विधानभवनातील हाणामारी प्रकरण! आव्हाड आणि पडळकरांच्या कार्यकर्त्यांना तुरुंगवासाची शिफारस
आमदारांची गळती रोखण्यासाठी एकनाथ शिंदे ‘अॅक्शन मोड’वर; लागू करणार ‘हा’ फॉर्म्युला
१७ जुलै २०२५ रोजी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्यात झालेल्या वादावरून दोन्ही नेत्यांचे समर्थक थेट विधिमंडळाच्या लॉबीमध्ये भिडले होते. दरम्यान या प्रकरणात त्यांच्यावर कठोर कारवाई होण्याची शक्यता व्यक्त केली जात होती. तत्पूर्वी १५ जुलैला गोपीचंद पडळकर यांनी जितेंद्र आव्हाड यांना मंगळसूत्र चोर म्हणत त्यांच्यावर टिकाही केली होती.
त्यानंतर दुसऱ्या दिवशी १६ जुलैला पडळकर आणि आव्हाड यांच्यात विधिमंडळ परिसरात शिवीगाळही झाली. पण १७ जुलैला या वादाचा मोठा भडकाच उडाला. जितेंद्र आव्हाड आणि गोपीचंद पडळकर यांच्या वादाचं रुपांतर हाणामारीत झालं. पण ही हाणामारी त्यांच्या समर्थकांमध्ये झाली.
विधानसभा लॉबीत झालेल्या हाणामारीनंतर महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, या प्रकरणाची शिस्तभंग समितीने गांभीर्याने दखल घेतली आहे. घटनेत सहभागी झालेल्या सदस्यांना तुरुंगवासाची शिफारस करण्यात आल्यानं परिस्थिती अधिक गंभीर झाली आहे. या निर्णयामुळे संबंधित दोन्ही नेत्यांच्या समर्थकांना मोठा धक्का बसणार असून, प्रकरणाचे पुढील परिणाम राजकीय वर्तुळात मोठी चर्चा निर्माण करण्याची शक्यता आहे.






