Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी

प्रशासनाच्या सुरुवातीच्या प्रस्तावानुसार, नवीन योजनेअंतर्गत मीटर कनेक्शन असलेल्या घरांनाच पाणीपुरवठा केला जाईल. मीटर पुरवण्याची आणि बसवण्याची जबाबदारी निविदाद्वारे निवडलेल्या कंत्राटदार कंपनीकडे सोपवली जाईल.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Mar 06, 2026 | 04:55 PM
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता नळांना बसणार ‘मीटर’; राज्य सरकारकडून प्रस्तावाला मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:
  • मीटर खरेदी आणि ते बसवण्याचा खर्च थेट नागरिकांच्या खिशातून वसूल केला जाणार
  • २,७४० कोटींचा मुख्य पाणीपुरवठा प्रकल्प पाच वर्षे उलटूनही पूर्ण झालेला नाही
  • शहरात अजूनही अनेक भागांत ३ ते ४ दिवसांआड पाणी येते
 

Chhatrapati Sambhajinagar:   शहरातील पाणीपुरवठा अधिक सक्षम आणि शिस्तबद्ध करण्यासाठी घरगुती तसेच व्यावसायिक नळ कनेक्शनवर मीटर बसवण्याच्या प्रस्तावाला राज्य सरकारने हिरवा कंदील दाखवला आहे. महानगरपालिका प्रशासनाने पाठवलेला हा प्रस्ताव मुंबईत झालेल्या पाणीपुरवठा विभागाच्या बैठकीत अंतिम करण्यात आला असून, लवकरच ४५० कोटी रुपयांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे.

Pune Traffic News: पुणे होणार ट्रॅफिकमुक्त! नितीन गडकरींकडून ४५ हजार कोटींच्या ६ महाप्रकल्पांची घोषणा

योजनेचे स्वरूप आणि चिंता

या योजनेअंतर्गत शहरातील सुमारे २ लाख ५० हजार नळांवर मीटर बसवले जातील. विशेष म्हणजे, मीटर खरेदी आणि ते बसवण्याचा खर्च संबंधित नागरिकांनाच करावा लागणार आहे. आधीच अनियमित पाणीपुरवठ्यामुळे त्रस्त असलेल्या सर्वसामान्यांवर यामुळे अतिरिक्त आर्थिक भार पडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. शहरात भविष्यात २४ तास पाणीपुरवठा सुनिश्चित करण्यासाठी मीटर बसवणे तांत्रिकदृष्ट्या आवश्यक असल्याचा दावा प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

पाणी योजनेचा विलंब आणि प्रश्नचिन्ह

केंद्र सरकारच्या अमृत २.० योजनेअंतर्गत शहरासाठी २,७४० कोटी रुपयांचा भव्य पाणीपुरवठा प्रकल्प मंजूर आहे. मात्र, या प्रकल्पाच्या अंमलबजावणीतील दिरंगाईवरून आता प्रश्न उपस्थित होत आहेत:

१. खर्चात वाढ: सुरुवातीला १,६८० कोटींचा असलेला हा प्रकल्प आता २,७४० कोटींवर पोहोचला आहे.
२. प्रलंबित काम: डिसेंबर २०२० मध्ये भूमिपूजन होऊनही पाच वर्षांनंतरही प्रकल्पाचा पहिला टप्पा पूर्ण झालेला नाही.
३. प्राधान्य कशाला?: शहराला अद्याप पूर्ण क्षमतेने (२०० एमएलडी) पाणी मिळत नसताना, नवीन योजना पूर्ण होण्यापूर्वीच मीटर बसवण्याची घाई कशासाठी? असा सवाल नागरिक उपस्थित करत आहेत.

“Invest Maharashtra हे व्यासपीठ…”; बजेट मांडताना देवेंद्र फडणवीसांचे विधान
मीटरशिवाय पाणी नाही

प्रशासनाच्या सुरुवातीच्या प्रस्तावानुसार, नवीन योजनेअंतर्गत मीटर कनेक्शन असलेल्या घरांनाच पाणीपुरवठा केला जाईल. मीटर पुरवण्याची आणि बसवण्याची जबाबदारी निविदाद्वारे निवडलेल्या कंत्राटदार कंपनीकडे सोपवली जाईल. जुने अंतर्गत पाइपलाइन नेटवर्क टप्प्याटप्प्याने बंद करण्याचाही प्रस्ताव आहे.

जयकवाडी धरणापासून नक्षत्रवाडी केंद्रापर्यंत चाचणी प्रलंबित आहे.

जयकवाडी धरणापासून नक्षत्रवाडी जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत नवीन पाइपलाइनद्वारे पाणीपुरवठ्याची चाचणी अद्याप पूर्ण झालेली नाही. परिणामी, घरांना नियमित पाणीपुरवठा सुरू होण्यापूर्वीच मीटरिंग प्रक्रियेचा वेग वाढल्याने रहिवाशांमध्ये गोंधळ निर्माण झाला आहे.

 

 

Web Title: Taps will now be fitted with meters in chhatrapati sambhajinagar state government approves proposal

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Mar 06, 2026 | 04:55 PM

Topics:  

  • Chhatrapati Sambhajinagar
  • Marathi News
  • Water supply

संबंधित बातम्या

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन
1

Ratnagiri : रत्नागिरीत छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन

Sindhudurg  : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात
2

Sindhudurg : विजयदुर्ग ते मुंबई जाणाऱ्या रो-रो बोटीचा अपघात

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण
3

‘तू अनोळखी तरी सोबती’ मालिकेत मोठा ट्विस्ट; समीर-अर्पिताच्या आयुष्यात येणार लग्नाचं नवं वळण

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…
4

कारच्या डॅशबोर्डवर ‘या’ 4 लाईटकडे अजिबात दुर्लक्ष करू नका! एक चूक आणि तुमची कार…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.