला लागून असलेल्या तापकीर वाडी आणि धनगर वाडा यांचे पुनर्वसन करण्याचे आश्वासन डिसेंबर २०२५ मध्ये झालेल्या उपोषणाच्या वेळी दिले होते.त्या लेखी आश्वासनाला अकरा महिने झाले असून कंपनीने कोणत्याही प्रकाराची कार्यवाही केलेली नाही.

त्यामुळे संपूर्ण पावसाळा येथील आदिवासी जीव मुठीत घेऊन जगले आहेत.तर घरावर येणारे दगड यामुळे रात्रीच्या वेळी लहान मुलांना कुशीत घेऊन रात्र जगण्याची वेळी आदिवासी कुटुंबांवर आली आहे.त्यात दगड घरावर येत असल्याने दुखापत होण्याची भीती आणि दुसरीकडे आमच्या घरच्या भिंतींना तडे गेल्याने आदिवासी लोकांच्या घरे कोसळण्याची वाट टाटा कंपनी पाहत आहेत काय?असा सवाल सीता गंगाराम शिद यांनी उपस्थित केला आहे.

आमचे मरण याच पडक्या घरामध्ये आहे असे आम्हाला दिसू लागले आहे. आम्हाला जमीन देत नाही,घरे बांधून देत नाही की साधे प्यायचे पाणी टाटा कंपनी देत नाही. त्यांना आमचे जीवन संपवायचे आहे असे आम्हाला वाटू लागले आहे, अशी प्रतिक्रिया सीता गंगाराम शिंदे यांनी दिली.

दिवेआगर समुद्रकिनारी ८ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू; सहलीतील निष्काळजीपणावरून विनर्स अकॅडमीच्या ५ जणांवर गुन्हा

Web Title: Tapkirwadi tribal residents tata company housing land problems sz

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 24, 2026 | 12:50 PM

Topics:  

  • Karjat
  • maharashtra
  • raigad

संबंधित बातम्या

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी
1

Raigad News: सुपारीच्या बागा करपल्या, कच्ची फळे गळाली; तीव्र उष्णतेने बागायतदार संकटात, पंचनामे करून मदत देण्याची मागणी

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर
2

आंबेगाव तालुक्यात पाण्याची भीषण टंचाई; ‘हंडा मोर्चा’ काढून प्रशासनाला धरले धारेवर

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित
3

FDA News: महाराष्ट्रात औषध विक्रेत्यांवर FDA चा मोठा बडगा! दोन आठवड्यांत २९ परवाने रद्द, ७१ निलंबित

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा
4

रावेतमध्ये ‘वेस्ट टू एनर्जी’ प्रकल्पाला नागरिकांचा कडाडून विरोध; आंदोलन तीव्र करण्याचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.