Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 7 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग महिन्याभरात होणार सुरू; नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचा वेळ होणार कमी

ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाचे पहिले दोन टप्पे पूर्ण झाले आहेत. महिन्याभरात हा मार्ग वाहतुकीसाठी खुला होण्याची शक्यता असून, त्यामुळे ऐरोली ते काटई नाका प्रवास अवघ्या १५ मिनिटांत करता येणार आहे.

  • By प्राजक्ता प्रधान
Updated On: Sep 07, 2026 | 09:25 AM
फोटो सौजन्य- gemini

फोटो सौजन्य- gemini

Follow Us
Follow Us:
  • ऐरोली-काटई नाका उन्नत मार्गाचे काम पूर्ण
  • महिन्याभरात मार्ग वाहतुकीसाठी खुला होणार
  • मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार
 

काटई नाका ते ऐरोली हा प्रवास आता १५ मिनिटांत होणार असून महिन्याभरात हा मार्ग पूर्ण करण्यात येणार असल्याचे आश्वासन एमएमआरडीतर्फे देण्यात आले. ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील टप्पा १मधील ठाणे-बेलापूर रोड ते राष्ट्रीय महामार्ग ४ आणि टप्पा २ मधील ऐरोली ते ठाणे-बेलापूर रोडचे काम अखेर १०० टक्के पूर्ण झाले असून आता फक्त रंगरंगोटीसह सजावटीची कामे सुरू आहेत. ही कामे पूर्ण झाल्यानंतर भारवहन क्षमता चाचणी घेऊन हे दोन्ही टप्पे महिन्याभरात सेवेत दाखल करण्याचे एमएमआरडीएचे नियोजन आहे. नवी मुंबई-डोंबिवली प्रवासाचे अंतर कमी करण्यासाठी एमएमआरडीएने सुमारे १२.७१ कि.मी. लांबीचा ऐरोली-काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्प हाती घेण्यात आला आहे.

काटई ते ऐरोली मार्गात १.६९ किमी लांबीचा बोगदा

ऐरोली ते काटई नाका उन्नत मार्ग प्रकल्पातील पहिला टप्पा ठाणे-बेलापूर रोड ते एनएच-०४ असा असून, या टप्प्याची लांबी ३.४३ किमी आहे. या टप्प्यात एक दुहेरी बोगदा आहे.

तर उन्नत मार्ग ०.९४ किमी लांबीचा आहे. या पहिल्या टप्प्यामुळे महापे, शिळफाटा व कल्याण फाटा येथील वाहतूक कोंडी टाळून राष्ट्रीय महामार्ग ०४ ला अखंड जोड मिळणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

Thane News: ठाण्यात १८० वातानुकूलित ई-बसेस येणार; पण पालिकेला सोसावी लागणार ४५० कोटींची तूट

 

विविध कारणांनी हा मार्ग सुरू होण्यास झाला होता विलंब

या प्रकल्पामुळे ऐरोली ते डोंबिवलीदरम्यानचे प्रवासाचे अंतर अंदाजे १० कि. मी. ने आणि प्रवासाचा ३० ते ४५ मिनिटांचा कालावधी कमी होणार आहे. तीन – तीन मार्गिकांच्या या प्रकल्पाचे काम तीन टप्प्यांत हाती घेण्यात आले आहे. त्यानुसार टप्पा १ आणि २ चे काम मागील काही वर्षांपासून सुरू होते. तर तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. दरम्यान, पहिला आणि दुसरा टप्पा याआधीच पूर्ण होऊन वाहतूक सेवेत दाखल होणे अपेक्षित होते. मात्र, विविध कारणांनी या कामास विलंब झाला आहे. पण आता मात्र या दोन्ही टप्प्यांचे १०० टक्के काम पूर्ण झाल्याची माहिती एमएमआरडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.

SIR Voter List: मतदारांनो, नाव तपासा! SIR ची प्रारूप यादी प्रसिद्ध, नागरिकांना नाव तपासण्याचे आवाहन

मुलुंड-ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार

पहिला आणि दुसरा टप्पा सेवेत दाखल झाल्यास मुलुंड ऐरोली पूल आणि मुंब्रा थेट जोडले जाणार आहेत. ६.७१ किमीच्या तिसऱ्या टप्प्याचे काम नुकतेच सुरू झाले आहे. हा टप्पा राष्ट्रीय महामार्ग ०४ ते काटई नाका (कल्याण-शिळ रोड महामार्ग) असा आहे.

यात तीन-तीन मार्गिकांच्या मुख्य व्हायाडक्टसह एका सेवा रस्त्याचा समावेश आहे. हा टप्पा ऑक्टोबर २०२८ पर्यंत पूर्ण करून वाहतूक सेवेत दाखल करण्यात येणार आहे. हा टप्पा पूर्ण झाल्यानंतर संपूर्ण १३.७१ कि. मी. वा महामार्ग सेवेत दाखल झाल्यास नवी मुंबई-डोंबिवली अंतर केवळ १५ मिनिटांत पार करता येणार असून, वाहतूककोंडी दूर होणार आहे.

(डिस्क्लेमर: हे नवराष्ट्र वृत्तपत्राचे स्वयंचलित न्यूज फीड आहे. ते navarashtra.com च्या कर्मचाऱ्यांनी संपादित केलेले नाही.)

Web Title: Airoli katai naka elevated road to open within a month navi mumbai dombivli travel time to reduce

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 07, 2026 | 09:25 AM

Topics:  

  • Dombivli
  • MMRDA
  • Navi Mumbai

संबंधित बातम्या

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय
1

पोलिस दलात खळबळ! ASI पी.एन.पाटील यांनी संपवलं आयुष्य; वरिष्ठ अधिकाऱ्यांची नावं सांगून घेतला मोठा निर्णय

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध
2

घणसोलीत पाण्यासाठी नागरिकांचा संताप अनावर! डोक्यावर हंडे घेऊन महापालिका कार्यालयावर धडक, रस्त्यावर आंघोळ-दात घासत अनोखा निषेध

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान
3

IndiGo Flight Accident: मोठा अनर्थ टळला! प्रवासी विमानात असतानाच खांबाला धडकली इंडिगो फ्लाइट; पुढील भागाचे नुकसान

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?
4

Navi Mumbai Dahi Handi: अनधिकृत बॅनरबाजीचा नवी मुंबईत धुमाकूळ, पालिकेच्या बुडीत महसूलाला जबाबदार कोण?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.