Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 8 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल

Amit Thackeray on Kalyan Dombivli Road Potholes :मनसे नेते अमित ठाकरे यांनी कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांची दुरवस्था आणि खड्ड्यांवरून सरकार व प्रशासनावर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी आलेल्या अमित ठाकरेंनी रस्त्यांवरील डांबर, पेव्हर ब्लॉक आणि काँक्रीटच्या पॅचवर्कवर सवाल उपस्थित करत संताप व्यक्त केला.

  • By प्रियंका मुंदिनकेरी
Updated On: Aug 20, 2026 | 07:49 PM
‘हे नेमकं काय चाललंय?’ रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप; सरकारला थेट सवाल
Follow Us
Follow Us:
  • रस्त्यांवरील खड्ड्यांवरून अमित ठाकरेंचा संताप
  • सरकारला थेट सवाल
  • प्रशासनाला धारेवर धरलं
कल्याण-डोंबिवली शहरातील रस्त्यांची झालेली दुरवस्था आणि ठिकठिकाणी पडलेल्या खड्ड्यांवरून मनसे नेते अमित ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली. विद्यार्थ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी कल्याण-डोंबिवलीत आले असता, शहरातील रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी संताप व्यक्त केला.“वर्षानुवर्षे हे शहर घाण होत चालले आहे. रस्त्यावर एका ठिकाणी डांबराचा पॅच, दुसऱ्या ठिकाणी पेव्हर ब्लॉक तर तिसऱ्या ठिकाणी काँक्रीटचा पॅच दिसतो. हे नेमकं काय चाललं आहे?” असा सवाल अमित ठाकरे यांनी उपस्थित केला.

ठाकरे कलादालनावरून मीरा-भाईंदरमध्ये राजकीय तर्कवितर्कांना उधाण; भाजप पदाधिकाऱ्यांच्या भेटीने चर्चेला उधाण

कल्याण-डोंबिवलीतील रस्त्यांच्या प्रश्नावर स्थानिक लोकप्रतिनिधींनाही जाब विचारला पाहिजे, असे म्हणत त्यांनी सरकारला आणि प्रशासनाला लक्ष्य केले. “हे प्रश्न फक्त एखाद्या विशिष्ट वर्गाचे किंवा विद्यार्थ्यांचे नाहीत. या रस्त्यांमुळे सर्वसामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागतो,” असे त्यांनी सांगितले.मुंबईतील लोकल प्रवासातील समस्यांवरही त्यांनी भाष्य केले. “ट्रेनला दरवाजे नाहीत म्हणून दररोज लोकांचे जीव जात आहेत. ही विचित्र परिस्थिती आहे,” अशी टीका त्यांनी केली.

“मी विद्यार्थ्यांच्या समस्या ऐकण्यासाठी आलो होतो; मात्र येताना रस्त्यांची दुरवस्था पाहिली. पत्रकार आणि आपण सर्वांनी मिळून आता सरकारला प्रश्न विचारला पाहिजे,” असे आवाहन अमित ठाकरे यांनी केले.नाशिकमधील मनसेच्या सत्ताकाळाचा दाखला देत त्यांनी, “नाशिकमध्ये आमची सत्ता होती, तेव्हा रस्त्यावर एकही खड्डा नव्हता,” असा दावा केला.

दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधल्यानंतर त्यांच्या समस्या फार मोठ्या नसून सहजपणे सोडवता येण्यासारख्या आहेत, असेही अमित ठाकरे यांनी सांगितले. “ज्या-ज्या विद्यार्थ्यांना भेटतोय, त्यांचे प्रश्न एकदम सोपे आहेत. हे प्रश्न सहजपणे सोडवता येऊ शकतात,” असे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या सदस्य नोंदणी अभियानाच्या बातमीवर मनसे नेते अमित ठाकरे कल्याण डोंबिवली दौऱ्यावर आहेत त्यांच्यासोबत मनसे नेते राजू पाटील डोंबिवली शहराध्यक्ष हर्षद पाटील आणि इतर पदाधिकारी देखील आहेत.

डोंबिवलीतील प्रगती कॉलेज बाहेर विद्यार्थिनींना गडदूल्यांचा त्रास

डोंबिवलीतील प्रगती कॉलेज मधील विद्यार्थिनींची संवाद साधताना काही विद्यार्थिनींनी सांगितलं .या ठिकाणी गडदूल्यांच्या त्रास आहे. चेतना कॉलेज बरोबरच प्रगती कॉलेजला देखील आमच्या युनिट राहणार आहे. पोलिसांना सांगून पोलीस काही करत नसेल तर आम्ही आमच्या पद्धतीने काम करणार.

Mumbai News : ‘NEET आंदोलनातील विद्यार्थ्यांवरील FIR मागे घ्या’; मुंबई युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाची पोलीस सहआयुक्तांकडे मागणी

Web Title: Amit thackeray kalyan dombivli road potholes government criticism

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 20, 2026 | 07:49 PM

Topics:  

  • amit thackeray
  • kalyan dombivali news
  • MNS

संबंधित बातम्या

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप
1

वसई-विरार महापालिकेविरोधात मनसेचे ‘भीक मांगो’ आंदोलन;स्मशानभूमी कंत्राटातील कथित गैरव्यवहाराचा आरोप

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी
2

पावसामुळे शाळांच्या परिसराती बसथांबा कोसळला, मनसे आक्रमक; महापालिका आयुक्तांकडे केली ‘ही’ मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.